
आज संपूर्ण जगभरात एकच विषय ऐकायला मिळत आहे तो म्हणजे कोरोना अर्थात कोविड-१९. याविषयी काही गोष्टी आपणास माहितच आहेत परंतु त्यातच अफवा देखील भरपूर आहेत. काही चुकीची माहिती देखील आपणा सर्वांपर्यंत येते. त्यामुळे कोणती माहिती खरी आहे आणि कोणती खोटी हे समजणे आपल्याला अवघड जाते. त्यासाठी आज विशेष माहिती मी आपणासमोर मांडत आहे. या मध्ये महत्वाचे मुद्दे म्हणजे कोरोना म्हणजे काय ? आजाराचा प्रकार ? COVID-19 काय आहे ? लक्षणे, उपाययोजना, काय करावे आणि काय करू नये. अशा असंख्य गोष्टी आपण बघणार आहोत. चला तर बघूया काय आहे नेमका कोरोना (कोविड 19) ?
* Covid-19 नेमका काय आहे ?
Covid-19 हे एक लघुरूप आहे. त्याचे संक्षिप्त नाव Corona Virus Disease - 2019 असे आहे. म्हणूनच आपण याला लघुरुपात कोरोना असे म्हणत आहोत. हा पूर्णपणे नविन विषाणू आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना तसेच डॉक्टरांना भरपूर कसरत करावी लागत आहे. हा आजार फ्लू सारखा असून त्याची लक्षणेही तशीच आहेत. ताप, सर्दी, खोकला आणि धाप लागणे म्हणजेच श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. परंतु हा आजार अधिक संक्रमक आहे. परंतु असे असले तरी या आजाराची लागण होणाऱ्या जवळपास 80% लोकांना याचा सौम्य त्रास आहे. 20% लोकांनाच यामुळे जास्त त्रास झाल्याचे आतापर्यंत दिसून आलेले आहे. त्यातही 60/65 वर्षे वयापेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे आधीपासून व्याधींनी त्रस्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये याची लक्षणे जास्त प्रमाणत दिसून आलेले आहेत. लहान मुलांवर याचा फारसा प्रभाव दिसून आलेला नाही. या आजाराची लागण होणाऱ्या व्यक्तींना न्युमोनिया होणाची शक्यता असते व जे मृत्यू होत आहेत ते कोरोना मुळे न होता न्युमोनिया व इतर आजारांमुळे होत आहेत असे डॉक्टरांचे मत आहे. या आजाराचा वृद्ध व्यक्ती व दीर्घ आजार असणाऱ्या व्यक्तींना जास्त धोका आहे. मधुमेह, हृदयविकाराने ग्रस्त व्यक्ती, उच्च रक्तदाब, कर्करोग अशा बाधित व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.
* मानवी शरीरात कोरोना विषाणू हा श्वसनसंस्थेला संक्रमित करतो तर त्याचा प्रकार हा साधारण कोरड्या खोकल्या पासून ते MERS(Middle East Respiratory Syndrome) आणि SARS(Severe Acute Respiratory Syndrome) यापर्यंत असू शकतो.
* एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा की एखादी व्यक्ती कोरोना बाधित झाली व काही दिवसांनी कोरोनामुक्त झाली तर त्या व्यक्तीस पुन्हा कोरोना होण्याची शक्यता इतरांपेक्षा कमी असते. यामागील शास्त्रीय कारण असे की, त्या विषाणूची आपल्या शरीरास सवय होते त्यामुळे आपले शरीर त्यास प्रतिकार करु लागते. मात्र आपण गाफील राहू नये, कोणत्याही प्रकारचा हलगर्जी पणा करू नये कारण जरी याचा आपल्याला त्रास होत नसेल परंतु आपण समोरच्या व्यक्तीस यामुळे अडचणीत आणू शकतो. सर्वात आधी आपण आपल्या कुटुंबाला अडचणीत आणू शकतो. म्हणून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
* कोरोना विषाणू कोठून व कसा आला ?
कोरोना विषाणूची सुरुवात चीन मधील हुबेई प्रांतातील वूहान शहरातून झाल्याचे प्रथम दर्शनी समजते. डिसेंबर 2019 मध्ये जेव्हा कोरोनामुळे वूहान प्रांतात हाहाकार माजला त्यावेळी त्याची माहिती उपलब्ध झाली. आज या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने Pandemic (एकापेक्षा जास्त देशात एकाच वेळी पसरणारा साथीचा आजार) म्हणून घोषित केलेला आहे. तसेच हा आजार वटवाघूळ या सस्तन प्राण्यापासून पसरला असे समजते, यावर अजूनही काही गोष्टी अस्पष्ट असून संशोधन सुरु आहे.
* कोरोनाची लक्षणे व प्रसार कसा होतो?
सध्या तरी संपूर्ण जगात यावर कोठेही लस उपलब्ध नाही. विविध देशातील शास्त्रज्ञ व डॉक्टर यावर लस शोधण्यासाठी अथक प्रयत्न करत असून संशोधन सुरु आहे व प्रायोगिक चाचण्या देखील करत आहेत. परंतु जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी सांगितल्याप्रमाणे यावर प्रभावी लस तयार होण्यासाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असणारी काही औषधे ही व्यक्तींना रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दिली जात आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका काही प्रमाणात कमी असू शकतो असा त्यामागील उद्देश आहे. परंतु सध्या कोरोनावर कोणतेही लस उपलब्ध नाही.
* मानवी शरीरात कोरोना विषाणू हा श्वसनसंस्थेला संक्रमित करतो तर त्याचा प्रकार हा साधारण कोरड्या खोकल्या पासून ते MERS(Middle East Respiratory Syndrome) आणि SARS(Severe Acute Respiratory Syndrome) यापर्यंत असू शकतो.
* एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा की एखादी व्यक्ती कोरोना बाधित झाली व काही दिवसांनी कोरोनामुक्त झाली तर त्या व्यक्तीस पुन्हा कोरोना होण्याची शक्यता इतरांपेक्षा कमी असते. यामागील शास्त्रीय कारण असे की, त्या विषाणूची आपल्या शरीरास सवय होते त्यामुळे आपले शरीर त्यास प्रतिकार करु लागते. मात्र आपण गाफील राहू नये, कोणत्याही प्रकारचा हलगर्जी पणा करू नये कारण जरी याचा आपल्याला त्रास होत नसेल परंतु आपण समोरच्या व्यक्तीस यामुळे अडचणीत आणू शकतो. सर्वात आधी आपण आपल्या कुटुंबाला अडचणीत आणू शकतो. म्हणून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
* कोरोना विषाणू कोठून व कसा आला ?
कोरोना विषाणूची सुरुवात चीन मधील हुबेई प्रांतातील वूहान शहरातून झाल्याचे प्रथम दर्शनी समजते. डिसेंबर 2019 मध्ये जेव्हा कोरोनामुळे वूहान प्रांतात हाहाकार माजला त्यावेळी त्याची माहिती उपलब्ध झाली. आज या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने Pandemic (एकापेक्षा जास्त देशात एकाच वेळी पसरणारा साथीचा आजार) म्हणून घोषित केलेला आहे. तसेच हा आजार वटवाघूळ या सस्तन प्राण्यापासून पसरला असे समजते, यावर अजूनही काही गोष्टी अस्पष्ट असून संशोधन सुरु आहे.
* कोरोनाची लक्षणे व प्रसार कसा होतो?
- शास्त्रज्ञ तसेच डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोविड 19 च्या संक्रमणाची पद्धत ही फ्लू सारखीच आहे. म्हणजेच त्याची लक्षणे कोरडा खोकला, सर्दी, ताप व थकवा ही आहेत.
- आजाराची लागण होणाऱ्या जवळपास 80% लोकांना याचा सौम्य त्रास असून ते कोणत्याही प्रकारच्या औषधी अथवा वैद्यकीय ईलाजाशिवाय बरे होऊ शकतात असे WHO ने सांगितलेले आहे. त्यामुळे आपण घाबरण्याची गरज नाही.
- जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती खोंकते किंवा शिंकते तेव्हा त्यातून विषाणूचा प्रसार करणारे थेंब हे पृष्ठभागावर पडतात. आपण जर अशा व्यक्तीच्या जवळ असलो तर ते अदृश्य थेंब आपल्या शरीरावर किंवा कपड्यांवर पडू शकतात. ही पडलेली थेंब आपल्या शरीरावर काही वेळ तशीच राहतात. त्यातून आपण तोंडाला, नाकाला, डोळ्यांना किंवा चेहऱ्याला स्पर्श केला तर त्यामुळे आपण देखील संक्रमित होण्याची शक्यात नाकारता येत नाही. त्यामुळे सामाजिक अंतर (Social Distancing) पाळणे अत्यंत गरजेचे असते.
- सामाजिक अंतर पाळत असताना आपण दीड ते दोन मीटर म्हणजेच किमान 6 फुट अंतरावर असणे गरजेचे असते. त्यामुळे असे थेंब किंवा विषाणू आपल्या शरीरावर येऊ शकणार नाहीत.
- तसेच हा विषाणू वेगवेगळ्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या वेळेपर्यंत जिवंत राहू शकतो, त्यामुळे आपण त्या काळात संबंधित पृष्ठभागावर जर स्पर्श केला तर आपले संक्रमित होण्याची शक्यता असते. (जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केल्याप्रमाणे कोरोनाचा विषाणू - प्लास्टिक व स्टेनलेस स्टील च्या पृष्ठभागावर 72 तास, तांब्याच्या पृष्ठभागावर 4 तास, कागद व पुठ्ठ्यावर 24 तास क्रियाशील असतो.)
- कोरोनाच्या विषाणूवर आजही विविध देशात संशोधन सुरु आहे. सध्या तरी हा विषाणू हवेमार्फत पसरण्याचे पुरावे नाहीत परंतु शास्त्रज्ञांनी तसेच डॉक्टरांनी हा विषाणू हवेमार्फत पसरण्याची शक्यता नाकारलेली नाही. विषाणू हवेत प्रसारित होण्यासाठी त्याचे वजन, आकारमान या गोष्टी महत्वाच्या ठरतात. कोविड-19 चा विषाणू हा इतर विषाणूंच्या तुलनेने जड असल्याने हवेमार्फत पसरलेला आढळून आलेला नाही.
- तसेच मानवी विष्टे मध्ये देखील या विषाणूचे अस्तित्व आढळलेले असून त्यामुळे मानवी मलाद्वारे विषाणू प्रसारित होण्याची शक्यता देखील नाकारली जाऊ शकत नाही. परंतु अजून या गोष्टींवर संशोधन सुरु आहे.
* कोरोनावर लस उपलब्ध आहे का ?

*कोरोनापासून बचावात्मक उपाययोजना

- सामाजिक अंतर (Social Distancing):- आजारी लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तसेच आपण स्वत: आजारी असाल तर घराबाहेर पडू नका. इतरांपासून लांब रहा व शक्य असल्यास स्वतंत्र खोलीत रहा. तसेच कोणाशीही बोलत असतांना अथवा बाहेर कामानिमित्त कोठे गेलात तर इतरांपासून किमान 1.5 ते 2 मीटर अंतर ठेवा. यामुळे कोरोनाची लागण एकमेकांना होणार नाही.
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अत्यावश्यक कामासाठी गर्दीच्या ठिकाणी जावे लागल्यास सामाजिक अंतर पाळा. आपल्यापासून इतरांचे किमान 1.5 ते 2 मीटर म्हणजेच किमान 6 फुट अंतर असू द्या.
- कोरोना विषाणू साबणाच्या पाण्यात हात धुतल्याने नष्ट होत असल्याने आपले हात साबणाने व पाण्याने किमान 20 ते 40 सेकंदापर्यंत स्वच्छ धुवा.
- साबणाने व पाण्याने हात धुणे शक्य नसल्यास 70% पेक्षा जास्त अल्कहोल असणाऱ्या हँड सॅनिटायझरचा वापर करा. हँड सॅनिटायझरची छोटी बाटली नियमित आपल्या सोबत असावी.
- सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधूनच बाहेर पडा.

- खोकताना किंवा शिंकताना नाकाला व तोंडाला रुमाल लावा. व तो रूमाल घरी आल्यावर स्वच्छ धुवा.
- घरात वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तूंची स्वच्छता ठेवा. यासाठी आपण सोडीयम हायपोक्लोराईट (Sodium Hypochlorite) यासारख्या औषधींचा वापर करू शकता. सोडीयम हायपोक्लोराईट योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून नेहमी स्पर्श होत असणाऱ्या ठिकाणी फवारणी करावी. तसेच फरशी पुसण्यासाठी क्लीनर वापरावीत.
- बाहेरून आल्यावर चप्पल/बूट दाराच्या बाहेरच ठेवावीत. बाहेर वापण्यात येणारी चप्पल घरात वापरू नये. कोणत्याही ठिकाणी स्पर्श न करता थेट साबणाने हात स्वच्छ धुवावीत. शक्यतो बाहेरच हात पाय धुवून घरात प्रवेश करावा.
- बाहेरून भाजीपाला आणल्यास मिठाच्या पाण्यात काही वेळ तसाच ठेवावा. तसेच बाहेरून आणलेल्या वस्तूंवर देखील सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी करावी.
- घरात कोणाला कोरोनासदृश लक्षणे वाटत असल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवावे. दुर्लक्ष करू नये. यामुळे आपण आपल्यासोबत परिवारालाही अडचणीत आणू शकतो. म्हणून तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधी व सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
- मनात कोणत्याही प्रकारची भीती ठेऊ नये. वारंवार कोरोनाबाबत बातम्या बघू नये अथवा वाचू नयेत. तसेच कोरोनाची आकडेवारी शोधाशोध करू नये. यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते.
- सकारात्मक रहावे. आपले विचार सकारात्मक असल्यास कोणत्याही प्रकारच्या आजारावर आपण मात करू शकतो. यामुळे आपला ईलाज लवकर होण्यात खूप मदत होते.
- दररोज व्यायाम तसेच योग साधना केल्यास नक्कीच फायदा होतो.

कोरोना विषयी अजून अधिक माहिती दुसऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत. पुढील भागात आपण आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, कोरोना होऊ नये यासाठी काय करावे आणि काय करू नये, तसेच केंद्र शासनाने व विविध राज्य शासनांनी कोणकोणते कार्यक्रम सुरु केलेले आहेत, याव्यतिरिक्त ठराविक डॉक्टर्स तसेच तज्ञांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत.
* अधिक माहितीसाठी....

0 Comments