संविधानातील कलमे (कलम 1 ते 151)

* भाग 1 ते 5 *


अनुच्छेद
तरतूद
भाग १
संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र
संघराज्याचे नाव व राज्यक्षेत्र
नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे
नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांची क्षेत्रे, सीमा अथवा नावे यात फेरफार
पहिल्या आणि चौथ्या अनुसुचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक, अनुषांगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद २ व ३ खाली करण्यात आलेले कायदे
भाग २ 
नागरिकत्व
संविधानाच्या प्रारंभाचे नागरिकत्व
पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व
स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व
मुळचे भारतीय असणाऱ्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व
परकीय देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्ती भारताचे नागरिक नसणे
१०
नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे
११
संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनिमय करणे
भाग ३  
मुलभूत हक्क
१२
व्याख्या
१३
मुलभूत हक्कांशी विसंगत व त्यांचे नुतनीकरण करणारे कायदे

समानतेचा हक्क
१४
कायद्यापुढे समानता
१५
धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई
१६
सार्वजनिक सेवायोजानांमध्ये समान संधी
१७
अस्पृश्यता नष्ट करणे
१८
पदव्या (किताब) नष्ट करणे

स्वातंत्र्याचा हक्क
१९
भाषणस्वातंत्र्य, इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण
२०
अपराधाबद्दलच्या दोषसिद्धी बाबत संरक्षण
२१
जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण
२१ अ
शिक्षणाचा हक्क (६ ते १४ वयोगटातील मुलामुलींचा)
२२
अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण

शोषणाविरुद्ध हक्क
 २३ 
माणसांचा अपव्यापार व वेठबिगारी यांना मनाई
२४
कारखाने इ. ठिकाणी बालकांना कामावर ठेवण्यास मनाई

धर्मस्वातंत्र्याचा हक्क
  २५  
सद्सद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार
२६
 धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य
२७
एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य
२८
शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण/उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य

सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
२९
अल्पसंख्यांकांचे हितसंबंधांचे संरक्षण
३०
अल्पसंख्यांकांचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क
३१
निरसित

विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती
३१ अ
संपदांचे संपादन, इ. करिता तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती
३१ ब
विवक्षित अधिनियम व विनियम विधीग्राह्य करणे
३१ क
विवक्षित निदेशक तत्वे अंमलात आणणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती
३१ ड


सांविधानिक उपाय योजण्याचा हक्क
३२
या भागाने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरिता उपाय
३२ अ
निरसित
३३
या भागाने प्रदान केलेले हक्क हे सेना इ.ना लागू करताना फेरबदल करण्याचा संसदेचा हक्क
३४
लष्करी कायदा लागू असताना हक्कांवर निर्बंध
३५
या भागाच्या तरतूदिंची अंमलबजावणी करण्याकरता विधिविधान
भाग ४   
राज्यधोरणांची निदेशक तत्वे
३६
व्याख्या
३७
या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे
३८
राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे
३९
राज्याने अनुसरावायाच्या धोरणाची विवक्षित तत्वे
३९ अ
समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य
४०
ग्रामपंचायतींचे संघटन
४१
कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क
४२
कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य यांची तरतूद
४३
कामगारांना निर्वाह वेतन इ.
४३ अ
उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग
४४
समान नागरी कायदा
४५
६ वर्षाखालील मुलांचे शिक्षण व संगोपनाची तरतूद
४६
SC, ST व इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन
४७
पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्यांचे कर्तव्य
४८
कृषी व पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे
४८ अ
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्यजीव सृष्टी यांचे रक्षण करणे
४९
राष्ट्रीय महत्वाची स्थळे व स्मारके आणि वस्तू यांचे संरक्षण करणे
५०
स्वतंत्र न्यायव्यवस्था
५१
आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन
भाग ४  
मुलभूत कर्तव्ये
५१ अ
मुलभूत कर्तव्ये
भाग ५   
संघराज्य

प्रकरण १ – कार्यकारी यंत्रणा

राष्ट्रपती व उपराष्ट्रपती
५२ 
भारताचा राष्ट्रपती
५३
संघराज्याचा कार्यकारी अधिकारी
५४
राष्ट्रपतीची निवडणूक
५५
राष्ट्रपतीची निवडणूकीची रीत
५६
राष्ट्रपतीचा पदावधी
५७
फेरनिवडणुकीस पात्रता
५८
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्हता
५९
राष्ट्रपतीपदाच्या शर्ती
६०
राष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे
६१
राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती
६२
राष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास निवडणूक व नवनियुक्तीत राष्ट्रपतीचा पदावधी
६३
भारताचा उपराष्ट्रपती
६४
उपराष्ट्रपती राज्यसभेचा पद्सिध्द सभापती असणे
६५
उपराष्ट्रपतीने राष्ट्रपतीपद रिक्त किंवा गैरहजर असल्यास त्याची कामे पाहणे
६६
उपराष्ट्रपती निवडणूक
६७
उपराष्ट्रपतीचा पदावधी
६८
उपराष्ट्रपतीचे पद रिक्त झाल्यास निवडणूक व नवनियुक्तीत उपराष्ट्रपतीचा पदावधी
६९
उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे
७०
इतर आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतीची कामे पार पाडणे
७१
राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीच्या बाबी
७२
शिक्षा निलंबित, सूट किंवा सौम्य करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
७३
संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती

मंत्रीपारीषद
७४ 
राष्ट्रपतीस सहाय्य करण्याकरता मंत्रीपरीषद
७५
मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी

भारताचा महान्यायवादी
७६
भारताचा महान्यायवादी
७७
भारत सरकारचे कामकाज चालवणे
७८
राष्ट्रपतीस माहिती पुरविणेइ. बाबत प्रधानमंत्र्यांची कर्तव्ये
प्रकरण २ संसद
७९ 
संसदेची रचना
८०
राज्यसभेची रचना
८१
लोकसभेची रचना
८२
प्रत्येक जनगणनेनंतर पुन: समयोजन
८३
संसदेच्या सभागृहांचा कालावधी
८४
संसद सदस्यांच्या अर्हता
८५
संसदेची सत्रे, सत्रसमाप्ती व विसर्जन
८६
राष्ट्र्पतीचे अभिभाषण व संदेश पाठवण्याचा हक्क
८७
राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण
८८
मंत्री व महान्यायवादी यांचे सभागृहांबाबत हक्क
संसदेचे अधिकारी
८९
राज्यसभेचा सभापती व उप सभापती
९०
उपसभापती पद रिक्त होणे, राजीनामा व पदच्चुती
९१
उपसभापती व इतर व्यक्तींचा सभापती म्हणून कर्तव्ये व कार्य करण्याचा अधिकार
९२
सभापती/उपसभापती पदावरून दूर करण्याचा ठराव - त्याने अध्यक्षस्थान न भूषविणे
९३
लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष
९४
अध्यक्ष/उपाध्यक्ष पद रिक्त होणे, राजीनामा व पदच्चुती
९५
उपाध्यक्ष व इतर व्यक्तींचा सभापती म्हणून कर्तव्ये व कार्य करण्याचा अधिकार
९६
अध्यक्ष/उपाध्यक्ष पदावरून दूर करण्याचा ठराव - त्याने अध्यक्षस्थान न भूषविणे
९७
सभापती/उपसभापती व अध्यक्ष/उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते
९८
संसदेचे सचिवालय
कामकाज चालविणे
९९ 
सदस्यांची शपथ व प्रतिज्ञा
१००
सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असताना कार्य करण्याचा अधिकार, गणपूर्ती
सदस्यांची अपात्रता
१०१ 
जागा रिक्त करणे
१०२
सदस्यांबाबत अपात्रता
१०३
सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रश्नावरील निर्णय
१०४
कलम ९९ खाली शपथ घेतानाअपात्र असताना स्थानापन्न, मतदान केल्यास दंड
संसद व तिचे सदस्य यांचे अधिकार, विशेषाधिकार 
१०५
संसदेची सभागृहे, सदस्य व समित्यांचे अधिकार
१०६
सदस्यांचे वेतन व भत्ते
वैधानिक कार्यपद्धती
१०७ 
विधेयक प्रस्तुत करणे व पारित करण्यासंबंधी तरतुदी
१०८
संयुक्त बैठक
१०९
धनविधेयाकाबाबत विशेष कार्यपद्धती
११०
धनविधेयक व्याख्या
१११
विधेयकास अनुमती
वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती
११२ 
वार्षिक वित्तीय विवरणपत्र (अर्थसंकल्प)
११३
अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती
११४
विनियोजन विधेयके
११५
पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने
११६
लेखानुदान, अपवादात्मक अनुदाने इ.
११७
वित्तीय विधेयक
सर्वसाधारण कार्यपद्धती
११८ 
कार्यपद्धती नियम
११९
वित्तीय कामकाजासंबंधी संसदेची कार्यपद्धती
१२०
संसदेत वापरावयाची भाषा
१२१
संसदेतील चर्चेवर निर्बंध
१२२
न्यायालयांनी संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी करू नये
प्रकरण ३ राष्ट्रपतींचे वैधानिक अधिकार
१२३  
संसदेच्या विरामकाळात अध्यादेश प्रस्थापित करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
प्रकरण ४ संघ न्याययंत्रणा 
१२४ 
सर्वोच्च न्यायालयाची स्थापना व घटना
१२५
न्यायाधीशांचे वेतन इ.
१२६
कार्यार्थ मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती
१२७
तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती
१२८
स.न्या. च्या बैठकीत निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती
१२९
सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे
१३०
सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान
१३१
सर्वोच्च न्यायालयाची मुळ अधिकारिता
१३१ अ 
निरसित
१३२
विवक्षित प्रकरणी उच्चन्यायालयावरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालायाची अपील अधिकारिता
१३३
दिवाणी प्रकरणी सर्वोच्च न्यालायाची अपील अधिकारिता
१३४
फौजदारी प्रकरणी सर्वोच्च न्यालायाची अपील अधिकारिता
१३४ अ
सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी प्रमाणपत्र
१३५
फेडरल न्यायालयाची विद्यमान कायद्याखालील अधिकारिता सर्वोच्च न्या. ने वापरणे
१३६
अपील करण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष अनुज्ञा
१३७
न्यायनिर्णय/आदेश यांचे स.न्या. कडून पुनर्विलोकन
१३८
स.न्या. च्या अधिकाराची वृद्धी
१३९
विवक्षित प्राधीलेख काढण्याच्या अधिकाराचे स.न्या.स प्रदान
१३९ अ
विवक्षित प्रकरणे हस्तांतरित करणे
१४०
सर्वोच्च न्यायालयाचे सहाय्यभूत अधिकार
१४१
सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयांवर बंधनकारक असणे
१४२
सर्वोच्च न्यायालयाचे हुकुम, आदेश
१४३
सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार
१४४ अ
निरसित
१४५
न्यायालयाचे नियम इ.
१४६
सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व सेवक आणि खर्च
१४७
अर्थ लावणे
प्रकरण ५ भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक
१४८ 
भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक – CAG
१४९
CAG चे कर्तव्ये व अधिकार
१५०
संघराज्याचा व राज्यांच्या लेख्यांचा नमुना
१५१
लेखापरीक्षा अहवाल

Post a Comment

0 Comments