भारताचे संविधान - Indian Constitution

Indian constitution

भारताचे संविधान (राज्यघटना) हे जगातील विविध पाश्च्यात्य देशांच्या संविधानाचा अभ्यास करून तयार करण्यात आलेले आहे. यातील विविध तरतुदी या इतर देशांच्या तरतुदींवरून समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आलेला असून त्या दिवशी हजर असणाऱ्या घटना समितीच्या २८४ सदस्यांनी त्यावर सह्या केलेल्या आहेत. तसेच २६ जानेवारी १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आलेली आहे. मूळ राज्यघटना इंग्रजी भाषेत लिहिली गेलेली आहे. राज्यघटनेतील काही कलमे घटना स्वीकृत झाली त्यादिवसापासूनच अंमलात आली तरी उर्वरित कलमे 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आली.

* भारताच्या मूळ राज्यघटनेत प्रस्ताविका, २२ भाग, ३९५ कलमे तर ८ परिशिष्टे/अनुसुचींचा समावेश होता.

* सध्या प्रस्ताविका, २५ भाग (शेवटचा आकडा २२ आहे), ३९५ कलमे तर १२ परिशिष्टे/अनुसुच्या आहेत.

* कलमांचा/अनुच्छेदांचा शेवटचा आकडा ३९५ हाच आहे. पोटकलमे वाढलेली आहेत हे लक्षात घ्यावे.

* भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी २ वर्षे ११ महिने व १८ दिवस एवढा कालावधी लागलेला आहे.

* यादरम्यान संविधान सभेची ११ सत्रे (बैठका) झाली.

* भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी सुमारे ६० लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे.

* राज्यांचे ४ भागात वर्गीकरण असणारा भाग ७ भारताच्या संविधानातून वगळण्यात आलेला आहे.

* मूळ राज्यघटनेत आजपर्यंत एक भाग वगळला असून नविन ४ भाग व ४ परिशिष्टे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मूळ राज्यघटनेतील भाग 7 (राज्यांचे 4 भागातील वर्गीकरण) हा वगळला आहे. तर भाग 4A, 9A, 9B व भाग 14A हे चार भाग नव्याने समाविष्ट केलेले आहेत.

* मसुदा समिती
भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी 29 ऑगस्ट 1947 रोजी एक मसुदा समिती नेमण्यात आली. या समितीत एकूण सात सदस्य होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी राज्यघटनेच्या निर्मितीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष)
२. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
३. एन. गोपालस्वामी अय्यंगार
४. कन्हैयालाल मुन्शी
५. सय्यद मोहम्मद सादुल्ला
६. बी.एल. मित्तल (राजीनामा) नंतर एन. माधवराव
७. डी.पी. खैतान (मृत्यू) नंतर टी. टी. कृष्णम्माचारी

बी. एल. मित्तर यांनी कालांतराने आजारपणामुळे मसुदा समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व त्यांच्या जागी नव्याने एन. माधवराव यांची नेमणूक करण्यात आली. तसेच डी. पी. खैतान यांचे 1948 मध्ये निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागी टी. टी. कृष्णम्माचारी यांची नेमणूक करण्यात आली.


* संविधान सभेतील 15 महिला सदस्य
भारताच्या संविधान सभेमध्ये १५ महिला सदस्यांचा समावेश होता. त्यांची माहिती खाली दिलेली असून त्या कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेल्या होत्या ते देखील कंसात दिलेले आहे. खालील बाबींचा अभ्यास केला असता असे लक्षात येते कि सर्वाधिक 5 महिला या संयुक्त प्रांत म्हणजेच उत्तरप्रदेश मधून निवडून आलेल्या होत्या. त्यानंतर 3 महिला या मद्रास प्रांतातून तर 2 महिला बंगाल प्रांतातून संविधान सभेवर निवडून आलेल्या होत्या.

सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या तर सुचेता कृपलानी या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तसेच विजयालक्ष्मी पंडित या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी असून भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री होत्या. तसेच त्यांनी 1962 ते 1964 या काळात महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देखील पार पाडलेली आहे. याव्यतिरिक्त बेगम ऐझाझ रसूल या एकमेव मुस्लीम महिला प्रतिनिधी होत्या तर दलितांच्या प्रतिनिधी म्हणून दक्षायणी वेलायुदान यांची निवड करण्यात आली होती. दक्षायणी वेलायुदान या भारतातील पहिल्या दलित पदवीधर महिला होत्या. तसेच त्यांना कालांतराने पद्मविभूषण हा भारताचा दुसरा सर्वोच्च सन्मान देखील प्राप्त झाला. अँनी मस्कॅरीन या स्वतंत्र भारतात केरळच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या.
  1. दुर्गाबाई देशमुख (मद्रास)
  2. अम्मू स्वामिनाथन (मद्रास)
  3. दक्षायणी वेलायुदान (मद्रास)
  4. बेगम ऐझाझ रसूल (संयुक्त प्रांत, उत्तरप्रदेश)
  5. कमला चौधरी (संयुक्त प्रांत, उत्तरप्रदेश)
  6. पौर्णिमा बॅनर्जी (संयुक्त प्रांत, उत्तरप्रदेश)
  7. सुचेता कृपलानी (संयुक्त प्रांत, उत्तरप्रदेश)
  8. विजयालक्ष्मी पंडित (संयुक्त प्रांत, उत्तरप्रदेश)
  9. लीला रॉय (बंगाल)
  10. रेणुका रे (बंगाल)
  11. हंसा जिवराज मेहता (बॉम्बे)
  12. मालती चौधरी (ओरिसा)
  13. राजकुमारी अमृत कौर (केंद्रीय प्रांत)
  14. सरोजिनी नायडू (बिहार)
  15. अँनी मस्कॅरीन (त्रावणकोर, कोचीन)


* प्रस्ताविका /  सरनामा / उद्देशिका

* उद्देशिकेबाबत महत्वाचे मुद्दे
  1. उद्देशिकेलाच प्रस्तविका / सरनामा / घटनेचा आत्मा / गुरुकिल्ली / Preamble असेही म्हणतात.
  2. सर्वात आधी अमेरिकेच्या राज्यघटनेत उद्देशिकेचा समावेश करण्यात आला.
  3. प्रास्तविका पं. जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत १३ डिसेंबर १९४६ रोजी मांडलेल्या उद्देश्पत्रावर आधारित आहे.
  4. उद्देशिकेतील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द ४२ वी घटनादुरुस्ती कायदा, १९७६ नुसार मुळ उद्देशिकेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. (उद्देशिकेत निळ्या रंगात दाखविलेले आहेत.)
  5. प्रस्ताविकेत आजपर्यंत केवळ एकदाच ४२ वी घटनादुरुस्ती(१९७६) अन्वये बदल करण्यात आलेला आहे.
  6. घटनेची स्विकृतीची तारीख २६ नोव्हेंबर १९४९ प्रस्ताविकेत समाविष्ट करण्यात आलेली आहे. 
  7. घटनेची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून झालेली आहे.
  8. प्रस्ताविका ही राज्यघटनेचा अविभाज्य घटक असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
  9. प्रस्ताविकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक.. अशी असल्याने लोकांनीच प्रतिनिधींमार्फत यातील तत्वे स्वीकारली आहेत.
  10. प्रस्तविका घटनेच्या सुरुवातीस जरी असली तरी घटना लिहिल्यानंतर ती लिहिली गेलेली आहे.

* उद्देशिकेतील ठराविक शब्दांचे अर्थ 
  • सार्वभौम - कोणत्याही बाह्य शक्तींचा प्रभाव नसणे. पूर्णपणे स्वातंत्र्य असणे.
  • समाजवादी - भारताचा समाजवाद हा लोकशाही समाजवाद आहे. लोकशाही समाजवादात सार्वजनिक क्षेत्रासोबतच खाजगी क्षेत्राचेही सहअस्तित्व असते. मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणे.
  • धर्मनिरपेक्ष - कोणत्याही एका धर्माचे राज्य असणार नाही. कोणत्याही धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही.
  • लोकशाही - डेमोक्रसी. लोकांनी, लोकांचे, लोकांसाठी चालविलेले राज्य. लोकांची सत्ता असणे. भारतात संसदीय लोकशाहीचा स्वीकार करण्यात आलेला आहे.  याला अप्रत्यक्षपणे लोकशाही असेही म्हणतात कारण यामध्ये जनता निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत अप्रत्यक्षपणे कारभारात सामील होते.
  • गणराज्य - गणराज्य म्हणजे राष्ट्रप्रमुख हे वंशपरंपरागत पद धारण करीत नाहीत. ते लोकांमार्फत अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात.

* संविधानाचे भाग, भागनिहाय कलमे
भाग
कलम
तरतुद
भाग 1
कलम 1 ते 4
संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र
भाग 2
कलम 5 ते 11
नागरिकत्व
भाग 3
कलम 12 ते 35
मूलभूत अधिकार
भाग 4
कलम 36 ते 51
राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे
भाग 4A
कलम 51A
मूलभूत कर्तव्ये  (४२ वी घटनादुरुस्ती१९७६ अन्वये)
भाग 5
कलम 52 ते 151
केंद्र सरकार (संघराज्य)
भाग 6
कलम 152 ते 237
राज्य सरकार
भाग 7
-
७ वी घटनादुरुस्ती, अन्वये रद्द
भाग 8
कलम 239 ते 242
केंद्रशासित प्रदेश क्षेत्र
भाग 9
कलम 243 ते 243 O
पंचायतराज – ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद – नगर पंचायत
भाग 9A
कलम 243ते 243ZG
नगरपालिका (घटनादुरुस्ती अन्वये)
भाग 9B
कलम 243ZH ते 243ZT
सहकारी संस्था
भाग 10
कलम 244 ते 244A
अनुसूचित जाती व जमाती प्रदेश/क्षेत्रआदिवासी क्षेत्र
भाग 11
कलम 245 ते 263
केंद्र - राज्य संबंध
भाग 12
कलम 264 ते 300A
महसूल - वित्तमालमत्ताकरार व फिर्याद
भाग 13
कलम 301 ते 307
व्यापारवाणिज्य आणि आंतरराज्य संबंध
भाग 14
कलम 308 ते 323
केंद्र आणि राज्यांतर्गत सेवाप्रशासकीय लोकसेवा आयोग
भाग 14A
कलम 323A, 323B
न्यायाधिकरण
भाग 15
कलम 324 ते 329A
निवडणूक आयोग
भाग 16
कलम 330 ते 342
अनुसूचित जातीजमातीइतर मागासवर्गीयांसाठी आणि अँग्लो इंडियन्ससाठी विशेष सोयी
भाग 17
कलम 343 ते 351
कार्यालयीन भाषा
भाग 18
कलम 352 ते 360
आणीबाणी विषयक तरतुदी
भाग 19
कलम 361 ते 367
संकीर्ण
भाग 20
कलम 368
संविधान दुरुस्ती बाबत
भाग 21
कलम 369 ते 392
अस्थायीसंक्रमाणि (?) आणि विशेष तरतुदी
भाग 22
कलम 393 ते 395
संक्षिप्त रूपेप्रारंभ आणि निरसने



Post a Comment

0 Comments