आपली सूर्यमाला


सूर्यमाला
सूर्यमाला म्हणजे सूर्याभोवती गुरुत्वाकर्षणामुळे फिरणारे ग्रह यांची बनलेली आहे. सूर्य केंद्र्स्थानी असून त्याच्याभोवती वेगवेगळ्या कक्षेत वेगवेगळी ग्रह, उपग्रह, खगोलीय वस्तू फिरतात. सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत. सूर्यापासून त्यांचा क्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून असा आहे. यांचे अंतर्ग्रह व बहिर्ग्रह असे साधारणत: दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात येते. आठ ग्रहांपैकी दोन ग्रहांना(बुध आणि शुक्र) वगळता इतर सहा ग्रहांचे नैसर्गिक उपग्रह आहेत. या उपग्रहांना त्या ग्रहांचे चंद्र असे देखील म्हणतात. पृथ्वीचा उपग्रह म्हणजेच पृथ्वीचा चंद्र हा मून(Moon) आहे हे लक्षात असू द्यावे. २४ ऑगस्ट २००६ रोजी प्लुटो ची ग्रह म्हणून केली जाणारी गणना रद्द करून प्लुटोला बटुग्रह म्हणून गणण्यात आले. त्यामुळे ग्रहांची संख्या ९ वरून ८ करण्यात आली.

  • प्रत्येक ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो. त्यामुळे त्यांचे सूर्यापासूनचे अंतर बदलत राहते.
  • सूर्यापासून ग्रहांचे अंतर मोजण्यासाठी AU (Astronomical Unit) हे एकक वापरतात. या एककाचा आधार पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर आहे. म्हणजेच 1 AU = सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर.
  • 1 AU = 14,95,97,890 किमी (सूर्य व पृथ्वी यांच्यामधील अंतर)
  • ग्रहांचे अंतर मोजण्याचे दुसरे एकक म्हणजे प्रकाशवर्ष (1 प्रकाशवर्ष = 63,240 AU )
  • सूर्याभोवती फिरणारे ग्रह व इतर खगोलीय वस्तू या सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने (Anti-Clockwise) फिरतात. परंतु युरेनस, शुक्र व हॅलेचा धुमकेतू सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (Clockwise) फिरतात.
  •  सर्व ग्रह स्वत:भोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने (Anti-clockwise) फिरतात. परंतु शुक्र ग्रह स्वतःभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने(Clockwise) फिरतो.

सूर्य (The Sun)
  • सूर्य हा सूर्यमालेच्या मध्यभागी असणारा तारा आहे.
  • व्यास - सुमारे 13,92,000 किमी (ओळीत 109 पुथ्वीगोल बसू शकतील)
  • पृष्ठभागाचे तापमान - सुमारे 6000℃
  • गाभ्याचे तापमान - सुमारे 1,60,000℃
  • सूर्याच्या आकारमानात पृथ्वीएवढे सुमारे 13 लाख ग्रह बसू शकतील.
  • सूर्य हायड्रोजन(74%) व हेलियम(24%) वायुंपासून बनलेला आहे.
  • सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी 99% वस्तुमान एकट्या सूर्याचे आहे.
  • पृथ्वीपासून सुमारे 15 कोटी किमी अंतरावर सूर्य आहे.
  • सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 8.3 मिनिटे लागतात.
बुध (Mercury)
  • व्यास - सुमारे 4878 किमी (Moon पेक्षा थोडा मोठा)
  • सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह, सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह.
  • बुध ग्रहावर वातावरण नाही. वातावरण नसणारा एकमेव ग्रह.
  • चुंबकत्व नाही. (चुंबकत्व नसणारे ग्रह - बुध व शुक्र )
  • पृथ्वीवरून फक्त सकाळ व संध्याकाळी दिसतो. 
  • परिवलन काळ - 59 दिवस (स्वतः भोवती फिरणे)
  • परिभ्रमण काळ - 88 दिवस (सूर्याभोवती फिरणे)
  • सुर्याकडील भागाचे तापमान - सुमारे 420℃
  • सुर्याच्या विरुध्द भागाचे तापमान - सुमारे उणे -200℃
  • सूर्यापासूनचे अंतर - 
  • 100 वर्षात बुधाची सुमारे 13 अधिक्रमाणे पहावयास मिळतात. (अधिक्रमण म्हणजे पृथ्वी व सूर्याच्या मध्ये बुध ग्रह येतो व बिंदू स्वरुपात दिसतो.)

शुक्र (Venus)
  • व्यास - सुमारे 12104किमी (पृथ्वीपेक्षा किंचित कमी)
  • सर्वात तप्त ग्रह, सर्वात तेजस्वी ग्रह
  • दाट वातावरण असल्याने सूर्यप्रकाश जास्त परावर्तीत होतो.
  • चुंबकत्व नाही. (चुंबकत्व नसणारे ग्रह - बुध व शुक्र )
  • परिवलन काळ - 243 दिवस 
  • परिभ्रमण काळ - 225 दिवस
  • परिवलन काळ  > परिभ्रमण काळ म्हणजेच शुक्रावरील दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे.
  • सूर्यापासूनचे अंतर - 108208980 किमी (0. AU )
  • स्वतः भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. (Clockwise). 
  • इतर ग्रह स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. (Anti-Clockwise)
  • शुक्रवार सूर्य पश्चिमेकडून उगवतो.
पृथ्वी (Earth)
  • व्यास - सुमारे 12756 किमी 
  • सूर्यापासूनचे अंतर - 14,95,97,890 किमी - सुमारे 15 कोटी किमी (या अंतरास 1 AU गणले जाते. )
  • सूर्यापासून सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी सुमारे 8 मिनिटे लागतात. 
  • प्रकाशाचा वेग = 3 लक्ष किमी प्रति सेकंद
  • पृथ्वी हा जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह आहे.
  • पृथ्वीवर सुमारे 29% भूभाग व 71% पाणी आहे.
  • भूभागाचे ७ खंडात विभाजन झाले पृथ्वीवर असून 5 महासागर आहेत.
  • सर्वात मोठा खंड - आशिया तर सर्वात लहान - ऑस्ट्रेलिया
  • अंटार्क्टीका हा अतिशीत खंड असल्याने लोकवस्ती नाही. 
  • पृथ्वीची इतर नावे - निलग्रह, वसुंधरा
  • परिवलन काळ - 24 तास 6 मिनिटे ( 1 दिवस )
  • परिभ्रमण काळ - 365 दिवस (1 वर्ष)
  • उपग्रह - 1 (Moon - आपण यास चंद्र म्हणतो.)
मंगळ (Mars)
  • व्यास - सुमारे 6795 किमी (पृथ्वीच्या निम्मेपेक्षा थोडा जास्त)
  • सूर्यापासून अंतर - 1.52 AU (सुमारे 22,79,36,640 किमी)
  • परिवलन काळ - 24 तास 37 मिनिटे 
  • परिभ्रमण काळ - 687 दिवस
  • लाल ग्रह (मातीत लोहाचे प्रमाण अधिक असल्याने लाल )
  • उपग्रह - 2 (जवळचा - फोबोस, लांबचा - डीमोस)
  • मंगळाचे चंद्र फोबोस व डीमोस हे गोलाकार नसून वेडेवाकडे आहेत.
  • सूर्यमालेतील सर्वात उंच व सर्वात लांब पर्वत मंगळावर आहे - ऑलीम्पस मॉन्स

गुरु (Jupiter)
  • व्यास - सुमारे 1,42,985 किमी (11 पृथ्वीगोल व्यासावर ओळीत बसतील. )
  • सूर्यापासून अंतर - 5.20 AU (सुमारे 77,84,12,010 किमी)
  • परिवलन काळ - 9 तास 50 मिनिटे (सर्वात कमी काळ)
  • परिभ्रमण काळ - 12 वर्षे (म्हणून दरवर्षी एका राशीत असतो.)
  • अंतर्भाग द्रवरूप लोखंडापासून तर बाह्यभाग वायूचे दाट आवरण
  • वादळी ग्रह, स्वतःभोवती सर्वाधिक गतीने फिरणारा ग्रह
  • गुरु वर रक्तरंजित लाल ठीपका निर्माण झालेला आहे. पृथ्वीच्या 3 पट आकाराचा.
  • 16 जुलै 1994 - शूमेकर लेव्ही-9 हा धुमकेतू आदळला होता.
  • 4 चंद्र दुर्बीणीने दिसतात त्यांना गॅलिलिओचे चंद्र म्हणतात. (इयो, युरोपा, गॅनिमेड, कॅलीस्टो)
  • गुरूचा गॅनिमेड हा चंद्र बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे.
  • एकूण उपग्रह - 64 (सर्वाधिक चंद्र असणारा ग्रह)
शनी (Saturn)
  • व्यास - सुमारे 1,20,537 किमी
  • सूर्यापासून अंतर - 9.54 AU (सुमारे 1,42,67,25,400 किमी)
  • परिवलन काळ - 10 तास 40 मिनिटे
  • परिभ्रमण काळ - 29 वर्षे
  • वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट.
  • सर्वात कमी घनता असणारा ग्रह - पाण्यापेक्षाही कमी घनता
  • स्पष्ट कडी - खडकांपासून तयार झालेली
  • कड्यांची संख्या असंख्य असून ७ प्रकारात वर्गीकृत केल्या आहेत.
  • कड्यांची जाडी - १० ते  १५ किमी
  • एकूण उपग्रह - 33
  • महत्वाचा उपग्रह - टायटन (साधारणतः बुध ग्रहाएवढा)

युरेनस (Uranus)
  • व्यास - सुमारे 51,119 किमी
  • सूर्यापासून अंतर - 19.19 AU (सुमारे 2,87,09,72,200 किमी)
  • परिवलन काळ - 17 तास 24 मिनिटे
  • परिभ्रमण काळ - 84 वर्षे
  • शोध - 13 मार्च 1781 (विल्यम हर्षल) - म्हणून हर्षल या नावानेही ओळखला जातो.
  • स्वतः भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. (Clockwise) - शुक्राप्रमाणे
  • सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो.
  • घरंगळत चालणारा ग्रह
  • एकूण उपग्रह - 27 (अलीकडे शोधासाठी वापरलेले यान - व्हायझर)

नेपच्यून (Neptune)
  • व्यास - सुमारे 49,528 किमी
  • सूर्यापासून अंतर - 30.07 AU (सुमारे 4,49,82,52,900 किमी)
  • सूर्यमालेतील शेवटचा ग्रह, सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह
  • परिवलन काळ - 16 तास 11 मिनिटे
  • परिभ्रमण काळ - 164 वर्षे
  • शोध - 4 ऑगस्ट 1964 
  • दुसरे नाव - वरूण
  • जवळपास युरेनस ग्रहाच्या आकारमानाएवढेच आकारमान आहे.
  • वातावरण विषारी मिथेन वायूचे
  • सूर्यापासून लांब असल्याने अतिशय थंड ग्रह
  • एकूण उपग्रह - 13
  • नेपच्यून वर एक ऋतू 41 वर्षाचा असतो.
  • वेगवान वादळी वारे वाहतात.

महत्वाच्या संज्ञा
    1. विश्व - अनेक दिर्घिकांचा समूह 
    2. दीर्घिका - अनेक ग्रह ताऱ्यांची मालिकांचा समूह (आपली सूर्यमाला आकाशगंगा या दिर्घिकेत आहे.)
    3. सूर्यमाला - सूर्य व त्याभोवतीच्या आठ ग्रह व इतर लघुग्रहांची मालिका
    4. अवकाश/अंतराळ - ग्रह - ताऱ्यांच्या दरम्यान असणारी मोकळी जागा
    5. उपग्रह/चंद्र - सूर्यमालेतील ज्या खगोलीय वस्तू सूर्याभोवती न फिरता ग्रह, लघुग्रह अथवा छोट्या वस्तूंभोवती फिरतात, त्यांना नैसर्गिक उपग्रह किंवा चंद्र म्हणतात. (पृथ्वी चा चंद्र मून आहे.)
    6. परिवलन काळ - ग्रहाचा स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी.
    7. परिभ्रमण काळ - ग्रहाचा सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा कालावधी.
    8. अधिक्रमण - सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान ग्रहाचे येणे.
    9. A.U. (Astronomical Unit) - खगोलीय एकक
    10. बोडचा नियम (जोहान बोड) - सूर्यापासून ग्रहांचे अंतर मोजण्यासंबंधी
    11. केपलरचा नियम - सूर्य केंद्रस्थानी असून ग्रह त्याच्या भोवती फिरतात.
    12. अंतर्ग्रह - सूर्यापासून लघुग्रहांच्या पट्ट्याच्या आतील ग्रह (आकाराने लहान, कडी नसणारे) - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ
    13. बहिर्ग्रह - लघुग्रहांच्या पट्ट्याच्या बाहेरील ग्रह (आकाराने मोठे, कडी असणारे) - गुरु, शनि, युरेनस, नेपच्यून
    14. लघुग्रहांचा पट्टा - मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान
पुढील भागात आमावस्या व पूर्णिमा कशा घडतात, त्यावेळी सूर्यग्रहण व चंद्रग्रहण कसे घडते याबाबत माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देत रहा. 

Post a Comment

2 Comments