महाराष्ट्र : प्रशासकीय भूगोल


* महाराष्ट्राविषयी महत्वाचे :-
* द्विभाषिक मुंबई राज्य स्थापना - 01 नोव्हें 1956 
* महाराष्ट्र राज्याची निर्मिती - 01 मे 1960
* 1 मे - महाराष्ट्र दिन

* महाराष्ट्र निर्मितीवेळी
  • 4 प्रशासकीय विभाग
  • 26 जिल्हे
  • 235 तालुके
* सध्या (दि.01 जानेवारी 2023 रोजी) 
  • 6 प्रशासकीय विभाग 
  • 36 जिल्हे
  • 350 तालुके

* प्रशासकीय विभाग
१) कोकण 
२) पुणे 
३) नाशिक 
४) औरंगाबाद 
५) अमरावती 
६) नागपूर

* महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार- त्रिकोणाकृती
* महाराष्ट्र पठार बेसाल्ट खडकापासून बनलेले
* पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होते.
* पूर्व-पश्चिम विस्तार सुमारे 800 किमी 
* उत्तर-दक्षिण विस्तार सुमारे 720 किमी
* महाराष्ट्रास 720 किमीचा समुद्रकिनारा
* सर्वाधिक समुद्रकिनारा - रत्नागिरी(237 किमी)

* महाराष्ट्राचे स्थान व विस्तार
* महाराष्ट्राचे स्थान उत्तर-पूर्व गोलार्धात  
* अक्षवृत्तीय - 15°44ʺ ते 22°06ʺ उत्तर अक्षांश 
* रेखावृत्तीय - 72°36ʺ ते 80°54ʺ पूर्व रेखांश

* क्षेत्रफळ 
* क्षेत्रफळ - 3,07,713 चौकिमी 
* भारताच्या क्षेत्रफळाशी प्रमाण - 9.36%
* क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक 
१) राजस्थान 
२) मध्यप्रदेश 
३) महाराष्ट्र

* लोकसंख्या
* २०११ जनगणनेनुसार - 11.24 कोटी
* भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण - 9.29%
* लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक 
१) उत्तरप्रदेश (19.98 कोटी) 
२) महाराष्ट्र (11.24 कोटी)

* सरहद्द
* उत्तर सरहद्द - सातपुडा पर्वत, गाविलगड टेकड्या, तापी व नर्मदा नदी
* दक्षिण सरहद्द - तेरेखोल व हिरण्यकेशी नदी
* पूर्व सरहद्द - चिरोळी, भामरागड, सुरजागड टेकड्या
* पश्चिम सरहद्द - अरबी समुद्र

* कोंकण सरहद्द
* उत्तर सरहद्द - दमणगंगा नदी
* दक्षिण सरहद्द - तेरेखोल नदी
* पूर्व सरहद्द - सह्याद्री पर्वत रांगा 
* पश्चिम सरहद्द - अरबी समुद्र

* प्रमुख नद्या
* पूर्व वाहिनी - गोदावरी, भीमा, कृष्णा, मांजरा, पैनगंगा इ.
* पश्चिम वाहिनी - तापी, नर्मदा, कोकणातील नद्या
* सर्वात लांब नदी - गोदावरी 
* गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी - 668 किमी
* गोदावरीची एकूण लांबी - 1465 किमी
* दक्षिणवाहिनी प्रमुख नद्या - वर्धा व वैनगंगा
* पठारावरील सर्वात प्रदूषित नदी - पंचगंगा
* कोकणातील सर्वात प्रदूषित नदी - पातळगंगा

* सर्वोच्च पर्वतशिखरे
१) कळसुबाई(1646 मी)
२) साल्हेर(1567 मी) 
3) महाबळेश्वर(1438 मी)
४) हरिश्चंद्रगड (1424 मी)


* क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
* लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा - पुणे
* सर्वात उत्तरेकडील जिल्हा - नंदुरबार
* सर्वात दक्षिणेकडील जिल्हा - सिंधुदुर्ग
* सर्वात पूर्वेकडील जिल्हा - गडचिरोली

* नदी व पर्वतरांगा (उत्तरेकडून दक्षिणेकडे)
 विंध्य पर्वत 
 नर्मदा नदी
 सातपुडा पर्वत 
 तापी नदी
 सातमाळा अजिंठा रांगा
 गोदावरी नदी
 हरिश्चंद्र बालाघाट रांगा
 भीमा नदी
 शंभु महादेव रांगा
 कृष्णा नदी/कोयना नदी


* महाराष्ट्राचे जिल्हे, तालुके व संकेतस्थळे
आपल्याला ज्या जिल्ह्याची माहिती हवी आहे त्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा व संबंधित जिल्ह्याविषयी संपूर्ण अधिकृत माहिती मिळवा..

* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची अधिकृत संकेतस्थळे *
अ. क्र.जिल्ह्याचे नावतालुकेप्रशासकीय विभागविभाग
नाशिक१५नाशिकनाशिक विभाग
जिल्हे - ५
तालुके - ५४
जळगाव१५
धुळे०४
नंदुरबार०६
अहमदनगर१४
पुणे१४पुणेपुणे विभाग
जिल्हे - ५
तालुके - ५८
सातारा११
सांगली१०
सोलापूर११
१०कोल्हापूर१२
११पालघर०८कोंकणकोंकण विभाग
जिल्हे - ७
तालुके - ४७+०३=५०
१२ठाणे०७
१३मुंबई शहर००
१४मुंबई उपनगर०३
१५रायगड१५
१६रत्नागिरी०९
१७सिंधुदुर्ग०८
१८औरंगाबाद०९औरंगाबादऔरंगाबाद विभाग
जिल्हे - ८
तालुके - ७६
१९जालना०८
२०परभणी०९
२१हिंगोली०५
२२बीड११
२३उस्मानाबाद०८
२४लातूर१०
२५नांदेड१६
२६अमरावती१४अमरावतीअमरावती विभाग
जिल्हे - ५
तालुके - ५६
२७अकोला०७
२८वाशीम०६
२९बुलढाणा१३
३०यवतमाळ१६
३१नागपूर१४नागपूरनागपूर विभाग
जिल्हे - ६
तालुके - ६४
३२वर्धा०८
३३भंडारा०७
३४गोंदिया०८
३५चंद्रपूर१५
३६गडचिरोली१२


जिल्हा परिषद
महाराष्ट्रात सध्या एकूण 36 जिल्हे असून 34 जिल्हा परिषदा आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हे संपूर्ण नागरी वस्तीचे असल्यामुळे तिथे जिल्हा परिषदा नाहीत. हे दोन जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात आहेत. सर्वात नविन म्हणजेच 34 वी जिल्हा परिषद म्हणून पालघर जिल्हा परिषद अस्तित्वात आलेली आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती 01 ऑगस्ट 2014 रोजी झाल्याने तेथे नविन जिल्हा परिषद देखील अस्तित्वात आली.

खाली दिलेल्या जिल्हा परिषदेच्या नावावर क्लिक करून संबंधित जिल्हा परिषदेची अधिकृत माहिती जाणून घ्या.

* महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा *
20) बीड


जिल्हा परिषद हा पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च घटक असून त्याखाली पंचायत समिती ही तलुका पातळीवरील तर ग्रामपंचायत ही गाव पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे.

Post a Comment

0 Comments