MPSC परीक्षांच्या अभ्यासाची सुरुवात करण्याआधी

* अभ्यास सुरु करण्याआधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरु करण्याआधी व परीक्षांना प्रत्यक्ष सामोरे जाण्याआधी आपणास खालील काही गोष्टी माहित असणे क्रमप्राप्त ठरते. खालील महत्वपूर्ण गोष्टी जर आपणास माहित असतील तर आपणास अभ्यास कसा करावा?, किती वेळ करावा?, काय वाचावे?, काय वाचू नये? अशा भरपूर गोष्टींची माहिती होईल. जेणेकरून आपला अभ्यास योग्य दिशेने, कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करता येईल याची माहिती आपणास होईल असे माझे वैयक्तिक मत आहे. काही परीक्षार्थींचे याविषयी दुमत असू शकते परंतु संबंधित माहिती मी केवळ माझ्या अनुभवाने आपल्यासाठी याठिकाणी मांडत आहे. याचा आपणास नक्की काही प्रमाणात फायदा होईल यात शंका नाही. तसेच येथे आपण MPSC चा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व कोणत्या टाळल्या पाहिजेत त्याचा देखील आढावा घेणार आहोत.

* आपणाकडील आवश्यक गोष्टी
१. MPSC च्या मागील वर्षांमध्ये आयोगाने घेतलेल्या परीक्षांच्या सर्व प्रश्नपत्रिका (२०१३ पासूनच्या)
२.आयोगाने वेळोवेळी ठरवून दिलेला नविन अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप
3. पुस्तकसूचित सांगितल्या प्रमाणे विषयवार पुस्तके व इतर अभ्याससाहित्य

वरील तिन्ही गोष्टी आपणाकडे असणे अत्यावश्यक आहेत. आयोगाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या असता आपणास आयोग विचारत असलेल्या प्रश्नांचा तसेच प्रश्नांच्या काठीण्य पातळीचा अंदाज येईलच. त्यामुळे वरील पहिल्या दोन गोष्टी अर्थात मागील प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम हेच आपले दोन गुरु समजून अभ्यासास सुरुवात करता येईल. कारण आलेले प्रश्नच तुम्हाला सांगतील कि काय वाचावे आणि काय वाचू नये ? त्याचप्रमाणे आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमावरून तुमच्या अभ्यासाची चौकट तुम्हाला आखता येईल. म्हणून मागील प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम हेच आपले दोन गुरु मानण्यास कोणतेही शंका मनात बाळगू नये. याठिकाणी वरील तिन्ही गोष्टी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी आपण वेळोवेळी गिरीजा अकॅडमीच्या संकेतस्थळाला भेट देत रहा. खाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट ब पूर्व परीक्षेची पुस्तकसुची तसेच परीक्षेचे स्वरूप व मागील वर्षांच्या काही प्रश्नपत्रिका देत आहे. याचा उपयोग आपण आपला अभ्यास करण्यासाठी करावा.

* MPSC गट ब पूर्वपरीक्षेसाठी पुस्तकसूची
खाली दिलेली पुस्तक सूची ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहे. खालील पुस्तकसुचीत सर्व पुस्तके ही अगदी महत्वाची असून माझ्या मते ती पूर्वपरीक्षेसाठी फायदेशीर ठरतात. काही विषयाची २ ते ३ संदर्भ पुस्तके यादीत दिलेली आहेत परंतु त्यातून आपण कोणतेही एक संदर्भ पुस्तक वारंवार वाचून उजळणी करू शकतात. वेळ असेल तर एका विषयाची दोन पुस्तके आपण वाचू शकता.  सर्व विषयांसाठी शालेय क्रमिक पुस्तके ही अगदी महत्वाची ठरतात. त्यामुळे संबंधित विषयाची पुस्तके आपल्या अभ्यासक्रमानुसार वाचून काढावीत व शालेय क्रमिक पुस्तकांची टिपणे(नोट्स) काढून ठेवावीत.

* पुस्तकसूची
पुस्तकाचे नाव
लेखक
प्रकाशन
1. इतिहास
क्रमिक पुस्तके - इयत्ता ८ वी११ वी
-
स्टेट बोर्ड
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास
एस.एस.गाठाळ
कैलास
आधुनिक भारताचा इतिहास
रंजन कोळंबे 
भगीरथ 
आधुनिक भारताचा इतिहास
समाधान महाजन
युनिक
आधुनिक भारताचा इतिहास
ग्रोव्हर-बेल्हेकर
एस. चांद
2. भुगोल
क्रमिक पुस्तके - इ. ४थी ते १२वी
खूप महत्वाची
स्टेट बोर्ड
भुगोल आणि पर्यावरण
ए. बी. सवदी
 निराली
महाराष्ट्राचा भुगोल
दिपक बाविस्कर
दीपस्तंभ
नकाशांसाठी  Atlas 
सवदी ग्राफिक्स 
नवनीत
3. अर्थशास्त्र
क्रमिक पुस्तके - इयत्ता ११ वी
-
स्टेट बोर्ड
भारताची अर्थव्यवस्था 
रंजन कोळंबे
भगीरथ
भारताची अर्थव्यवस्था - भाग १ 
डॉ. किरण देसले 
दीपस्तंभ
भारताची अर्थव्यवस्था - भाग २
डॉ. किरण देसले
दीपस्तंभ
अर्थशास्त्र विषयाची
YCMOU ची
 पुस्तके
महाराष्ट्राचा व  भारताचा आर्थिक पाहणी अहवाल 
शासकीय
शासन
महाराष्ट्राचा व  भारताचा  अर्थसंकल्प
शासकीय
शासन
4. राज्यघटना
क्रमिक पुस्तके - इ. ५वी ते १२वी
-
स्टेट बोर्ड
भारतीय राज्यघटना आणि प्रशासन
रंजन कोळंबे
 भगीरथ 
India Polity (मराठी आवृत्ती उपलब्ध)
M. Laxmikant 
McGraw Hill
भारतीय संविधान आणि राजकारण
तुकाराम जाधव
युनिक प्रकाशन
5. सामान्य विज्ञान
क्रमिक पुस्तके - इ. ५वी ते १२वी
-
स्टेट बोर्ड
क्रमीक पुस्तके -  ८वी ते १२वी
-
  NCERT
सामान्य विज्ञान (स्टेट बोर्ड व NCERT च्या नोट्स)
डॉ. सचिन भास्के
 ज्ञानदीप
General Science 
-
  Lucent
6. अंकगणित व बुद्धीमत्ता
संपूर्ण अंकगणित
ज्ञानदीप
Fastrack Maths
सतीश वसे
 -
Verbal - Non verbal Reasoning
R.S. Agarwal
S Chand
बुद्धीमापन चाचणी
 सुजित पवार
युनिक
7. चालू घडामोडी
दैनंदिन वर्तमानपत्रे
लोकसत्ता
महा.टाईम्स
The Indian Express
मासिके (लोकराज्यप्रतियोगिता दर्पण)
 युनिकपरिक्रमा 
चालू घडामोडी - त्रैमासिक
देवा जाधवर
युनिक
विविध अह्वाल
मानव विकास अहवाल
जागतिक आनंदी अहवाल
शैक्षणिक अहवाल
महिला व बालकल्याण संबंधी
आर्थिक पाहणी अहवाल
विविध संस्थांच्या संकेतस्थळावरून अथवा मासिक/त्रैमासिकातून
-
* वाचावीच लागणार असे काही मुद्दे *
विविध अहवाल
राज्य / राष्ट्रीय पुरस्कार 
जागतिक पुरस्कार 
निधन झालेले प्रसिद्ध व्यक्तिमत्व
सर्वप्रथम घडलेल्या घटना
शासनाच्या योजना
शासनाची संकेतस्थळेपोर्टल, App  
विविध संस्थांच्या संकेतस्थळावरून अथवा मासिक/त्रैमासिकातून
-

वरील दिलेल्या पुस्तकसुचीतील पुस्तके ऑनलाईन घरपोच मागविण्यासाठी आपण गिरीजा अकॅडमीची मुख्यपृष्ठावर ऑनलाईन खरेदी या विभागात जाऊन भव्य सूट मिळवून खरेदी करू शकतात. किंवा खालील लिंक ला क्लिक करून आपण पुस्तके खरेदी करू शकता.

* MPSC स्पर्धा परीक्षांचे स्वरूप
क्र.
अभ्यासक्रम
दिनांक
डाउनलोड
1
राज्यसेवा परीक्षा


2
महाराष्ट्र दुय्यम सेवागट-ब (अराजपत्रित) परीक्षा


3
महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा


4
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग


5

6



* MPSC स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम
क्र.
अभ्यासक्रम
दिनांक
डाउनलोड
1
राज्यसेवा पूर्व परीक्षा
०२/१२/२०१५

2
राज्यसेवा मुख्य परीक्षा - नविन अभ्यासक्रम
(मराठी भाषेत)
०९/०७/२०२०

3
राज्यसेवा मुख्य परीक्षा - नविन अभ्यासक्रम
(इंग्रजी भाषेत)
०९/०७/२०२०

4
राज्यसेवा मुख्य परीक्षा - जुना अभ्यासक्रम
१५/०६/२०१६

5
महाराष्ट्र दुय्यम सेवागट-ब (अराजपत्रित) पूर्व व मुख्यपरीक्षा
०४/०३/२०२०

6
महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व व मुख्य परीक्षा
२७/०२/२०१८

7
राज्यसेवा मुख्य परीक्षा - नविन अभ्यासक्रमात समाविष्ट झालेले घटक हायलाईट स्वरुपात०९/०७/२०२०

8


* राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित अभ्यासक्रम 2020 मधील बदल हायलाईट केलेली - 

*MPSC च्या मागील प्रश्नपत्रिका
* पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका
क्र.पूर्व परीक्षेचे नावपरीक्षेचा दिनांकडाउनलोड
 PSI, STI, ASST संयुक्त पूर्वपरीक्षा २०१७१६ जुलै २०१७
महाराष्ट्र गट-क सेवा  पूर्वपरीक्षा २०१९ १८ जून २०१९
राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१९ - पेपर १
१७ फेब्रु २०१९

राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०१९ - पेपर २ (CSAT)
१७ फेब्रु २०१९



* मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिका
क्र.मुख्य परीक्षेचे नावपेपर क्र.परीक्षेचा दिनांकडाउनलोड
 STI मुख्य परीक्षा २०१७पेपर १ ७ जाने २०१८


पेपर २७ जाने २०१८
 STI मुख्य परीक्षा २०१६पेपर १ ३ जून २०१७


पेपर २३ जून २०१७
 STI मुख्य परीक्षा २०१५पेपर १ २६ नोव्हे २०१६


पेपर २२६ नोव्हे २०१६
 PSI मुख्य परीक्षा २०१७पेपर १ ५ नोव्हे २०१७


पेपर २५ नोव्हे २०१७
 PSI मुख्य परीक्षा २०१६पेपर १ २५ जून २०१७


पेपर २२५ जून २०१७


स्पर्धा परीक्षांविषयी वेळोवेळी अद्ययावत माहितीसाठी तसेच अभ्यासाविषयी सुयोग्य माहितीसाठी आमच्या गिरीजा अकॅडेमी या संकेतस्थळाला भेट देत रहा.  व आपला अभिप्राय नोंदवायला विसरू नका.



Post a Comment

0 Comments