सर्वप्रथम गिरीजा अकॅडमी (एक अथांग ज्ञानसागर....) तर्फे आपले हार्दिक स्वागत. आपण आमच्या संकेतस्थळाला भेट दिली त्याबद्दल आपले आभार.
आम्ही स्पर्धा परीक्षेचा दृष्टीकोन ठेऊन हे संकेतस्थळ तयार केलेले आहे. यात आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक संदर्भ साहित्य, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका तसेच स्पर्धा परीक्षांसाठी इतर सर्व आवश्यक गोष्टी संग्रहित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जेणे करून अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. सर्व माहिती ही तपासूनच अद्ययावत केलेली असते तरीही काही संदिग्ध माहिती आढळल्यास आम्हाला संपर्क साधावा.
तसेच स्पर्धापरीक्षांव्यतिरिक्त आमच्या या संकेतस्थळावर दैनंदिन जीवनात उपयोगी असणाऱ्या भरपूर गोष्टी ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध असल्याने त्यासंबंधी मार्गदर्शन व माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तसेच भारताविषयी, आपल्या महाराष्ट्राविषयी व इतर भरपूर माहिती या संकेतस्थळावर आपणास एका टिचकी वर उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून वेगवेगळ्या संकेतस्थळांची माहिती न ठेवता सर्व काही एका संकेतस्थळावर आपणास उपलब्ध होईल.
त्याचबरोबर आम्ही गिरीजा अकॅडमी या संकेतस्थळावर आपल्या गावाविषयी व परिसराविषयी देखील माहिती समाविष्ट केलेली आहे. आपण आपल्या गावाचे, परिसराचे काही देणे लागतो या नात्याने गावाविषयी व परिसराविषयी पर्यटन, ग्रामपंचायत, विविध कार्यालये, रुग्णालये, औषधालये इ. भरपूर महत्वाची माहिती आपणास एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे.
आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात आपणास असंख्य गोष्टींविषयी अडचणी येत असतात. त्यामुळे आमच्या संकेतस्थळावर आपणास दैनंदिन आवश्यक असणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी आम्ही मार्गदशन देखील करीत आहोत. तसेच आपणास ऑनलाईन खरेदी साठी देखील विविध वस्तू एका क्लिक वर उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
तुम्हाला आमचे संकेतस्थळ कसे वाटले याबाबत आम्हास Comment करू शकता. आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्वपूर्ण असल्याने अभिप्राय/सूचना या विभागात जाऊन आपला अभिप्राय व सूचना आम्हाला पाठवा. तसेच या संकेतस्थळावर अजून काही नविन माहिती असायला पाहिजे असे आपणास वाटत असल्यास कृपया तशा सूचना आपण द्याव्यात. संबंधित माहितीची पळताडणी करून ब्लॉगवर अद्ययावत केली जाईल. आपणास या संकेतस्थळावर अद्ययावत होणारी माहिती ईमेल वर नोटीफिकेशन स्वरुपात पाहिजे असल्यास ईमेल द्वारे जुडा या विभागात आपला ईमेल आय डी टाकून Subscribe करावे. आपणास नवीत माहिती ईमेल वर उपलब्ध होईल.
धन्यवाद...


7 Comments
Good work
ReplyDeleteAll information in one place.
ReplyDeleteThanks ..
DeleteVery good work Jagdish
ReplyDeleteVariety of information and link at one site
Really fantastic and useful
Thanks Sir
DeleteVery good initiative jaggu
ReplyDeleteThanks
Delete