कीबोर्ड हे संगणकाचे एक महत्वाचे इनपुट डिव्हाईस आहे. याद्वारे संगणकाला माहिती पुरविली जाते. कीबोर्ड वर भरपूर Key म्हणजेच आपल्या भाषेत बटन असतात. कीबोर्ड वर असणाऱ्या सर्व कळांचे उपयोग काय ते आपण याठिकाणी बघणार आहोत. तसेच Keys चे सामान्य प्रकार कोणते ते देखील या लेखात आपण भागणार आहोत. कीबोर्ड वर असणाऱ्या Keys चे खालील प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकते. खालील कीबोर्ड चे छायाचित्र व्यवस्थित पहा व अभ्यासा. व खाली दिलेले उपयोग आपण प्रत्यक्ष पणे स्वतः करून बघा. त्यामुळे आपणास खात्री होऊन संबंधित कळांचा वापर कसा होतो हे आपल्या लवकर लक्षात येईल.
1) Function Keys:- कीबोर्डच्या अगदी वरच्या बाजूला फंक्शन की दिलेल्या असतात. या Function Key एकूण 12 असतात. F1 पासून ते F12 पर्यंत यांना क्रमांक दिलेले असतात. या प्रत्येक कळचे कार्य हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते. त्यांची विशिष्ठ कार्ये खालील प्रमाणे आहेत.
* F1 Key
2) Numeric Keys:- Numeric Keys म्हणजे क्रमांक/आकडे असणाऱ्या कळा. कीबोर्ड वर शून्य पासून ते 9 पर्यंत या कळ दिलेल्या असतात. 0,1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. या कळांचा उपयोग आकडेमोड करण्यासाठी, गणिती क्रिया करण्यासाठी तसेच विशिष्ट ठिकाणी क्रमांक देण्यासाठी केला जातो.
3) Alphabet Keys:- अल्फाबेटचा मराठी अर्थ अक्षरे/वर्णमाला असा होतो. इंग्रजी वर्णमालेतील 26 अक्षरे A पासून Z पर्यंत कीबोर्ड वर दिलेली असतात. या अक्षरांच्या बटनांना Alphabet Keys म्हणतात. ही अक्षरे वर्णमालेच्या क्रमानुसार नसून एका विशिष्ट प्रकारे मांडण्यात आलेल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे दैनंदिन कायम वापरात येणारे शब्द सहज व पटकन लिहता यावीत हा या मागील उद्देश आहे. या अल्फाबेट कळांची मांडणी ही विशिष्ठ प्रकारची असून तीन रांगेत करण्यात आलेली असते.
4) Navigation Keys:- Navigation Keys चा उपयोग पेज खाली, वर, डावीकडे, उजवी कडे करण्यसाठी केला जातो. यामध्ये 4 Arrow Keys देखील असतात ज्याद्वारे आपण कर्सर पाहिजे त्या दिशेला फिरवू शकतो. तसेच Home, End, Page Up, Page Down इ. कळांचा देखील Navigation Keys मध्ये समावेश होतो.
5) Special Keys:- स्पेशल की चा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो.
या मध्ये खालील कळांचा समावेश होतो.
पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा आणि खाली Comment Box मध्ये किंवा अभिप्राय विभागात अभिप्राय नोंदवा. ईमेल द्वारे गिरीजा अकॅडमीशी जुडा आणि भरपूर महत्वपूर्ण माहिती मिळवा.
- जगदिश सोळंके (गिरीजा अकॅडमी, अडावद)
* F1 Key
- F1 या कळचा सर्वसाधारण उपयोग Help Keyम्हणून केला जातो. जवळपास सर्व प्रकारच्या प्रोग्राम मध्ये F1 ही कळ दाबल्यास संबंधित प्रोग्रामची अथवा सॉफ्टवेअरची Help स्क्रीन उघडते.यामध्ये आपणास संबंधित प्रोग्रामची अथवा सॉफ्टवेअरची वापरासंबंधी माहिती मिळते.
- F1 या कळचा वापर BIOS/CMOS सेटिंग मध्ये जाण्यासाठी देखील होतो.
- F2 या कळ चा उपयोग फाईल्स, फोल्डर्स इ. च्या नावात बदल करण्यासाठी होतो. (Rename Key)
- Microsoft Office मध्ये Ctrl + F2 चा उपयोग प्रिंट प्रीविव्ह बघण्यासाठी होतो.
- Microsoft Excel मध्ये Alt + F2 चा उपयोग फाईल Save As करण्यसाठी होतो.
- Microsoft Excel मध्ये Shift + F2 चा उपयोग Comment Box देण्यासाठी होतो.
* F3 Key
- F3 या कळचा सर्वसाधारण उपयोग Search Key म्हणून होतो. डेस्कटॉपवर जाऊन F3 कळ दाबल्यास संगणकाचा Search Box उघडतो, यात आपण संगणकातील कोणत्याही ठिकाणी जतन केलेली फाईल अथवा फोल्डर शोधू शकतो.
- Command Prompt वर अथवा Windows DOS वर कार्य करीत असताना F3 या कळचा उपयोग या आधी वापरलेली कमांड पुन्हा वापरण्यासाठी होतो.
- Microsoft Word मध्ये Shift + F3 या कळांचा उपयोग अक्षरे मोठ्या लिपीत अथवा लहान लिपीत करण्यासाठी होतो.
* F4 Key
- F4 या कळचा सर्वसाधारण उपयोग Alt + F4 वापरून सुरु असलेला प्रोग्राम बंद करण्यासाठी होतो. सर्व प्रोग्राम बंद असतील तर डेस्कटॉप वर या कळ दाबल्यास Shutdown मेनू समोर येतो.
- Ctrl + F4 या कळांचा उपयोग Active Window बंद करण्यासाठी होतो. उदा. एखाद्या ब्राउझरमध्ये ४/५ Tab उघडलेल्या आहेत आणि आपण जर Ctrl + F4 या कळ सोबत दाबल्या तर त्या ४/५ Tab मधून जी सध्या Active Tab आहे ती बंद होईल.
- Microsoft Word मध्ये F4 कळ दाबल्यास मागील केलेली कृती पुन्हा पुनरावृत्त होते.
* F5 Key
- F5 या कळचा सर्वसाधारण उपयोग ब्राउझरचे पेज Refresh किंवा Reload करण्यासाठी होतो.
- Microsoft Powerpoint मध्ये स्लाईड शो सुरु करण्यासाठी होतो.
- Microsoft Word मध्ये Find And Replace विंडो उघडण्यासाठी होतो.
* F6 Key
- F6 या कळचा सर्वसाधारण उपयोग ब्राउझर मध्ये कधीही Address Bar मध्ये जाण्यासाठी होतो.
- Microsoft Word चे एकापेक्षा जास्त प्रोग्राम सुरु असल्यास Ctrl + F6 वापरून वेगवेगळे प्रोगाम मध्ये जाता येते.
* F7 Key
- Microsoft Office मध्ये F7 या कळचा वापर करून Spelling and Grammar Dialog Box उघडला जातो.
- Microsoft Office मध्ये Shift + F7 चा वापर करून Research Window उघडली जाते.
* F8 Key
- Windows Booting होत असताना F8 ही कळ दाबत राहिल्यास Safe Mode मध्ये जाता येते.
* F9 Key
- Software Develop करताना F9 चा उपयोग प्रोग्राम Compile व Execute करण्यासाठी केला जातो. यासाठी Ctrl व Alt या कळ देखील सोबत वापराव्या लागतात.
* F10 Key
- बहुतेक प्रोग्राम मध्ये Shift + F10 वापरल्यास माऊस च्या Right Click चा मेन्यू समोर येतो.
- Cmos Setup मध्ये जाण्यसाठी देखील F10 चा उपयोग केला जातो.
* F11 Key
- ब्राउझर मध्ये फुल स्क्रीन मोड मध्ये जाण्यसाठी व त्यातून बाहेर येण्यासाठी वापरतात.
- Microsoft Excel मध्ये Shift + F11 दाबून नविन Sheet समाविष्ट होते.
- Microsoft Excel मध्ये Ctrl + F11 दाबून नविन Macro समाविष्ट होते.
* F12 Key
- Microsoft Office मध्ये F12 दाबल्यास Save As ची विंडो उघडते.
- Microsoft Office मध्ये Shift + Ctrl + F12 दाबल्यास Print विंडो उघडते. (Ctrl + P सारखेच कार्य)
- Microsoft Office मध्ये Ctrl + F12 दाबल्यास Open Document ची विंडो उघडते.
फंक्शन की चे वरील कार्ये ही सर्वसाधारण कार्ये आहेत, याव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये वेगवेगळी कार्ये ही फंक्शन की वापरून करता येऊ शकतात.
2) Numeric Keys:- Numeric Keys म्हणजे क्रमांक/आकडे असणाऱ्या कळा. कीबोर्ड वर शून्य पासून ते 9 पर्यंत या कळ दिलेल्या असतात. 0,1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. या कळांचा उपयोग आकडेमोड करण्यासाठी, गणिती क्रिया करण्यासाठी तसेच विशिष्ट ठिकाणी क्रमांक देण्यासाठी केला जातो.
3) Alphabet Keys:- अल्फाबेटचा मराठी अर्थ अक्षरे/वर्णमाला असा होतो. इंग्रजी वर्णमालेतील 26 अक्षरे A पासून Z पर्यंत कीबोर्ड वर दिलेली असतात. या अक्षरांच्या बटनांना Alphabet Keys म्हणतात. ही अक्षरे वर्णमालेच्या क्रमानुसार नसून एका विशिष्ट प्रकारे मांडण्यात आलेल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे दैनंदिन कायम वापरात येणारे शब्द सहज व पटकन लिहता यावीत हा या मागील उद्देश आहे. या अल्फाबेट कळांची मांडणी ही विशिष्ठ प्रकारची असून तीन रांगेत करण्यात आलेली असते.
- पहिली रांग - 10 अक्षरे - Q, W, E, R, T, Y, U, I, O, P
- दुसरी रांग - 09 अक्षरे - A, S, D, F, G, H, J, K, L
- तिसरी रांग - 07 अक्षरे - Z, X, C, V, B, N, M
आपण जर कीबोर्ड चे निरीक्षण केले तर लक्षात येईल की, F आणि J या दोन कळांवर बोटाला जाणीव होतील अशा रेषा असतात. यांचा उपयोग दृष्टिहीन लोकांसाठी असतो. या कळांच्या सहाय्यानेच दृष्टिहीनांना प्रशिक्षण दिले जाते.
4) Navigation Keys:- Navigation Keys चा उपयोग पेज खाली, वर, डावीकडे, उजवी कडे करण्यसाठी केला जातो. यामध्ये 4 Arrow Keys देखील असतात ज्याद्वारे आपण कर्सर पाहिजे त्या दिशेला फिरवू शकतो. तसेच Home, End, Page Up, Page Down इ. कळांचा देखील Navigation Keys मध्ये समावेश होतो.
5) Special Keys:- स्पेशल की चा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो.
या मध्ये खालील कळांचा समावेश होतो.
- PrtSc - Print Screen - मोबाईल मध्ये स्क्रीनशॉट घेतो त्या पद्धतीने स्क्रीनशॉट घेण्यासाठी
- ScrLk - Scroll Lock - Arrow Keys ने स्क्रोलींग लॉक करण्यासाठी.
- NmLk - Number Lock - उजव्या बाजूच्या Numeric Key चा वापर बंद व सुरु करण्यासाठी
- Spacebar - कीबोर्ड वरील सर्वात मोठी कळ. या द्वारे टायपिंग करीत असताना दोन अक्षरे अथवा शब्दांमध्ये अंतर देण्यासाठी याचा वापर केला जातो. या कळ चे एक वैशिष्ट्य म्हणजे या कळवर नाव नसते. काहीही लिहिलेले नसते. इतर सर्व कळांवर लिहिलेले असते.
- Shift - ज्या कळांवर खाली आणि वर असे दोन ठिकाणी अक्षरे/सिम्बॉल आहेत त्यांचा वापर करण्यासाठी तसेच लहान लिपीतून मोठ्या लिपीत अक्षर लिहिण्यासाठी. कीबोर्ड वर हमखास दोन ठिकाणी असतात.
- CapsLk - Caps Lock - मोठ्या लिपीत अक्षरे लिहिण्यासाठी
- Tab - Microsoft Office मध्ये अक्षरांमध्ये विशिष्ट अंतर देण्यासाठी, टेबल च्या वेगवेगळ्या Cell मध्ये जाण्यासाठी, Alt + Tab सुरु असणारे प्रोग्राम वेळोवेळी बदलाण्यासाठी.
- Esc - Escape - कोणत्याही प्रोग्राममधून बाहेर पडण्यासाठी
- Enter - याद्वारे संगणकाला कार्य पूर्ण झाल्याची आज्ञा देता येते, तसेच टायपिंग करत असताना खालच्या रांगेवर कर्सर आणण्यासाठी याचा उपयोग केला जातो. काही कीबोर्ड वर दोन ठिकाणी असतात तर काही वर एकच ठिकाणी असते. (काही Laptop वर एकच, काहींवर दोन)
- Ctrl - Control - कीबोर्ड वर हमखास दोन ठिकाणी असतात.
- Alt - Alter - कीबोर्ड वर हमखास दोन ठिकाणी असतात.
- BackSpace - चुकून काही टाईप झाल्यास खोडण्यासाठी किंवा मागे जाण्यासाठी
- Delete - कर्सर च्या उजवीकडील अक्षरे नष्ट करण्यासाठी अथवा सिलेक्ट केलेले Delete करण्यासाठी
याव्यतिरिक्त काही कीबोर्ड ही मल्टीमेडिया प्रकारची असतात त्यावर गाणे, म्युझिक यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही Key दिलेल्या असतात. तसेच बाजारात वेगवेगळ्या प्रकारची कीबोर्ड उपलब्ध असतात व त्यांच्या वरील Key ची संख्या देखील कमी अधिक असते. परंतू आपण बघितलेल्या सर्व key या सर्वसाधारण सर्व कीबोर्ड वर असतात.
* संगणकाबाबत अधिक जाणून घ्या.
|
|---|
पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा आणि खाली Comment Box मध्ये किंवा अभिप्राय विभागात अभिप्राय नोंदवा. ईमेल द्वारे गिरीजा अकॅडमीशी जुडा आणि भरपूर महत्वपूर्ण माहिती मिळवा.


1 Comments
Good job dada
ReplyDelete