इतर भरती परीक्षा

* पोलीस कॉन्स्टेबल भरती


महाराष्ट्र राज्य पोलीस कॉन्स्टेबल भरती कडे राज्यातील शहरी भागातील तसेच मुखत्वे करून ग्रामीण भागातील इच्छुकांचे विशेष लक्ष लागून असते. देशसेवेसाठी कार्य करण्याची तसेच खाकी चा रुबाब दाखवण्याची उत्कट इच्छा असणारे भरपूर इच्छुकांचे पोलीस भरती कडे लक्ष असून त्याची तयारी सुरु असते. मात्र ग्रामीण भागातील काही उमेदवारांना पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्याने त्यांना विनाकारण माहिती मिळविण्यात तसेच भरती प्रक्रिया जाणून घेण्यात बराच वेळ वाया जातो. तसेच काहींना कोणते अभ्यास साहित्य परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल याविषयी संभ्रम असतो. अशाच काही होतकरू व खाकी वर्दी मिळवू इच्छिणाऱ्या मित्रांच्या आग्रहास्तव पोलीस भरती प्रक्रियेविषयी ही पोस्ट लिहित आहे. यात आपण भरती प्रक्रिया तर समजून घेणार आहोतच सोबत अभ्यास साहित्य, अभ्यासाचे नियोजन, सराव इ. सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

* भरती  प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रियेचे स्वरूप नुकतेच शासनाने बदलेले आहे. मुख्य बदल म्हणजे यापूर्वी शारीरिक चाचणी नंतर लेखी परीक्षा घेतली जात होती. मात्र सध्या आधी लेखी परीक्षा व त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाते. लेखी परीक्षा 100 गुणांची असते व त्यानंतर शारीरिक चाचणी घेतली जाते. लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी नुसार 1:5 याप्रमाणात उमेदवार शारीरिक चाचणी साठी पात्र ठरतात. जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 35% गुण (33% मागासवर्गीयांसाठी) मिळवितात ते शारीरिक चाचणीसाठी पात्र असतात परंतु गुणवत्तेनुसारच अशा उमेदवारांना शारीरिक चाचणी साठी बोलविले जाते.

* अभ्यासक्रम
अ.क्र.
  विषय  
प्रश्न 
संख्या
    गुण     
इतर
1
अंकगणित 
25
25
परीक्षेचा कालावधी - 90 मिनिट
परीक्षेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी 
परीक्षेची भाषा - मराठी
2
सामान्यज्ञान
25
25
3
बुद्धिमापन चाचणी
25
25
4
मराठी व्याकरण
25
25
एकूण
100
100


* अभ्याससाहित्य
अ.क्र.
  विषय 
पुस्तकाचे नाव 
    लेखक      
प्रकाशन
1
अंकगणित 
संपूर्ण गणित
पंढरीनाथ राणे
 चैताली प्रकाशन
Fastrack Maths
सतीश वसे
अम्बिशन करियर पाॅईट
2
मराठी
व्याकरण
परिपूर्ण मराठी व्याकरण
बाळासाहेब शिंदे
आनंद प्रकाशन
सुगम मराठी व्याकरण व लेखन
मो. रा. वाळंबे
नितीन प्रकाशन
3
सामान्य ज्ञान
वर्तमानपत्रे
-
-
मासिके
लोकराज्य
-
4
बुद्धिमापन
चाचणी
बुद्धीमत्ता चाचणी
पंढरीनाथ राणे
चैताली प्रकाशन
बुद्धीमत्ता चाचणी
चौगुले, लाखोले,
चांदोरे, पाटील
ज्ञानदीप प्रकाशन
5
संपूर्ण गाईड
(ठोकळा)
संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल 
भरती परीक्षा
के सागर 
के सागर प्रकाशन
पोलीस भरती 
परिपूर्ण मार्गदर्शक
एकनाथ पाटील
(तात्या)
स्पर्धा विश्व प्रकाशन

वरील पुस्तकांची यादी ही पोलीस भरती (कॉन्स्टेबल) साठी परिपूर्ण आहे तरी वरील पुस्तके वारंवार वाचून काढावीत. तसेच एखाद्या चांगल्या प्रकाशनाचा(ज्ञानदीप, के सागर इ.) सराव प्रश्नसंच/मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका घेऊन दररोज काही वेळ प्रश्नोत्तरे सोडवण्यासाठी राखून ठेवावा. सामान्यज्ञान व चालू घडामोडीसाठी नविन आवृत्तीच्या ठोकळयाचे व्यवस्थित वाचन करावे. तसेच वर्तमानपत्रे व मासिके वेळ मिळाला तर वाचावीत. 


* शारीरिक चाचणी
पुरुष उमेदवारांसाठी
महिला उमेदवारांसाठी
1600 मीटर धावणे
30 गुण 
800 मीटर धावणे
30 गुण
100 मीटर धावणे
10 गुण 
100 मीटर धावणे
10 गुण
गोळा फेकणे  
10 गुण 
गोळा फेकणे
10 गुण
एकूण
50 गुण 
एकूण
50 गुण

* सरळसेवा भरती परीक्षा
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांकडून वेळोवेळी भरती प्रक्रिया राबवली जाते. सध्या अशा वेगवेगळ्या भरतीसाठी एकच माध्यम किंवा आयोग असावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होऊन भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडेल. यासाठी विविध शैक्षणिक संस्थांनी तसे विद्यार्थी संघटनांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी केलेली आहे.

असे झाल्यास सरळसेवे अंतर्गत होणाऱ्या सर्व परीक्षांची पद्धती एकसमान असेल व याचा फायदा परीक्षार्थीना होऊ शकतो. सरळसेवा भरती प्रक्रियेचा आजपर्यंत आढावा घेतल्यास असे लक्षात येईल कि, यामध्ये 4 मुख्य विषय परीक्षेसाठी असतात. यात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित व बुद्धीमत्ता आणि सामान्यज्ञान किंवा चालू घडामोडी असे विषय असतात.

काही सरळसेवा भरतीच्या अभ्यासक्रमात एका प्रश्नासाठी 2 गुण असतात तर काही भरती प्रक्रियेसाठी एका प्रश्नाला एक गुण असतो. यानुसार काही परीक्षा 200 गुणांच्या तर काही 100 गुणांच्या असतात मात्र प्रश्नांची संख्या 100 ही कायम असते. आता जवळजवळ सर्वच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत असून सर्वांचे स्वरूप एकसमान झाल्याचे दिसून येते.

सरळसेवेतील पदांच्या भरती साठी वर सुचविल्याप्रमाणे विषयवार पुस्तके तसेच मागील प्रश्नपत्रिका कोणत्याही विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सराव म्हणून वापरल्यास फायदा होईल. तसेच ज्या जिल्ह्याची भरती आहे त्या जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. काही परीक्षांमध्ये जिल्ह्यांवर प्रश्न देखील विचारले जातात. यामागील उद्देश असा कि ज्या जिल्ह्यात आपण नोकरी करणार आहोत त्याची  संक्षिप्त माहिती आपणास असणे आवश्यक आहे.


* सरळसेवे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या काही परीक्षा

  • तलाठी - गट क परीक्षा
  • विविध खात्यांतील लिपिक व टंकलेखक पदासाठी
  • एस. टी. महामंडळातील विविध पदांच्या परीक्षा
  • जिल्हा निवड समिती द्वारे घेण्यात येणाऱ्या गट क व गट ड परीक्षा
  • जिल्हा परिषद भरती
  • विविध खात्यातील गट क व गट ड परीक्षा

* तलाठी भरती


शासनाने तलाठीची पदे 3 वर्षात टप्प्याटप्प्याने भरली जातील असे घोषित केलेले आहे. तरी त्या अनुषंगाने तलाठी बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेचे व आपल्या अभ्यासाचे नियोजन आतापासून करावे. त्यासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, अभ्याससाहित्य इ. माहिती आपण बघणार आहोत.

* भरती  प्रक्रिया
महाराष्ट्रात तलाठी भरती प्रक्रियेचे प्रमुख २ टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे  लेखी परीक्षा व त्यानंतर दुसरा टप्पा कागदपत्रे तपासणी. तलाठी भरतीची लेखी परीक्षा ही साधारणत: 200 गुणांची असते. काही जिल्ह्यात 100 प्रश्नांसाठी 200 गुण दिलेले असतात तर काही मोजक्या जिल्ह्यात 80 प्रश्नासाठी 200 गुण असतात. परंतु शासनाच्या नविन डिजिटल धोरणानुसार सध्या या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निश्चित झालेले असून सर्वत्र एकसारखीच पद्धती वापरली जाणार आहे अर्थात 100 प्रश्नांसाठी 200 गुण असणार आहेत. लेखी परीक्षा झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाते त्यानुसार साधारणत: 1:2 या प्रमाणात कागदपत्रे छाननी साठी उमेदवारांना बोलविण्यात येते तद्नंतर अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येते.

* अभ्यासक्रम
अ.क्र.
विषय
प्रश्न संख्या
गुण
1
अंकगणित व बुद्धीमत्ता
25
50
2
सामान्यज्ञान
25
50
3
इंग्रजी व्याकरण
25
50
4
मराठी व्याकरण
25
50
एकूण
100
200

* अभ्याससाहित्य
विषय
पुस्तकाचे नाव
लेखक
प्रकाशन
अंकगणित
संपूर्ण अंकगणित
पंढरीनाथ राणे
चैताली
Fastrack Maths
सतीश वसे
अम्बिशन
बुद्धीमत्ता चाचणी
बुद्धीमत्ता चाचणी
पंढरीनाथ राणे
आनंद 
बुद्धीमत्ता चाचणी
चौगुले, लाखोले,
ज्ञानदीप
सामान्यज्ञान
चालू घडामोडी
देवा जाधवर
युनिक
चौथी ते बारावी क्रमिक पुस्तके
लोकराज्य
इंग्रजी व्याकरण
संपूर्ण इंग्रजी व्याकरण
बाळासाहेब शिंदे
आनंद
संपूर्ण इंग्रजी व्याकरण
-
के’सागर
मराठी व्याकरण
सुगम मराठी व्याकरण व लेखन
मो. रा. वाळंबे
नितीन
परिपूर्ण मराठी व्याकरण
बाळासाहेब शिंदे
आनंद



वरील पुस्तकांची यादी ही तलाठी भरती परीक्षेसाठी परिपूर्ण आहे तरी वरील पुस्तके वारंवार वाचून काढावीत. तसेच एखाद्या चांगल्या प्रकाशनाचा(ज्ञानदीप, के'सागर इ.) सराव प्रश्नसंच/मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका घेऊन दररोज काही वेळ प्रश्नोत्तरे सोडवण्यासाठी राखून ठेवावा. सामान्यज्ञान व चालू घडामोडीसाठी नविन आवृत्तीची पुस्तक वाचावित. तसेच वर्तमानपत्रे व मासिके यांचे वाचन केल्याने विषयाची सखोल माहिती मिळते. 


वेळोवेळी आमच्या गिरीजा अकॅडेमीच्या संकेतस्थळाला भेट देत रहा. परीक्षा काळात अजून काही नविन माहिती यात अद्ययावत केली जाण्याची शक्यता असते त्यामुळे वेळोवेळी भेट देत रहा व अद्ययावत माहिती मिळवा. तसेच ईमेल द्वारे गिरीजा अकॅडमीशी जुडा व ईमेल वर अद्ययावत माहिती मिळवा.





Post a Comment

0 Comments