आता पर्यंत आपण आधीच्या तीन भागांमध्ये संगणकाची व्याख्या, संगणकाचा इतिहास, संगणकाचे भाग- मॉनीटर तसेच संगणकाचे कीबोर्ड इतकी माहिती पाहिलेली आहे. आजच्या या भागात आपण सी.पी.यु. अर्थात सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट काय असते ते बघणार आहोत. यात आपण सी.पी.यु. च्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेणार आहोत. बाहेरून सी.पी.यु. ला कोणते पोर्ट असतात, कोणते स्वीच असतात तसेच त्यांचा उपयोग नेमका कसा करावा व त्याबाबत सविस्तर माहिती देखील या भागात आपण जाणून घेणार आहोत.

* C.P.U. (Central Processing Unit)
CPU चा अर्थ नावातच कळतोय तो म्हणजे प्रक्रिया करणारा मध्यवर्ती भाग. आपण CPU बघितले असेलच, परंतु काहींनी हे केवळ समोरून वरच्या वर बघितले असेल, काहींनी त्याला उघडून बघितलेले नसेल. आधी आपण सी.पी.यु. दिसते कसे ते बघूया त्याच्या समोरच्या व मागच्या बाजूला कोणती कनेक्टर, स्वीच असतात ते पाहूया.
सर्वात आधी आपण सीपीयू चे बाहेरील रूप समजून घेऊया म्हणजे समोर दिसणाऱ्या भागावर असणारे काही स्वीच अथवा पोर्ट्स त्याचबरोबर मागील बाजूस असणारे काही पोर्ट्स व स्वीच याची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सी.पी.यु. जाणून घेण्याची सुरुवात करूया.
ऑन/ऑफ स्विच व रीस्टार्ट स्विच
साधारणतः सी.पी.यु. ला समोरुन बघितला असता आपणास काही पोर्ट व स्विच ज्याला आपण आपल्या भाषेत बटन किंवा मराठीत कळ असे देखील म्हणतो. समोरच्या भागाला ऑन/ऑफ स्विच तसेच रीस्टार्ट स्विच असतात. संगणक ऑन/ऑफ करण्यासाठी म्हणजेच सुरु किंवा बंद करण्यासाठी या स्वीचचा उपयोग होतो. हा स्वीच दाबूनच आपण आपले संगणक सुरु करतो. तसेच त्याच्याच शेजारी एक लहान स्वीच असतो त्याला रिस्टार्ट स्वीच असे म्हणतात. याद्वारे आपण सीपीयू रिस्टार्ट करू शकतो म्हणजेच हा स्वीच दाबला असता सीपीयू व्यवस्थितरित्या बंद होऊन पुन्हा सुरू होतो.
तसेच समोरच्या भागात स्वीच शिवाय काही पोर्ट असतात. त्यात यूएसबी पोर्ट तसेच ऑडिओ
पोर्ट हे महत्वाचे पोर्ट जवळपास सर्वच सी.पी.यु.ना पाहायला मिळतात. त्यांची माहिती व कार्य आपण स्वतंत्ररीत्या बघणार आहोत. खाली सीपीयूचे समोरून तसेच मागच्या बाजूचे छायाचित्र दिलेले आहे त्यात आपण हे स्वीच बघू शकता. प्रत्येक सीपीयू वेगवेगळ्या प्रकारचे असल्याने यात थोडेफार बदल असणे स्वाभाविक आहे. परंतु जवळपास सर्वच सीपीयूना हे पोर्ट व स्वीच असतातच.
CD/DVD RW
तसेच याव्यतिरिक्त सीडी अथवा डीव्हीडी रीडर रायटर देखील तुम्हाला समोरच्या भागात जोडलेला दिसेल. याद्वारे आपण CD म्हणजेच Compact Disk तसेच DVD अर्थात Digital Versatile Disk चालवू शकतात. तसेच आपल्या संगणकात असणारी माहिती यामध्ये साठवू शकतात. CD/DVD टाकून केवळ त्यातील चित्रीकरण, माहिती अथवा इतर माहिती बघायची असल्यास ते काम CD/DVD R (रीडर) करते. तर संगणकातील कोणत्याही प्रकारची माहिती CD/DVD मध्ये साठवायची असल्यास त्यात माहिती टाकण्याचे कार्य CD/DVD W(Writer) करते. म्हणून CD/DVD RW आपणास बऱ्याच ठिकाणी लिहिलेले आढळते.
सीपीयू च्या पुढील बाजूला ज्याप्रमाणे काही पोर्ट व स्वीच असतात त्याचप्रमाणे मागील बाजूला देखील अनेक वेगवेगळी पोर्ट व काही स्वीच असतात. यामध्ये आपण प्रत्येक पोर्टची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
PS/2 पोर्ट
PS/2 अर्थात Personal System/2 पोर्ट. सीपीयू च्या मागच्या बाजूला साधारणतः दोन गोलाकार PS/2 पोर्ट असतात. त्यातील एक हिरवट रंगाचा व दुसरा जांभळ्या रंगाचा असतो. काही संगणकांमध्ये वेगळे रंग देखील असू शकतात परंतु बहुतेक संगणकात वरील प्रमाणेच रंगसंगती आपणास दिसून येईल. त्यापैकी हिरवट रंगाचा पोर्ट हा माऊस जोडण्यासाठी तर जांभळ्या रंगाचा पोर्ट हा कीबोर्ड जोडण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे PS/2 माऊस किंवा कीबोर्ड सीपीयू च्या मागच्या बाजूला जोडायचा असल्यास रंगानुसार जोडावे लागतात. कीबोर्ड व माऊस दोघांचेही पोर्ट सारखेच दिसत असले तरी ते अदलाबदल झाल्यास माऊस व कीबोर्ड आपले काम करणार नाही. म्हणून ज्या त्या जागीच माऊस व कीबोर्ड जोडणे आवश्यक असते. परंतु दिवसेंदिवस तंत्रज्ञानात होत असणाऱ्या बदलामुळे नवनवीन गोष्टी आपणास पाहायला मिळत आहेत. सध्या काही संगणक निर्मात्यांनी PS/2 पोर्ट हद्दपार केलेले असून काहींनी हायब्रीड PS/2 पोर्टची देखील सोय केलेली आहे. म्हणजेच हायब्रीड PS/2 पोर्ट ला तुम्ही कीबोर्ड अथवा माउस काहीही जोडू शकतात. यासाठी त्याची रंगसंगती निश्चित करताना त्या पोर्ट ला अर्धा जांभळा तर अर्धा हिरवट रंगाचा वापर केलेला दिसतो. यावरून आपल्या लक्षात येते कि या PS/2 पोर्ट ला आपण कीबोर्ड अथवा माउस काहीही जोडू शकतो. PS/2 पोर्टचे व्यवस्थितरित्या निरीक्षण केले असता आपल्या असे लक्षात येईल की त्याला सहा पिन असतात. म्हणजेच जे डिवाइस आपण जोडणार आहोत अर्थात कीबोर्ड किंवा माऊस त्याच्या कनेक्टर ला बघितले असता सहा पीन आपल्याला त्यामध्ये दिसतील तसेच एक लांब खाचा देखील आपल्या नजरेस पडेल. या 6 पिन मध्ये साधारणतः Data, Clock, Ground, DC व दोन Reserved पिन असतात. PS/2 पोर्टची संगणक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या IBM कंपनीने 1987 मध्ये सुरुवात केली.
USB पोर्ट
USB म्हणजे Universal Serial Bus (युनिव्हर्सल सिरीयल बस). USB पोर्टशी आपण जास्त परिचित असतो. कारण सध्या बाजारात संगणकाला जोडण्यासाठी वापरले जाणारे कोणतेही डिव्हाईस हे USB पोर्ट असणारेच असते. त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याबाबत माहिती असेल किंवा आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी यास बघितला असेल. USB णे जोडली जाणारी उपकरणे ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. तसेच USB काही उपकरणांना पॉवर देण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. याद्वारे आपण मोबाईल, स्मार्टफोन चार्ज करू शकतो. तसेच काही USB उपकरणे जसे लाईट, पंखा, कुलपॅड इ आपण या पोर्ट द्वारे जोडू शकतो. या पोर्ट ची सुरुवात 1996 मध्ये करण्यात आली. USB पोर्ट आपणास संगणक, laptop, स्मार्टफोन, tablet computer इ. ठिकाणी आढळून येतात. तसेच यांना जोडण्यात येणाऱ्या अनेक उपकरणांना देखील हे पोर्ट दिसून येतात. तसेच आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित नसेल कि आपल्या स्मार्टफोन ला आपण जिथे चार्जर लावतो तो पोर्ट देखील USB पोर्ट असतो त्यानुसार त्याचे USB मिनी, USB मायक्रो व USB C टाईप असे प्रकार पडतात. नविन स्मार्टफोन साठी C टाईप चे पोर्ट असतात व हे पोर्ट रेव्हार्सिबल असतात. म्हणजेच तुम्ही यास उलट सुलट कसेही लाऊ शकतात दोन्ही बाजूंनी सारखेच असते. तसेच USB चे त्याच्या गतीनुसार USB 1.0, 2.0 व 3.0 असे प्रकार पडतात अर्थात USB 3.0 याची माहिती आदानप्रदान करण्याची गती तुलनेने जास्त असते.
Sound/Audio पोर्ट
साउंड किंवा ऑडीओ पोर्ट हे संगणकातील ऑडीओ अथवा व्हिडीओ चा आवाजासाठी वापरले जाणारे पोर्ट आहेत. यामध्ये आपण स्पीकर, होम थिएटर, हेडफोन इ. उपकरणे जोडून आवाज ऐकू शकतो.तसेच आपणास माईक जोडावयाचा असल्यास तो देखील येथे जोडता येतो. या पोर्ट मध्ये सर्वसाधारणपणे आपणास तीन गोलाकार पोर्ट दिसतात. यात आपणास साधारणत: तीन रंगाचे पोर्ट दिसतात. त्यांची माहिती खालीलप्रमाणे -

- निळ्या रंगाचा पोर्ट (Blue): - हा Sound In / Line In म्हणजेच आवाजासाठीचा इनपुट पोर्ट असतो. यात टेप रेकॉर्डर, रेकॉर्ड प्लेयर, CD प्लेयर जोडले जातात.
- गुलाबी रंगाचा पोर्ट (Pink): - हा Microphone/Mic पोर्ट असतो. यामध्ये माईक जोडला जातो.
- हिरव्या रंगाचा पोर्ट (Green): - हा Sound Out / Line Out म्हणजेच आवाजासाठीचा आउटपुट पोर्ट असतो. यामध्ये आपण संगणकातील आवाज बाहेरच्या उपकरणात पाठ्विण्य्साठी जोडणी करतो. यात हेडफोन, स्पीकर तसेच होम थिएटर इ. उपकरणे जोडली जातात.
इतर पोर्टची माहिती आपण पुढील भागात बघणार आहोत. त्यासाठी वेळोवेळी गिरीजा अकॅडमीच्या संकेतस्थळाला भेट देत रहा व वेगवेगळ्या नविन गोष्टी ज्या आपणास अवगत नाहीत त्या जाणून घ्या. तसेच घरी बसून संगणक शिका. आपल्या जवळच्या मित्रमंडळी, नातेवाईक यांना देखील पोस्ट शेअर करा.

0 Comments