| * श्री समर्थ सुकनाथ बाबा मंदिर (वर्डी) * |
|---|
अडावद पासून वायव्येला ११ किमी तर चोपडा पासुन ईशान्येला १३ कि मी अंतरावर सातपुडाच्या पायथ्याशी असलेले वर्डी गावाचे आराध्य दैवत व तालुक्याचे श्रध्दास्थान असलेले श्री समर्थ सुकनाथ बाबांचे देवस्थान हे जिल्ह्यातील एक विशेष प्रसिध्द ठिकाण आहे. या ठिकाणी नेहमी मोठ्या संख्येने भाविक गण भेट देत असतात. तसेच बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तर येथे मोठ्या यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी सकाळी ७ वा आरती, ८ वा मारोती अभिषेक, ९ वा समाधी अभिषेक, १० वा समाधी स्नान, ११ वा होम हवन, दुपारी १२ वा आरती, दुपारी १ ते रात्री ७ वाजेपर्यत महाप्रसाद भोजन, ७ वा आरती, ८ वाजेपासुन पालखी मिरवणुक व रात्री ९ वा भजन, कीर्तन व भारुडाचा कार्यक्रम अशा पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम साजरे केले जातात.
श्री समर्थ सुकनाथ बाबांच्या या पावनभुमीत दर्शन व महप्रसादासाठी लाखो भाविक येत असल्याने कोणाचीही गैरसोय होवु न देता सर्व जाती धर्माचे लोक आपआपल्या परिने कामे करुन भंडा-याचे नियोजन करीत असतात. येथील भंडा-याकडे (महाप्रसाद) तालुक्यासह संपूर्ण जिल्हाचे लक्ष लागलेले असते. सन १९३५ पासून भंडाऱ्याची सुरुवात ७ किलो गव्हापासून झाली होती. या कार्यक्रमाला जिल्ह्यासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या शेजारील राज्यातुन देखील लाखो भाविक येवुन दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेत असतात. १२५ पोते गव्हाची बट्टी, वरण, वांग्याची भाजीचा महाप्रसाद भंडाऱ्याच्या दिवशी परिसरातील सर्व ग्रामस्थ जातीय सलोख्याचे उदाहरण देत बनवित असतात. संपूर्ण गावातील महीलांसह, लहान मोठे रात्रंदिवस आपसातील मतभेद विसरुन, कोणताही हेवादावा न करता आपआपली जबाबदारी पार पाडत असतात. तसेच येथील भंडाऱ्याचे आणखी एक महत्व म्हणजे कोणी एकाने भंडाऱ्यासाठी दिलेले दान विश्वस्त स्वीकारत नाहीत. सर्वांचा हातभार लागावा व या अन्नदानाच्या महाउत्सवात सर्वाचे योगदान लाभावे हा त्यामागील उद्देश असतो.
तसेच दरबाराच्या मंदिरावर भव्य नेत्रदिपक रोषणाई करून परिसर आल्हाददायक केलेला असतो. तसेच रात्री निघणारी पालखी सोहळा देखील डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. भंडा-यासाठी तसेच दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी चोपडा, जळगाव, यावल, अडावद या ठिकाणाहुन जादा बसेसची व्यवस्था चोपडा आगाराकडुन करण्यात आलेली असते, तर अडावद पोलीस स्टेशन कडुन संपुर्ण अवैघ वाहतुक बंद करुन, कार्यक्रमात चोख बंदोबस्त ठेवुन सहकार्य करीत असतात.
* आख्यायीका
श्री समर्थ सुकनाथ बाबांचे वडीलांचे नाव सज्जननाथ होते. ते गावोगावी फिरुन नाथ संप्रदायाचा प्रचार व प्रसार करीत माधुकरी मागुन आपला चरितार्थ चालवित. लोंकाच्या मते श्री सुकनाथ बाबा हे सज्जननाथांना नर्मदा किनारी पाण्यावर तरंगत मिळालेचे म्हणले जाते. त्यांचे जन्माचे रहस्याचे कोडे कोणालाही माहीत नाही. त्याचे बालपण चुंचाळे ता. यावल येथे गेले. नंतर वर्डी येथे छोट्याशा कुटीयात राहुन आपली कर्म भुमी बनविली. ते बाल वयातच गावोगावी फिरुन भिक्षा मागत असत. बालवयापासुनच त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या दैवी शक्तीचा चमत्कार लोकांना दाखवित असत. गोरगरीबांना आजारातुन मुक्त करणे, येणारे संकटाचे संदेश देणे, पक्ष्यांची बोली भाषा देखील त्यांना समजत असे. तसेच बाबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपलेसे करुन त्यांना भक्ती मार्गाचे वेड लावले. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांचे संसार सुधारल्याने त्यांचे अनेक भक्तगण जमले. त्यांनी १९३५ साली जिवंत समाधी घेतली.
समर्थ सुकनाथ बाबा नंतर त्यांचे पुत्र परमपुज्य रघुनाथ बाबांनी नाथ संप्रदायाची भगवी पतका हाती घेवुन "गुप्त से मुक्त प्रगट सो पसारा" प्रमाणे बाबांचे कार्य पुढे सुरु ठेवुन छोट्या कुटीयाचे रुपांतर भव्य दरबारात केले व भक्तांना भजन, किर्तन, ओढ लावुन शिक्षण व ज्ञानदानानचे कार्य सुरु ठेवले. त्यांनी देखील १९७९ मध्ये जिवंत समाधी घेतली. पुढे दरबाराची गादी वारसा जगन्नाथ बाबांनी चालवुन हरी नामाचा गजर अखंडीत सुरु ठेवले त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र दिनानाथ (भैय्या) महाराज मठाधिपती म्हणून सध्या कार्य करीत आहेत.
* कसे पोहचता येईल ?
श्री समर्थ सुकनाथ बाबांच्या दरबारात (वर्डी) पोहोचण्यासाठी चोपडा या तालुक्याच्या ठिकाणाहून तसेच जळगाव येथून वेळोवेळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध असतात. वर्डी हे ठिकाण बऱ्हाणपूर - अंकलेश्वर या राज्य मार्गापासुन आत उत्तरेकडे सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. चोपडा - अडावद दरम्यान वर्डी फाट्यापासून आत 3 किमी जावे लागते.
चोपडा येथून- सकाळी ०६:००, ०७:००, ०८:००, १०:३०, ११:३० दु. १२:३०, ०२:००, ०४:३०, ०५:३०, ०६:३० वा.
जळगाव येथून- संध्याकाळी ०७:०० वा.
याव्यतिरिक्त दिवसभर चोपडा-यावल/रावेर/बऱ्हाणपूर , चोपडा-जळगाव (विदगाव मार्गे) या मार्गावर जाणाऱ्या बसेस असतात. त्यातून वर्डी फाट्यापर्यंत जाता येते.
* मुक्तेश्वर महादेव मंदिर

* बसेस ची वेळ -

नकाशा मोठा करण्यासाठी नकाशावर क्लिक करा. नकाशा ढोबळमानाने बनविलेला आहे.
* मुक्तेश्वर महादेव मंदिर
मुक्तेश्वर महादेव मंदिर हे चोपडा - यावल रस्त्यावर असून अडावद गावापासून चोपड्याकडे जातांना सुमारे दोन किमी अंतरावर आहे. याठिकाणी महादेवाचे मंदिर तसेच बाल तपस्वी हनुमान मंदिर अशी दोन मंदिरे आहेत. हे ठिकाण चोपडा - यावल रस्त्याच्या कडेलाच असून अतिशय निसर्गरम्य असे शांत वातावरण येथे आहे. याठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिराला स्वच्छ धुऊन काढून महादेवाची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर महादेवाची आरती होऊन महाप्रसादाचा भोग चढवला जातो. याठिकाणी अडावद, रुखनखेडे, चांदसनी तसेच कमळगाव, वडगाव इत्यादी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने हजर राहून महाप्रसादाचा लाभ घेतात. या दिवशी साबुदाण्याची खिचडी प्रसाद म्हणून बनविलेले असते. अनेक दाते महाप्रसादासाठी तसेच इतर कामांसाठी या मंदिराला यथाशक्ति दान करतात.
मुक्तेश्वर महादेवाचे मंदिर चोपड्याकडे जातांना रस्त्याच्या कडेलाच असल्याने येणारे जाणारे अनेक लोक याठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने जात असतात. मंदिराचा परिसर अतिशय शांततामय व प्रसन्न अशा निसर्गरम्य ठिकाणी असून आजूबाजूला फुलझाडांची शेती असल्यामुळे भाविकांना अधिकच आकर्षित करते. अडावद गावातील तसेच परिसरातील अनेक भाविक भक्त येथे नेहमी दर्शनासाठी भेट देत असतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी भाविकांची मोठी गर्दी येथे दर्शनासाठी असते. या दिवशी अनेक जोडपी येथे बेल वाहून महादेवाची विधिवत पूजा करून आरती तसेच मंत्रपुष्पांजली वाहतात. शिवभक्तांसाठी सुंदर, रम्य असे हे ठिकाण दिवसेंदिवस विकसित होत आहे. यासाठी पंचक्रोशीतील भक्त मेहनत घेत आहेत.

* बालतपस्वी हनुमान मंदिर
महादेवाच्या मंदिराच्या शेजारीच बाल तपस्वी हनुमानाचे मंदिर देखील आहे. हनुमान जयंती देखील येथे मोठ्या उत्साहाने व भाविकांच्या प्रचंड अशा जन सागराने साजरी केली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी पूजा अर्चा करून भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. अडावद गावातील तसेच पंचक्रोशीतील असंख्य भाविक आवर्जून येथे दर्शन घेण्यासाठी तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजर असतात. हनुमान जयंतीच्या दिवशी देखील अनेक दाते येथे अन्नदान करतात. तसेच गावातील व परिसरातील भाविक श्रमदान करण्यासाठी देखील रात्रीपासून हजर असतात. हनुमान जयंतीच्या दिवशी येथे प्रचंड अशी भाविकांची गर्दी असते. भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी दूरवरून येथे भाविक येत असतात. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास येथे आरती तसेच विधिवत पूजापाठ केला जातो. त्यानंतर हनुमानास तसेच महादेवास नैवेद्य देऊन भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात येतो.
असे हे मुक्तेश्वर महादेव व बाल तपासणी हनुमान मंदिर भाविक भक्तांसाठी तसेच पंचक्रोशीतील शिवभक्तांसाठी अतिशय रमणीय व प्रसिद्ध ठिकाण आहे.
* कसे पोहचता येईल ?
मुक्तेश्वर महादेव मंदिरावर जाण्यासाठी अडावद गावापासून चोपडा रस्त्याला 2 किमी अंतरावर गवळी नाला लागतो. या नाल्यावरील पुलाच्या अगदी अलीकडेच मंदिराच्या नावाची फळी लावलेली दिसेल. उत्तरेकडे बघितल्यास समोरच सुंदर रंगरंगोटी केलेले मुक्तेश्वर महादेव मंदिर आपल्या नजरेस पडेल. या ठिकाणी जाण्यासाठी आपणास आपल्या खाजगी वाहनानेच जावे लागेल.

0 Comments