महाराष्ट्राची नदीप्रणाली


महाराष्ट्र राज्यात  अनेक महत्वपूर्ण नद्या आहेत. महाराष्ट्राच्या नदीप्रनालीचे सर्वसाधारणपणे ४ प्रकारात वर्गीकरण करता येऊ शकते. ते पुढीलप्रमाणे

१) पठारावरून वाहणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या (उदा. गोदावरी, भीमा, कृष्णा, पैनगंगा)
२) उत्तर महाराष्ट्रातून वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्या (उदा. नर्मदा, तापी, पूर्णा)
३) कोंकणातून वाहणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्या (उदा. उल्हास, वैतरणा, सावित्री, वशिष्ठी, दमणगंगा, तेरेखोल, तानसा, शास्त्री, पाताळगंगा इ.)
४) पूर्व विदर्भातून वाहणाऱ्या दक्षिण वाहिनी नद्या (उदा. वर्धा, वैनगंगा, इंद्रावती इ.)

* प्रमुख नद्या व जलविभाजक
महाराष्ट्र पठारावरून वाहणाऱ्या नद्यांमध्ये काही पर्वतरांगा जलविभाजाकाचे कार्य करतात. महाराष्ट्राच्या नदीप्रणालीचा प्रमुख जलविभाजक म्हणून सह्याद्री पर्वत रांग ओळखली जाते. सह्याद्री पर्वतामुळे महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नद्यांचे पूर्ववाहिनी व पश्चिम वाहिनी नद्या असे वर्गीकरण केले जाते. तसेच पठारावरील नद्या या एकमेकींपासून काही पर्वतरांगांमुळे अलग झालेल्या आहेत. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे-

* पर्वतरांगा व नद्या
(नद्या ज्या दिशेला वाहतात त्या दिशेला त्यांना चलित स्वरुपात दाखविल्या आहेत.)
← पश्चिम वाहिनी नद्या
पूर्व वाहिनी नद्या →
विंध्य पर्वत
नर्मदा नदी
सातपुडा पर्वत
तापी नदी
उत्तर कोकणातील नद्या
ह्या
द्री


र्व


मुख्य 
जल
विभाजक
सातमाळा अजिंठा रांग
दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, काळू, भातसई, उल्हास, मुरबाडी
गोदावरी नदी, पैनगंगा
मध्य कोकणातील नद्याहरिश्चंद्र बालाघाट रांग
पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, भोगवती, वशिष्ठी, शास्त्री, जगबुडी, जोग, बाव
भीमा नदी, मुळा, मुठा, निरा
दक्षिण कोकणातील नद्याशंभु महादेव रांग
काजवी,काजळी,आचरा, देवगड, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल
कृष्णा नदी, कोयना नदी
दक्षिण वाहिनी नद्या
वर्धा, वैनगंगा, इंद्रावती

* महत्वाचे मुद्दे
  • पूर्ववाहिनी नद्या दख्खन पठारावरून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळतात. त्यामुळे त्यांना बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या असे देखील म्हणतात.
  • पश्चिमवाहिनी नद्या अरबी समुद्रास मिळतात. त्यामुळे त्यांना अरबी समुद्रास मिळणाऱ्या नद्या असेही म्हणतात.
  • महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी (महाराष्ट्रात - 668 किमी/ एकूण लांबी - 1465 किमी)
  • संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचा 49% भाग व्यापलेला आहे. (जवळपास निम्मे)
  • महाराष्ट्रातून दोनदा वाहणाऱ्या नद्या - गोदावरी, मांजरा, तापी
  • प्राणहिता नदी - वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संयुक्त प्रवाह
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी - तापी (208 किमी)
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी - वर्धा (455 किमी)
  • खचदरीतून वाहणाऱ्या नद्या - तापी, नर्मदा
  • प्रवरा नदी अमृतवाहिनी म्हणून प्रसिद्ध आहे.
  • गोदावरी नदीला वृद्धागंगा/दक्षिणगंगा असेही म्हणतात.
  • प्रकाशे (शहादा) - खानदेशची काशी
  • उत्तरेस कालीभितचे डोंगर आणि दक्षिणेस मेळघाट व गाविलगड डोंगर या दरम्यान तापी नदी वाहते.
  • अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद्द - तापी नदी
  • बिहडची निर्मिती - तापी नदी
  • बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद्द निर्माण करणारी नदी - मांजरा
  • चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याची उत्तर-दक्षिण सरहद्द निर्माण करणारी नदी - वैनगंगा
  • वाशीम व यवतमाळ जिल्ह्याची दक्षिण सरहद्द - पैनगंगा नदी
  • यवतमाळच्या पूर्व सरहद्दीवर बल्लारपूर येथे वर्धा नदीला पैनगंगा नदी मिळते.
  • प्राणहिता (वर्धा व वैनगंगा नदीचा संयुक्त प्रवाह) 117 किमी महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची सरहद्द निर्माण करते.
  • वर्धा व अमरावती जिल्ह्याची तसेच यवतमाळ जिल्ह्याची पूर्व सरहद्द - वर्धा नदी
  • कोल्हापूर जिल्ह्याची उत्तर सरहद्द - वारणा नदी
  • वर्धा व पूर्णा नद्या अगदी तकलादू जलविभाजाकाने वेगळ्या झालेल्या आहेत.
  • आंबेजोगाई जवळ मांजरा नदीचे नदीचौर्य करणारी नदी - वाण
  • कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायीनी - पंचगंगा नदी
  • पठारावरील सर्वात प्रदूषित नदी - पंचगंगा
  • कोकणातील सर्वात प्रदूषित नदी - पातळगंगा 
  • पंचगंगा = कुंभी, कासारी, तुळशी, भोगवती, सरस्वती(गुप्त नदी)
  • भीमा नदी खोऱ्यात पुणे व सोलापूर जिल्ह्यांचा पूर्णपणे समावेश होतो.
  • बालाघाट डोंगराच्या उत्तरेस गोदावरी नदी तर दक्षिणेस भीमा नदी वाहते.
  • उजनी धरण - निरा+भीमा नदीजोड प्रकल्प (सोलापूर)
  • कोकणातील नद्या या लांबीने कमी व तीव्र गतीने वाहणाऱ्या आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या
नदीचे नावलांबीउगमउपनद्या
गोदावरी668 किमी
(एकूण-1465 किमी)
ब्रह्मगिरी टेकडी, त्र्यंबकेश्वर (नाशिक)दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा
कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा
प्राणहिता, इंद्रावती
भीमा451 किमी
(एकूण-860 किमी)
भीमाशंकर
(पुणे)
भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, पवना, कऱ्हा, नीरा, मण, बोर
कुकडी, पुष्पावती, सीना, वेळ, घोड
कृष्णा282 किमी
(एकूण-1400 किमी)
महाबळेश्वर
(सातारा)
भीमा, कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा,दुधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी
येरळा
तापी208 किमी
(एकूण-724 किमी)
मुलताई टेकड्या,
बैतुल जिल्हा (म.प्र.)
चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानुर, नंद, वान
कापरा, सिपना, पेढी, काटेपुर्णा, मोर्णा,  माण, नळगंगा, वाघुर, गिरणा, बोरी, पांझरा, बुराई
नर्मदा54 किमी
(एकूण-1312 किमी)
मैकल टेकड्या,
मध्य प्रदेश
नंदुरबारची वायव्य सरहद्द
वर्धा455 किमी

सातपुडा रांगेत,
बैतुल जिल्हा (म.प्र.)
वेमला, विदर्भा, निरगुडा, रामगंगा 
कार, बोर, नंद, इरई
वैनगंगा300 किमी

मैकल रांगेत, दरकेसा टेकड्यांवर, भाकल येथे
शिवनी जिल्हा (म.प्र.)
कन्हान, पेंच, बाघ, नाग, अंधारी, सूर, गाढवी
पैनगंगा किमीअजिंठा टेकडी,कयाधू,
पूस, अडाण, आरणा, वाघाडी, खुनी


* नद्यांचे व त्यांचे संगम ठिकाणे
  • तापी  + बुराई = शिंदखेडा
  • तापी + पांझरा = मुडावद (धुळे)
  • तापी + पूर्णा = श्रीक्षेत्र चांगदेव - मुक्ताबाई  (मुक्ताईनगर)
  • तापी + गोमती = प्रकाशे-शहादा (नंदुरबार) - खान्देशची काशी
  • वर्धा + वैनगंगा = चपराळा (पुढे प्राणहिता नावाने वाहते)
  • वर्धा + पैनगंगा = वाढा,घुग्गुसजवळ(चंद्रपूर)
  • वर्धा + रामगंगा = रामतीर्थ (यवतमाळ)
  • वैनगंगा + सूर = भंडारा (भंडारा)
  • कुकडी + घोड = शिरूर (पुणे)
  • मुळा + मुठा = पुणे
  • प्रवरा + मुळा = नेवासे (अहमदनगर)
  • प्रवरा + महाळूंगी = संगमनेर (अहमदनगर)
  • कृष्णा + कोयना = कराड (सातारा) - प्रीतीसंगम
  • कृष्णा + भीमा = कुरुगुड्डी(कर्नाटक)
  • कृष्णा + वेण्णा = माहुली (सातारा)
  • कृष्णा + पंचगंगा = नृसिंहवाडी/नरसोबाची वाडी (दत्ताचे जागृत ठिकाण) - कोल्हापूर
  • कृष्णा + वारणा = हरिपूर (सांगली)
  • कृष्णा + येरळा = भिलवडी (सांगली)
  • भीमा + सीना = कुंडल (सोलापूर)
  • भीमा + (मुळा + मुठा संयुक्त प्रवाह)  = रांजणगांव (पुणे)
  • गोदावरी + प्रवरा = टोके (अहमदनगर)
  • गोदावरी + कांदवा = नांदूर-मधमेश्वर (नाशिक)
  • गोदावरी + प्राणहिता = सिरोंचा (गडचिरोली)
  • कन्हान + पेंच = कामठी
  • पैनगंगा + पूस = हिवरा (यवतमाळ)
  • पैनगंगा + वर्धा = जुगद (यवतमाळ)
  • सावित्री + गांधार = महाड (रायगड)

* नदी काठची प्रमुख शहरे 
  • गोदावरी - नाशिक, पैठण, नांदेड, गंगाखेड, कोपरगाव
  • इरई - चंद्रपूर
  • धाम - पवनार
  • नाग - नागपूर 
  • वर्धा - राजुरा, घुग्गुस
  • वैनगंगा - भंडारा, पवनी, गडचिरोली, अहेरी, सिरोंचा
  • पैनगंगा - मेहेकर (बुलढाणा)
  • पूस - पुसद, महागाव (यवतमाळ)
  • वाघाडी - घाटंजी (यवतमाळ)
  • खुनी - पांढरकवडा (यवतमाळ)
  • तापी - भुसावळ, सारंगखेडा, सुरत
  • पांझरा - धुळे
  • मोरणा - अकोला
  • मास - शेगाव
  • नळगंगा - मलकापूर(बुलढाणा)
  • कान - साक्री गाव
  • अरुणावती - शिरपूर
  • गोमती - शहादा
  • तितूर - चाळीसगाव (जळगाव)
  • भीमा - पंढरपूर
  • निरगुडा - वणी गांव
  • बिंदुसरा - बीड
  • बुराई - शिंदखेडा
  • कृष्णा - वाई, कराड, सांगली
  • इंद्रायणी - देहू, आळंदी
  • कऱ्हा - जेजुरी
  • जोग - दापोली (रत्नागिरी)
  • अंबा नदी - पाली (अष्टविनायक) - रायगड
  • काजवी - राजापूर
  • भोगवती - पेण (रायगड)
  • भातसाई - शहापूर (ठाणे)
  • उल्हास - कर्जत (रायगड)
  • सावित्री - पोलादपूर (रायगड)
  • कुंडलिका - रोहा (रत्नागिरी)
  • वशिष्ठी - चिपळूण (रत्नागिरी)
  • गड - कणकवली (सिंधुदुर्ग)
*

Post a Comment

2 Comments

  1. Nice very good information and useful for mpsc aspirants. Thanks sir

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. Visit again for more relevant information.

      Delete