भारताविषयी माहिती



सध्या जम्मू-काश्मीर आणि लडाख हे नवीन केंद्रशासित झाल्यामुळे देशातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या ९ झाली असून, राज्यांची संख्या एकने कमी होऊन २८ झाली आहे. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० आणि ३५अ  हटवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्यात आले. खालील नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश देशातील इतर राज्यांप्रमाणेच दाखवण्यात आले आहेत. यातील लडाख या केंद्रशासित प्रदेशात केवळ २ जिल्हे आहेत (लेह आणि कारगील) तर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात एकूण २० जिल्हे आहेत.

* महत्वाचे मुद्दे
1) १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्य पुनर्रचना कायदा, १९५५ ची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार भारतात १४ राज्ये व ६ केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. 
2) ७ वी घटनादुरुस्ती, १९५६ अन्वये १ नोव्हेंबर १९५६ रोजी पहिल्या अनुसूचित १४ राज्ये व ६ केंद्रशासित प्रदेशांची यादी समाविष्ट करण्यात आली.

* १४ राज्ये व ६ कें. प्र. (०१ नोव्हेंबर १९५६)
क्र.
राज्याचे नाव
क्र.
केंद्रशासित प्रदेश
निर्मिती दिनांक
1
आंध्रप्रदेश
1
अंदमान व निकोबार-
01 नोव्हे 1956
2
आसाम
2
दिल्ली
01 नोव्हे 1956
3
बिहार
3
मणिपूर
01 नोव्हे 1956
4
द्विभाषिक मुंबई
4
त्रिपुरा
01 नोव्हे 1956
5
जम्मु काश्मीर
5
हिमाचल प्रदेश
01 नोव्हे 1956
6
केरळ
6
लखदिव, मिनिकाय, अमिनदिवी-
01 नोव्हे 1956
7
मध्य प्रदेश

01 नोव्हे 1956
8
मद्रास

01 नोव्हे 1956
9
म्हैसूर

01 नोव्हे 1956
10
ओरिसा

01 नोव्हे 1956
11
पंजाब

01 नोव्हे 1956
12
राजस्थान

01 नोव्हे 1956
13
उत्तरप्रदेश

01 नोव्हे 1956
14
पश्चिम बंगाल

01 नोव्हे 1956

* राज्य व के.प्र. सद्य स्थिती (०१ एप्रिल २०२०)
 क्र.
राज्याचे नाव
निर्मिती दिनांक
कोणत्या राज्यातून विभक्त
इतर माहिती
1
आंध्रप्रदेश
01 नोव्हे 1956
-
-
2
आसाम
01 नोव्हे 1956
-
-
3
बिहार
01 नोव्हे 1956
-
-
4
द्विभाषिक मुंबई
01 नोव्हे 1956
01 मे 1960 रोजी
महाराष्ट्र व गुजरात
5
जम्मु काश्मीर
01 नोव्हे 1956
31 ऑक्टो २०१९ पासून के.प्र.
राज्य दर्जा काढला.
6
केरळ
01 नोव्हे 1956
-
-
7
मध्य प्रदेश
01 नोव्हे 1956
-
-
8
तमिळनाडू
01 नोव्हे 1956
-
मद्रासचे नाव बदल - 
9
कर्नाटक
01 नोव्हे 1956
-
म्हैसूरचे नाव बदल -
10
ओडीशा
01 नोव्हे 1956
-
ओरिसाचे नाव बदल -
11
पंजाब
01 नोव्हे 1956
-
-
12
राजस्थान
01 नोव्हे 1956
-
-
13
उत्तरप्रदेश
01 नोव्हे 1956
-
-
14
पश्चिम बंगाल
01 नोव्हे 1956
-
-
15
महाराष्ट्र / गुजरात
01 मे 1960
१५ वे राज्य
बॉम्बे चे महाराष्ट्र व गुजरात
16
नागालँड
01 नोव्हे 1963
-
-
17
हरियाणा
1966
पंजाब
चंडीगड के.प्र. निर्माण
18
हिमाचल प्रदेश
1970
-
के.प्र. ला राज्य दर्जा
19
मणिपूर
1972
-
-
20
त्रिपुरा
1972
-
-
21
मेघालय
1972
-
-
22
सिक्कीम
1975
-
-
23
मिझोराम
1986
-
-
24
अरुणाचल प्रदेश
1986
-
-
25
गोवा
1987
-
-
26
छत्तीसगड
2000
मध्य प्रदेश
-
27
उत्तरांचल
2000
उत्तरप्रदेश
2006-उत्तराखंडचे नाव बदल
28
झारखंड
2000
बिहार
-
29
तेलंगणा
02 जून 2014
आंध्रप्रदेश
-
 क्र.
केंद्रशासित प्रदेश
निर्मिती दिनांक
कोणत्या राज्यातून विभक्त
इतर माहिती
1
अंदमान व निकोबार
01 नोव्हे 1956
- -
2
दिल्ली
01 नोव्हे 1956
--
3
लक्षद्वीप
01 नोव्हे 1956
--
4
दादरा व नगरहवेली
-
-
-
5
दमण व दीव
-
-
-
6
चंडीगड
-
-
-
7
पाँडेचेरी
-
-
-
8
जम्मु काश्मीर
31 ऑक्टो 2019
पंजाब
-
9
लडाख
31 ऑक्टो 2019
पंजाब
-


* भारत - प्रादेशिक व राजकीय 
  • भारताचे स्थान उत्तर पूर्व गोलार्धात आहे. 
  • भारताच्या मध्यातून कर्कवृत्त अर्थात 23¹/² ° उत्तर अक्षवृत्त जाते. हे कर्कवृत्त पश्चिमेकडून गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, प. बंगाल, त्रिपुरा व मिझोराम या 8 राज्यातून जाते.
  • भारताची प्रमाणवेळ 82°30" पूर्व रेखावृत्ताने निश्चित केलेली आहे. हे रेखावृत्त भारताच्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड,ओडिशा व आंध्रप्रदेश या 5 राज्यातून जाते. तसेच भारताच्या प्रमाणवेळेचे हे रेखावृत्त उत्तरप्रदेश राज्यातील अलाहाबाद या शहरातून जाते.
  • भारताचा अक्षवृत्तीय विस्तार - 8°4"28' उत्तर अक्षवृत्त ते 37°6"53' उत्तर अक्षवृत्त
  • भारताचा रेखावृत्तीय विस्तार - 68°7"33' पूर्व रेखावृत्त ते 97°25"47' पूर्व रेखावृत्
  • भारताची उत्तर-दक्षिण लांबी - सुमारे 3214 किमी (दफदार ते कन्याकुमारी)
  • भारताची पूर्व-पश्चिम लांबी - सुमारे 2933 किमी (किबीथू ते घुवरमोटा)
  • किबीथू(अरुणाचल प्रदेश) ते घुवरमोटा(गुजरात) यांच्यातील वेळेमध्ये सुमारे दोन तासांचा फरक आहे.
  • लोकसंख्येनुसार भारताचा जगात चीन नंतर दुसरा क्रमांक असून ती जगाच्या 17.5% आहे. म्हणजेच जगातील प्रत्येक 6 व्यक्तींमागे एक भारतीय व्यक्ती आहे. 
  • सध्या भारतात 28 राज्ये व 9 केंद्रशासित प्रदेश आहेत.
  • 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या - सुमारे 121 कोटी
  • क्षेत्रफळानुसार भारताचा जगात 7 वा क्रमांक असून ते जगाच्या 2.46% आहे. (32,87,263 चौ.कि.मी.)
  • 1) रशिया 2) कॅनडा 3) चीन 4) USA 5) ब्राझील 6) ऑस्ट्रेलिया 7) भारत
  • भारताचे क्षेत्रफळ चीन च्या क्षेत्रफळाच्या सुमारे एक तृतीयांश आहे.
  • क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी राज्ये - 1) राजस्थान 2) मध्यप्रदेश 3) महाराष्ट्र
  • लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी राज्ये - 1) उत्तरप्रदेश 2) महाराष्ट्र 3) बिहार
  • भारताला 7 देशांच्या सीमा लागून असून भारताची सर्वाधिक सीमा बांगलादेश सोबत सुमारे 4096 किमी इतकी असून ती भारताच्या 5 राज्यांना लागून आहे.
  • 1) बांगलादेश - 4096 किमी (5 राज्यांना - प.बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम) 
  • 2) चीन - 3917 किमी (5 राज्यांना - जम्मु काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश) सध्या याची गणना 4 राज्ये व 1 केंद्राशासित प्रदेश अशी आहे. जम्मु काश्मीर ऐवजी लडाख केंद्रशासित प्रदेश असे समजावे.
  • 3) पाकिस्तान - 3310 किमी (4 राज्यांना/के.प्र. - गुजरात, राजस्थान, पंजाब व जम्मु काश्मीर)
  • 4) नेपाळ - 1752 किमी (5 राज्यांना - उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, प. बंगाल, सिक्कीम)
  • 5) म्यानमार - 1458 किमी (4 राज्यांना - अरुणाचल प्रदेश, नागलँड, मणिपूर, मिझोराम)
  • 6) भूतान - 587 किमी (4 राज्यांना - अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, प. बंगाल)
  • 7) अफगानिस्तान - 80 किमी (1 राज्य/के.प्र. - जम्मु काश्मीर)
  • भारताच्या सरहद्दीत येणारे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक - इंदिरा पॉईट (अंदमान व निकोबार बेटे) हे आहे. हे ठिकाण 6°45" उत्तर अक्षवृत्तावर स्थित आहे.
  • इंदिरा पॉईट व सुमात्रा बेटे/इंडोनेशिया यामध्ये ग्रँडची सामुद्रधुनी आहे.
  • अंदमान निकोबार बेटे व म्यानमार यादरम्यान कोकोची सामुद्रधुनी आहे.
  • भारत व श्रीलंका एकमेकांपासून पाल्कच्या सामुद्रधुनीने अलग झालेले आहेत. 
  • अंदमान व निकोबार ही बेटे एकमेकांपासून 10° चॅनेल ने अलग झाले आहेत.
  • लक्षद्वीप व मिनिकॉय ही बेटे एकमेकांपासून 9° चॅनेल ने अलग झाले आहेत.
  • मिनिकॉय व मालदीव ही बेटे एकमेकांपासून 8° चॅनेल ने अलग झाले आहेत.
  • दक्षिण अंदमान व लघु अंदमान दरम्यान उंकन चॅनेल




Post a Comment

0 Comments