achसध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे असे म्हटले जाते. तर काही याला कॉम्प्युटरचे युग असे देखील म्हणतात. यावरून आपणास लक्षात येईल कि भविष्यात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर होईल. आणि संगणकाशिवाय कोणतेही तंत्रज्ञान शक्य नाही. परंतु आपल्यातील काहींना नेमक संगणक असते काय ? त्याचे कार्य कसे चालते? त्याची वैशिष्ट्ये कोणती? इत्यादी गोष्टींची फारशी माहिती नसते. त्यामुळे संगणका बाबत संपूर्ण माहिती आपण जाऊन घेणार आहोत.

* संगणक म्हणजे काय ?
संगणकाला इंग्रजी भाषेत कॉम्प्युटर (Computer) असे म्हणतात. Computer हा शब्द Compute या इंग्रजी शब्दापासून तयार झालेला आहे. याचा अर्थ आकडेमोड करणे किंवा गणना करणे असा होतो. संगणकाचाशोध लागला त्यावेळी कॉम्प्युटर या शब्द प्रचलित होता. तसेच त्यावेळी संगणकाचा वापर मुख्यत: आकडे मोड़ करण्यासाठीच केला जात असे म्हणजेच सध्या जसे आपण कॅल्क्युलेटरचा उपयोग करतो अगदी त्याचप्रमाणे संगणकाचा त्यावेळी उपयोग केला जात असे. परंतु काळानुसार यात अनेक सुधारणा होत गेल्या आणि सध्या जर आपण यावर दृष्टीक्षेप टाकला तर लक्षात येईल की जवळपास सर्वच क्षेत्रात संगणकाशिवाय कामे होत नाहीत.
* संगणकाची व्याख्या
संगणक म्हणजे एक असे इलेक्ट्रॉनिक उपकरण ज्याद्वारे ते वापरकर्त्याकडून माहिती आदान (Input) करते, दिलेल्या सूचनांप्रमाणे त्यावर प्रक्रिया (Process) करते व त्यापासून पुन्हा प्रक्रिया केलेली माहिती प्रदान (Output) करते.
संगणक म्हणजे एक असे इलेक्ट्रॉनिक उपकरण ज्याद्वारे ते वापरकर्त्याकडून माहिती आदान (Input) करते, दिलेल्या सूचनांप्रमाणे त्यावर प्रक्रिया (Process) करते व त्यापासून पुन्हा प्रक्रिया केलेली माहिती प्रदान (Output) करते.
A computer is an electronic device which accepts data as a input from user, process it according to given instructions and gives desire output to user.
Input → Process → Output
* संगणकाचा इतिहास (History of Computer)
प्राचीन काळी बँबिलोनियन संस्कृतीत चीनमध्ये अंक मोजणीसाठी "अबँकस"(ABACUS) नावाच्या यंत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात होता. हे यंत्र आपण लहानपणी मण्यांची पाटी बघितलेली असेलच त्या पद्धतीचे होते. परंतू या यंत्रात खूप त्रुटी होत्या. यात गुणाकार, भागाकार करणे शक्य नव्हते. केवळ बेरीज व वजाबाकी साठी हे यंत्र वापरले जात होते.
पुढे चार्ल्स बॅबेज यांनी सर्वप्रथम गणिती आकडेमोड करण्यासाठी वेगवान यंत्र तयार केले. त्या यंत्रास "Differential Engine" असे नाव देण्यात आले. हेच यंत्र आज संगणकाचा पाया समजले जाते व म्हणून त्याला जगातील पहिले संगणक देखील म्हटले गेले. आजही चार्ल्स बॅबेज यांनी तयार केलेले हे यंत्र आपणास कॅलीफोर्नियातील वस्तू संग्रहालयात पहावयास मिळू शकते."Differential Engine" चा वापर करीत असतानाच त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या व पुढे चार्ल्स बॅबेज यांनी 1871 मध्ये "Analytical Engine" तयार केले. या Analytical Engine चे मुख्य पाच भाग होते. त्यापैकी पहिला भाग माहिती साठविण्यासाठी, दुसरा भाग आकडेमोड करण्यासाठी, तिसऱ्या भागात माहिती स्वीकारणे, चौथा भाग उत्तरे दाखविण्यासाठी व पाचवा भाग हा इतर चारही भागांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत असे. चार्लस बॅबेज यांनी 1871 मध्ये तयार केलेले Analytical Engine हा आधुनिक संगणकाचा पाया आहे असे समजण्यात आले व त्याच कारणामुळे चार्लस बॅबेज यांना 'संगणकाचा जनक' (Father of Computer) असे म्हटले जाऊ लागले.
पुढे चार्ल्स बॅबेज यांनी सर्वप्रथम गणिती आकडेमोड करण्यासाठी वेगवान यंत्र तयार केले. त्या यंत्रास "Differential Engine" असे नाव देण्यात आले. हेच यंत्र आज संगणकाचा पाया समजले जाते व म्हणून त्याला जगातील पहिले संगणक देखील म्हटले गेले. आजही चार्ल्स बॅबेज यांनी तयार केलेले हे यंत्र आपणास कॅलीफोर्नियातील वस्तू संग्रहालयात पहावयास मिळू शकते."Differential Engine" चा वापर करीत असतानाच त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या व पुढे चार्ल्स बॅबेज यांनी 1871 मध्ये "Analytical Engine" तयार केले. या Analytical Engine चे मुख्य पाच भाग होते. त्यापैकी पहिला भाग माहिती साठविण्यासाठी, दुसरा भाग आकडेमोड करण्यासाठी, तिसऱ्या भागात माहिती स्वीकारणे, चौथा भाग उत्तरे दाखविण्यासाठी व पाचवा भाग हा इतर चारही भागांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत असे. चार्लस बॅबेज यांनी 1871 मध्ये तयार केलेले Analytical Engine हा आधुनिक संगणकाचा पाया आहे असे समजण्यात आले व त्याच कारणामुळे चार्लस बॅबेज यांना 'संगणकाचा जनक' (Father of Computer) असे म्हटले जाऊ लागले.
त्यानंतर काही वर्षांनी बऱ्याच संशोधनानंतर यात विविध सुधारणा करण्यात येऊन हॉवर्ड एकीन यांनी 1944 मध्ये Mark-I या संगणकाची निर्मिती केली. या संगणकामध्ये सुमारे 300 व्हॅक्युमट्यूब्सचा वापर करण्यात आला होता. आणि त्यालाच "पहिले इलेक्ट्रानिक डिजीटल कॉम्प्युटर" (First Electronic Digital Computer) असे म्हटले गेले.
दुसऱ्या महायुद्धानंतर संगणक युगात क्रांती आली. 1943-46 ह्या कालावधीत अमेरिकन सैनिक श्री. जे.पी. इकर्ट आणि श्री. जॉन मॉयली यांनी Electronic Numerical Integrator And Calculator (ENIAC) या नावाचा एक संगणक तयार केला. या संगणकाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या निर्मितीमध्ये सुमारे 18000 व्हॅक्युम ट्यूब्स, 10000 कॅपॅसिटर्स, आणि 70000 रेजिस्टर्सचा उपयोग करण्यात आला. तसेच हा संगणक भल्या मोठ्या आकाराचा होता. रुंदी 30 फूट, लांबी 50 फूट, वजन 30 टन इतके जास्त होते. त्याला चालनासाठी 1,50,000 वॅट विद्युतशक्ती लागत होती. हा संगणक आधीच्या यंत्रांपेक्षा अधिक वेगवान होता परंतु त्यात एक उणीव होती ती म्हणजे यात माहिती सुरक्षित साठवून ठेवण्याची कोणत्याही प्रकारची सोय नव्हती.
इकर्ट व मॉयली यांनी तयार केलेल्या ENIAC संगणकाच्या उणीवा भरून काढण्यासाठी श्री. जॉन वॉंन न्यूमन यांनी 1947 मध्ये Electronic Discrete Variable Automatic Computer(EDVAC) हा संगणक तयार केला. यामध्ये माहिती साठवून ठेवण्याची कार्यप्रणाली होती. याच्या निर्मितीमध्ये सुमारे 6000 व्हॅक्युमट्यूब्स चा वापर करण्यात आला. तसेच या संगणकाचे वजन 7850 किलो तुलनेने इतके कमी होते.
1949 मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ प्रोफेसर मॉरिस विल्किज यांनी Electronic Delay Storage Automatic Calculater(EDSAC) हे संगणकीय यंत्र तयार केले.
त्यानंतर 1951 मध्ये The Universal Automatic Computer-I (UNIVAC-I) हा प्रथम डिजिटल संगणक तयार करण्यात आला. आणि या प्रकारची अनेक संगणके त्यावेळी तयार करण्यात येऊन संगणक युगाची भरभराट सुरु झाली तसेच संगणकाच्या विकासामध्ये अजून भर पडली. पुढे 1952 मध्ये IBM कंपनीने '701' नावाचे व्यापारी संगणक विक्रीकरिता उपलब्ध करून दिलेत तर 1953 मध्ये याच कंपनीने अधिक वेगवान व हाताळण्यास सोईस्कर असे IBM 650 या नावाचे सुमारे 1000 संगणक विक्री विक्री करून सर्वसामान्यांना संगणक वापरता येऊ शकते हे सिध्द केले.
1947 मध्ये ट्रांझिस्टरचा शोध लागल्यामुळे संगणक क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली व 1959 पासून ट्रांझिस्टरचा वापर संगणकात केला जाऊ लागला. त्यामुळे संगणकाचा आकार देखील लहान करता येऊ लागला.
* संगणकाच्या पिढ्या (Generation of Computer)
संगणकाच्या वेगवेगळ्या पिढ्या आहेत. या पिढ्यांनुसार संगणकाची कोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत. प्रत्येक पुढच्या पिढीत वेगवेगळे तंत्रज्ञान वापरलेले असून संगणकाची प्रगती झालेली आहे.
* पहिली पिढी (1940 - 1956)
- संगणकाच्या पहिल्या पिढीत व्हॅक्यूम ट्युबचा (निर्वात पोकळी) वापर करण्यात आला होता.
- या पिढीतील संगणकाचा आकार अगदी मोठा असून तो एखाद्या खोली एवढा होता.
- संगणकाची कार्य करण्याची गती कमी होती व ती मिलीसेकंदामध्ये मोजली जात असे.
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इ. गणितीय क्रिया करण्यसाठी वापर.
- जास्त प्रमाणात वीजपुरवठा लागत असे.
- या पिढीतील संगणकाची किंमत खूप जास्त होती.
- संगणक काही वेळाने खूप गरम होत असल्याने AC सारखी उपकरणे कायमस्वरूपी वापरावी लागत.
* दुसरी पिढी (1957 - 1963)
- संगणकाच्या दुसऱ्या पिढीत ट्रान्झिस्टरचा वापर करण्यात आला होता.
- ट्रान्झिस्टरचा वापरामुळे आकार पहिल्या पिढीच्या संगणकापेक्षा खूप कमी झाला. जवळपास एखाद्या कपाटाएवढा या संगणकाचा आकार होता.
- संगणकाची कार्य करण्याची गती वाढली व मायक्रोसेकंदामध्ये मोजली जाऊ लागली.
- मेमरी स्टोरेजसाठी मँग्नेटीक टेपचा व डिस्कचा वापर.
- पहिल्या जनरेशनपेक्षा कमी प्रमाणात वीज वापर.
- पहिल्या पिढीच्या तुलनेने स्वस्त.
- पंच कार्ड आणि प्रिंटरचा वापर इनपुट व आऊटपुट डिव्हाईस म्हणून केला गेला.
- Assembly Language चा वापर
* तिसरी पिढी (1964 - 1971)
- IC चा वापर (IC - Integrated Circuit - इंटीग्रेटेड सर्किट)
- रिमोट शेअरिंग रिअल टाईम मल्टीप्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर.
- मल्टीप्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीमुळे एकाचवेळी अनेक कामे करता येऊ लागली म्हणजेच वेगवेगळे अप्लिकेशन एकाच वेळी वापरता येऊ लागले. यामुळे कार्य करण्याची गतीत मोठी वाढ झाली व ती नँनो सेकंद मध्ये मोजण्यास सुरुवात झाली.
- Assembly Language ऐवजी High Level Language चा वापर.
- संगणकाचा आकार अगदी लहान होऊन एका टेबलवर सहज बसेल इतका लहान झाला.
- कीबोर्ड व मँनिटर हे इनपुट व आऊटपुट डिव्हाईस पंच कार्ड व प्रिंटरच्या ऐवजी वापरण्यात आले.
* चौथी पिढी (1972 पासून आजपर्यंत )
- सेमिकडक्टर ऐवजी मँग्नेटीक कोड मेमरीमुळे काम करण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला.
- संगणक एकमेकांना जोडण्याची प्रणाली विकसित झाल्यामुळे अवघे जग जोडले गेले.
- मँग्नेटीक डिस्कची साठवण क्षमता देखील वाढली.
- नवनवीन ऑपरेटिंग सिस्टीम विकसित झाल्यामुळे अनेक गोष्टी सहज वापरता येऊ लागल्या.
- ग्राफिकल युसर इंटरफेस (GUI) चा वापर वाढला असून समजण्यास सोपे झाले.
- संगणकाच्या आकारात अमुलाग्र बदल घडून आले व अगदी हाताच्या तळव्यावर बसतील एवढे लहान संगणक तयार झाले.
* पाचवी पिढी (आजपासून ते भविष्यकालीन)
भविष्यातील संगणक व तंत्रज्ञान हे मुख्यतः आर्टीफ़िशीअल इटेलीजंस (AI) वर आधारित असेल. AI म्हणजे संगणकामध्ये विचार करण्याची क्षमता असेल व त्यांना कोणत्याही सूचना देण्याची आवश्यकता नसेल. सध्याचे जग हे AI वर आधारित तंत्रज्ञानावर संशोधनात गुंतलेले आहे व त्याची काही उदाहरणे आपण पाहिल्याचे किंवा ऐकल्याचे आपणास माहित आहेत.
उदा. चालकाशिवाय वाहन चालवणे, कोणतेही महत्वाचे निर्णय स्वतः घेणे, केवळ धोक्याची सूचना न देता त्यावर स्वतः उपाययोजना करणे इ कामे ही AI वर आधारित तंत्रज्ञानात असतील.
--------------------------------------------------------------------
* संगणकाबाबत अधिक जाणून घ्या.
|
|---|
पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा आणि खाली Comment Box मध्ये किंवा अभिप्राय विभागात अभिप्राय नोंदवा. ईमेल द्वारे गिरीजा अकॅडमीशी जुडा आणि भरपूर महत्वपूर्ण माहिती मिळवा.

0 Comments