मागच्या भागात म्हणजेच भाग १ मध्ये आपण संगणकाची व्याख्या व इतिहास बाबत माहिती जाणून घेतली. या भागात आपण संगणकाचे सुटे भाग कोणते? आपणास दिसणाऱ्या भागांना काय म्हणतात? तसेच संगणकाच्या आत कोणकोणते भाग महत्वाचे असतात? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करू या.

* संगणकाचे भाग
संगणकाचे भाग जाणून घेण्याआधी आपण संगणकाच्या भागांचे वर्गीकरण कसे करू शकतो ते पाहूया. संगणकाच्या भागांचे वर्गीकरण आपण दोन मुख्य घटकात करू शकतो. 1) हार्डवेअर व 2) सॉफ्टवेअर
1) हार्डवेअर :- हार्डवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो. अशा भागांना हार्डवेअर म्हणतात. आणि अशी जी उपकरणे असतात त्यांना आपण हार्डवेअर डिव्हाईसेस असे म्हणतो. उदा. मॉनीटर, CPU, कीबोर्ड, माऊस इ.
हार्डवेअरला कार्य करण्यासाठी सॉफ्टवेअरची गरज असते. जसे आपण एखादे गाणे संगणकावर सुरु केले तर ज्याठिकाणी आपण क्लिक करून गाणे सुरु करत आहोत म्हणजेत ज्या माध्यमातून गाणे सुरु होत आहे ते सॉफ्टवेअर झाले. त्यानंतर स्पीकर जे एक हार्डवेअर आहे त्यातून आवाज बाहेर पडून आपणास गाणे ऐकू येते. म्हणजेच सॉफ्टवेअरने सूचना केल्याशिवाय हार्डवेअर कार्य करीत नाही.
2) सॉफ्टवेअर :- सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाचे असे भाग जे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाहीत, ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही. अशा भागांना सॉफ्टवेअर म्हणतात. सॉफ्टवेअर हे संगणकाचे प्रोग्राम असतात म्हणजेच संगणकीय भाषांमधील सूचनांची नियमावली असते जी हार्डवेअर ला नियंत्रित करते. सॉफ्टवेअरला संगणकाचा आत्मा म्हणतात कारण सॉफ्टवेअर शिवाय संगणक कोणतेही कार्य करु शकत नाही. त्यात ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच सिस्टीम सॉफ्टवेअर असेल तरच त्याला अर्थ आहे किंवा त्याचे अस्तित्व आहे. सॉफ्टवेअरचे प्रमुख दोन प्रकार पडतात ते म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर.

1) सिस्टीम सॉफ्टवेअर :-
जी सॉफ्टवेअर सिस्टीम म्हणजेच संगणकाला आपले कार्य करण्यासाठी अत्यावश्यक असतात व ज्याशिवाय संगणक चालविणे शक्य नसते तसेच जे अप्लिकेशन सॉफ्टवेअर व संगणक यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य करतात त्यांना सिस्टीम सॉफ्टवेअर असे म्हणतात.
उदा. ऑपरेटिंग सिस्टीम (Windows 7, Linux, DOS इ.)
सिस्टीम सॉफ्टवेअर शिवाय संगणक आपले कार्य करू शकत नाही. सिसिम सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी लो लेव्हल लँग्वेज चा वापर केला जातो व यांना तयार करणे हे अप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार करण्यापेक्षा कठीण व किचकट असते. (Mahcine Language & Assembly Language)

2) अप्लिकेशन सॉफ्टवेअर :-
जी सॉफ्टवेअर वापरकर्त्याला आपल्याला पाहिजे ती कामे करण्यासाठी असतात त्यांना अप्लिकेशन सॉफ्टवेअर असे म्हणतात.
उदा. VLC प्लेयर, Microsoft Office, Photoshop इ.
अप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी हाय लेव्हल लँग्वेज चा वापर केला जातो व यांना तयार करणे हे सिस्टीम सॉफ्टवेअर तयार करण्यापेक्षा अधिक सोपे असते. (C, C++, Java, HTML इ.)

आपण संगणकाचे छायाचित्र पहिलेच असेल किंवा संगणक पहिले असेल त्यात आपल्याला काही गोष्टी समोर दिसतात. आधी आपण त्यांना काय म्हणतात ते जाणून घेऊ या. ते जाणून घेण्यासाठी खालील चित्र आपणास अधिक माहिती देईल.
वरील छायाचित्रात आपणास मॉनीटर, सी.पी.यु., कीबोर्ड, माऊस, CD/DVD रीडर/रायटर इ. गोष्टी दिसत आहेत. या सर्वाना आपण बघू शकतो, स्पर्शसुद्धा करू शकतो त्यामुळे ही सर्व हार्डवेअर आहेत, हे आता आपणास लक्षात आले असेल.
* संगणकीय उपकरणे
* मॉनीटर
इनपुट डिव्हाइसेसच्या मदतीने संगणकाला दिलेली माहितीवर प्रक्रिया झाल्यानंतर ज्या दूरदर्शन संचासारख्या(TV) दिसणाऱ्या पडद्यावर प्रक्रिया झालेली माहिती दिसते उमटते त्याला मॉनीटर म्हणतात. मॉनीटरला व्हिज्युअल डीस्प्ले यूनिट (Visual Display Unit-V.D.U.) असे देखील म्हणतात. याआधीच आपण इनपुट आणि आऊटपुट डिव्हाईसेस बाबत माहिती घेतलेली आहे. त्यानुसार मॉनीटर हे संगणकाचे आउटपुट डिव्हाईस आहे.
* मॉनीटरचा आकार:-
कोणत्याही मॉनीटरच्या आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजेच स्क्रीनच्या कर्णाच्या लांबी मध्ये केलेले असते. सध्या बाजारात 15", 17", 19", 21" इंच इत्यादी अनेक आकाराच्या पडद्याचे मॉनीटर उपलब्ध आहेत. सध्या चपट्या आकाराचे पडदे (Flat Screen) असणारे मॉनीटर हल्ली जास्त प्रमाणात वापरले जातात.
* मॉनीटरचे प्रकार :-
तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत असल्यामुळे सध्या विविध प्रकारचे मॉनीटर बाजारात दररोज येत असतात. मॉनीटर आकाराच्या आणि त्यामध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत जवळपास दूरदर्शन संचासारखीच(TV) असतात.
सुरवातीला CRT मॉनीटरचा वापर होत असे. CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब. परंतु या ट्यूब मुळे मॉनीटरचा आकार खूप मोठा व वजनाने जड असे.
तंत्रज्ञानात झालेल्या बदलामुळे CRT ऐवजी लहान आणि सूटसुटीत आकाराच्या मॉनीटरची निर्मिती सुरु झाली. या मॉनीटरला LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डीस्प्ले असे म्हणतात. LCD मॉनीटर आकाराने लहान व वजनाने हलके असून चपटे असल्याने कमी जागा व्यापणारे असतात.
तसेच LCD च्या पलीकडे LED तंत्रज्ञानाचा सर्व जगभर प्रसार झाल्यामुळे सध्या LED मॉनीटर वापरण्याकडे जास्त कल आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे LED तंत्रज्ञान हे अधिक विकसित असून खराब होण्याचे प्रमाणही तुलनेने खूप कमी आहे. व याप्रकारच्या मॉनीटरला विद्युत देखील कमी प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यामध्ये विद्युत बचत देखील होते. आधीचे मॉनीटर मोनोक्रोम पद्धतीचे असत म्हणजे ब्लॅक एंड व्हाइट या प्रकाराचे मॉनीटर होते. सध्या जवळपास सर्वच ठिकाणी रंगीत म्हणजेच कलर मॉनीटर वापरले जातात.
* कीबोर्ड
कीबोर्ड हे संगणकाचे एक महत्वाचे इनपुट डिव्हाईस आहे. याद्वारे संगणकाला माहिती पुरविली जाते. कीबोर्ड वर भरपूर Key म्हणजेच आपल्या भाषेत कळ/बटन असतात. कीबोर्ड वर असणाऱ्या कळांचे खालील प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकते.
1) Alphabet Keys:- इंग्रजी वर्णमालेतील 26 अक्षरे A पासून Z पर्यंत कीबोर्ड वर दिलेली असतात. या अक्षरांच्या कळांना Alphabet Keys म्हणतात.
2) Number Keys / Numeric Keys:- शून्य पासून ते 9 पर्यंत अंक असणाऱ्या कळांना Numeric Keys असे म्हणतात. उदा. 0,1,2,3,4,5,6,7,8,9
3) Function Keys:- कीबोर्ड च्या सर्वात वरच्या बाजूला असणाऱ्या F1 पासून ते F12 पर्यंत असणाऱ्या 12 कळांना Function Keys असे म्हणतात. उदा. F1, F2, F3, F4, F5, F6, F7, F8, F9, F10, F11, F12
4) Navigation Keys:- समोर दिसत असणाऱ्या स्क्रीन ला किंवा पेजला वेगवेगळ्या प्रकारे नेव्हिगेट करण्यासाठी काही महत्वाच्या कळा कीबोर्डवर दिलेल्या असतात त्यांना Navigation Keys म्हणतात. उदा. Arrow Keys(4), Page up, Page Down, Home, End इ.
5) Special Keys:- वरील बटनांशिवाय काही इतर महत्वाच्या कळा कीबोर्ड वर दिलेल्या असतात, त्यांना Speacial Keys म्हणतात. उदा. Space Bar, CapsLock, BackSpace, Tab, Shift, Enter, Symbol keys इ.
* कीबोर्ड च्या प्रत्येक कळचे कार्य काय असते ते आपण कीबोर्ड आणि माऊस नावाच्या स्वतंत्र भागात पाहणार आहोत.
* माऊस
कीबोर्ड प्रमाणेच माऊस देखील एक अत्यंत महत्वाचे इनपुट डिव्हाईस आहे. माऊसणे आपण संपूर्ण कार्य नियंत्रित करू शकतो जसे एखादी स्कीन उघडणे, बंद करणे, नेव्हिगेट करणे इ. भरपूर कामे माऊसने केली जातात. माउस चे प्रकार व कार्य आपण स्वतंत्र भागात पाहणार आहोत.
* CPU (Central Processing Unit)
CPU हा संगणकाचा मेंदू आहे. संगणकाची सर्व प्रक्रिया या भागात नियंत्रित होते. या मध्ये वापरकर्त्याकडून आलेली माहितीची दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रक्रिया करण्याचे कार्य केले जाते. विविध प्रकारची आकडेमोड, इतर प्रक्रिया याच भागात होते. CPU संबंधी संपूर्ण माहिती स्वतंत्र भागात आपण पाहणार आहोत.
वर दिलेली सर्व माहिती ही आपण दैनंदिन जीवनात आपल्या समोर संगणक हा विषय आला कि बघत असतो. एवढ्या गोष्टी संगणक हाताळण्यासाठी सर्वसाधारण व्यक्तीस माहित असणे गरजेचे आहे.
पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा आणि खाली Comment Box मध्ये किंवा अभिप्राय विभागात अभिप्राय नोंदवा. ईमेल द्वारे गिरीजा अकॅडमीशी जुडा आणि भरपूर महत्वपूर्ण माहिती मिळवा.
- जगदिश सोळंके (गिरीजा अकॅडमी, अडावद)

वरील छायाचित्रात आपणास मॉनीटर, सी.पी.यु., कीबोर्ड, माऊस, CD/DVD रीडर/रायटर इ. गोष्टी दिसत आहेत. या सर्वाना आपण बघू शकतो, स्पर्शसुद्धा करू शकतो त्यामुळे ही सर्व हार्डवेअर आहेत, हे आता आपणास लक्षात आले असेल.
* संगणकीय उपकरणे
आपण मागच्या भागात संगणकाची व्याख्या बघीतली त्यात आपण बघितले कि संगणक माहिती आदान करते, प्रक्रिया करते आणि माहिती प्रदान करते. परंतु ही सर्व कामे करण्यासाठी कोणती न कोणती उपकरणे आवश्यक असतीलच. ती उपकरणे कोणती ते आपण बघुया.
संगणकीय उपकरणांचे आपण दोन विभागात वर्गीकरण करू शकतो.
1) इनपुट डिव्हाईसेस (Input Devices) :-
जी उपकरणे वापरकर्त्याकडून माहिती घेण्याची कामे करतात व संबंधित माहिती संगणकाला पुरवितात त्यांना इनपुट डिव्हाईसेस म्हणतात.
उदा. कीबोर्ड(Keyboard), माऊस(Mouse), स्कॅनर(Scanner), जॉय स्टीक(Joy Stick) इ.
2) आऊटपुट डिव्हाईसेस (Output Devices) :-
जी उपकरणे संगणकाने प्रक्रिया केलेली माहिती पुन्हा वापरकर्त्याला देण्याची कामे करतात, ती माहिती वापरकर्त्याला दाखवितात, त्यांना आऊटपुट डिव्हाईसेस म्हणतात.
उदा. मॉनीटर(Monitor), प्रिंटर(Printer)
* मॉनीटर
इनपुट डिव्हाइसेसच्या मदतीने संगणकाला दिलेली माहितीवर प्रक्रिया झाल्यानंतर ज्या दूरदर्शन संचासारख्या(TV) दिसणाऱ्या पडद्यावर प्रक्रिया झालेली माहिती दिसते उमटते त्याला मॉनीटर म्हणतात. मॉनीटरला व्हिज्युअल डीस्प्ले यूनिट (Visual Display Unit-V.D.U.) असे देखील म्हणतात. याआधीच आपण इनपुट आणि आऊटपुट डिव्हाईसेस बाबत माहिती घेतलेली आहे. त्यानुसार मॉनीटर हे संगणकाचे आउटपुट डिव्हाईस आहे.
* मॉनीटरचा आकार:-
कोणत्याही मॉनीटरच्या आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजेच स्क्रीनच्या कर्णाच्या लांबी मध्ये केलेले असते. सध्या बाजारात 15", 17", 19", 21" इंच इत्यादी अनेक आकाराच्या पडद्याचे मॉनीटर उपलब्ध आहेत. सध्या चपट्या आकाराचे पडदे (Flat Screen) असणारे मॉनीटर हल्ली जास्त प्रमाणात वापरले जातात.
* मॉनीटरचे प्रकार :-
तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत असल्यामुळे सध्या विविध प्रकारचे मॉनीटर बाजारात दररोज येत असतात. मॉनीटर आकाराच्या आणि त्यामध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत जवळपास दूरदर्शन संचासारखीच(TV) असतात.

सुरवातीला CRT मॉनीटरचा वापर होत असे. CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब. परंतु या ट्यूब मुळे मॉनीटरचा आकार खूप मोठा व वजनाने जड असे.
तंत्रज्ञानात झालेल्या बदलामुळे CRT ऐवजी लहान आणि सूटसुटीत आकाराच्या मॉनीटरची निर्मिती सुरु झाली. या मॉनीटरला LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डीस्प्ले असे म्हणतात. LCD मॉनीटर आकाराने लहान व वजनाने हलके असून चपटे असल्याने कमी जागा व्यापणारे असतात.

* कीबोर्ड
कीबोर्ड हे संगणकाचे एक महत्वाचे इनपुट डिव्हाईस आहे. याद्वारे संगणकाला माहिती पुरविली जाते. कीबोर्ड वर भरपूर Key म्हणजेच आपल्या भाषेत कळ/बटन असतात. कीबोर्ड वर असणाऱ्या कळांचे खालील प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकते.
1) Alphabet Keys:- इंग्रजी वर्णमालेतील 26 अक्षरे A पासून Z पर्यंत कीबोर्ड वर दिलेली असतात. या अक्षरांच्या कळांना Alphabet Keys म्हणतात.
2) Number Keys / Numeric Keys:- शून्य पासून ते 9 पर्यंत अंक असणाऱ्या कळांना Numeric Keys असे म्हणतात. उदा. 0,1,2,3,4,5,6,7,8,9
3) Function Keys:- कीबोर्ड च्या सर्वात वरच्या बाजूला असणाऱ्या F1 पासून ते F12 पर्यंत असणाऱ्या 12 कळांना Function Keys असे म्हणतात. उदा. F1, F2, F3, F4, F5, F6, F7, F8, F9, F10, F11, F12
4) Navigation Keys:- समोर दिसत असणाऱ्या स्क्रीन ला किंवा पेजला वेगवेगळ्या प्रकारे नेव्हिगेट करण्यासाठी काही महत्वाच्या कळा कीबोर्डवर दिलेल्या असतात त्यांना Navigation Keys म्हणतात. उदा. Arrow Keys(4), Page up, Page Down, Home, End इ.
5) Special Keys:- वरील बटनांशिवाय काही इतर महत्वाच्या कळा कीबोर्ड वर दिलेल्या असतात, त्यांना Speacial Keys म्हणतात. उदा. Space Bar, CapsLock, BackSpace, Tab, Shift, Enter, Symbol keys इ.
* कीबोर्ड च्या प्रत्येक कळचे कार्य काय असते ते आपण कीबोर्ड आणि माऊस नावाच्या स्वतंत्र भागात पाहणार आहोत.
* माऊस
कीबोर्ड प्रमाणेच माऊस देखील एक अत्यंत महत्वाचे इनपुट डिव्हाईस आहे. माऊसणे आपण संपूर्ण कार्य नियंत्रित करू शकतो जसे एखादी स्कीन उघडणे, बंद करणे, नेव्हिगेट करणे इ. भरपूर कामे माऊसने केली जातात. माउस चे प्रकार व कार्य आपण स्वतंत्र भागात पाहणार आहोत.
* CPU (Central Processing Unit)
CPU हा संगणकाचा मेंदू आहे. संगणकाची सर्व प्रक्रिया या भागात नियंत्रित होते. या मध्ये वापरकर्त्याकडून आलेली माहितीची दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रक्रिया करण्याचे कार्य केले जाते. विविध प्रकारची आकडेमोड, इतर प्रक्रिया याच भागात होते. CPU संबंधी संपूर्ण माहिती स्वतंत्र भागात आपण पाहणार आहोत.
वर दिलेली सर्व माहिती ही आपण दैनंदिन जीवनात आपल्या समोर संगणक हा विषय आला कि बघत असतो. एवढ्या गोष्टी संगणक हाताळण्यासाठी सर्वसाधारण व्यक्तीस माहित असणे गरजेचे आहे.
* संगणकाबाबत अधिक जाणून घ्या. *
|
|---|

0 Comments