व्हाट्सअप ची दुनिया या मथळ्याखाली आपण मागील भागात व्हाट्सअप च्या काही फीचर्स बद्दल माहिती घेतली. त्यामध्ये आपण सेटिंग मेनू मधील New Group (न्यू ग्रुप), New Broadcast (न्यू ब्रॉडकास्ट), Starred Messages (स्टार मेसेजेस) तसेच Whatsapp Web (व्हॉट्सऍप वेब) म्हणजेच संगणकावर व्हाट्सअप कसे वापरावे याबद्दल जाणून घेतले. या भागात आपण व्हाट्सअप ची अजून काही महत्वाची फीचर्स जाणून घेणार आहोत. या गोष्टी नक्कीच आपल्या फायद्याच्या किंवा मनोरंजनाच्या व आपल्याला अवाक करणाऱ्या असू शकतात. चला तर मग सुरुवात करूया व्हाट्सअप दुनिया भाग दुसरा.
आजच्या या भागात आपण व्हाट्सअप सुरु करताच समोरच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या 4 पर्यायांबाबत माहिती जाणून घेणार आहोत. हे चार पर्याय म्हणजे ईमेज,चॅट्स, स्टेटस आणि कॉल्स.

ईमेज
व्हाट्सअप उघडल्यानंतर आपल्याला चार पर्याय समोर दिसतात. त्यात पहिला पर्याय कॅमेरा चे चित्र असणारा असतो. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो पर्याय नेमका काय आहे माहित नसेल. काहींनी तर बघितलाही नसेल. त्या ईमेजच्या अर्थात कॅमेराच्या चिन्हावर क्लिक करून आपण आपल्या मोबाईल मधील इमेजेस म्हणजेच छायाचित्र पाहिजे त्या व्यक्तीस पाठवू शकतो. त्यासाठी कॅमेरा च्या चिन्हावर क्लिक करावे नंतर जे छायाचित्र पाठवायचे आहे ते निवडावे व शेवटी आपल्या संपर्कातील ज्या व्यक्तीस ते छायाचित्र पाठवायचे आहे त्याचे नाव निवडून छायाचित्र पाठवावे.
चॅटिंग/टायपिंग च्या युक्त्या
सर्वात आधी आपण चॅट करताना आपल्याला काही गोष्टी माहीत नसतील त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने संदेश कसे टाईप करावे ते जाणून घेणार आहोत. बऱ्याच वेळा आपण बघत असणार की व्हाट्सअप वर जे संदेश आपल्याला येतात त्यामध्ये काही अक्षरे ठळक म्हणजेच बोल्ड केलेली असतात. तसेच काही अक्षरे इटालिक फॉरमॅटमध्ये म्हणजेच तिरकस दिसणारी असतात. तर काही अक्षरांच्या मधोमध आडवी रेषा अक्षर खोडल्याप्रमाणे दिसते, त्याला संगणकीय भाषेत स्ट्राइक थ्रू असे म्हणतात.
ठळक अक्षर (बोल्ड)
जवळपास आपल्यापैकी सर्व व्हाट्सअप वापरकर्त्यांना काही अक्षरे, वाक्ये किंवा संपूर्ण संदेश ठळक कसा करावा हे माहीतच असेल. परंतु तरीही या पर्यायाबाद्द्ल आपण थोडक्यात जाणून घेऊया. आपल्याला जी अक्षरे ठळक म्हणजेच बोल्ड स्वरूपात लिहायचे आहेत त्या अक्षराच्या आधी व अक्षरानंतर * (स्टार) या चिन्हाचा वापर करावा.
उदा. मी व्हाट्सअप ची दुनिया हा लेख वाचत आहे. या वाक्यातील व्हाट्सअप ची दुनिया या अक्षरांना ठळक करण्यासाठी व्हाट्सअप शब्दापूर्वी व दुनिया या शब्दानंतर लागूनच * (स्टार) हे चिन्ह टाईप करावे म्हणजेच *व्हाट्सअप ची दुनिया* यापद्धतीने लिहावे. यामुळे व्हाट्सअप ची दुनिया हे शब्द आपणास ठळक झालेले दिसतील. याच पद्धतीने आपण एखादा शब्द, एखादे वाक्य किंवा संपूर्ण संदेश ठळक करू शकतात.
तिरकस अक्षर (इटालिक)
एखादे अक्षर, वाक्य किंवा संपूर्ण संदेश आपणास इटालिक म्हणजेच तिरकस स्वरूपात लिहायचा असेल तर त्यासाठी _ (अंडरस्कोर) म्हणजेच शब्दाच्या अगदी तळ्याला लागून येणारी रेषा या चिन्हाचा वापर करून आपण पाहिजे ते अक्षर, वाक्य किंवा पूर्ण संदेश तिरकस स्वरूपात लिहू शकतो.
उदा. मी गिरीजा अकॅडमी या संकेतस्थळावर तंत्रज्ञान विषय शिकत आहे.
वरील वाक्यात गिरीजा अकॅडमी हा शब्द बोल्ड स्वरूपात लिहिलेला असून तंत्रज्ञान हा शब्द बोल्ड तसेच इटालिक स्वरुपात लिहिलेला आहे. तंत्रज्ञान शब्द तिरकस लिहिण्यासाठी _तंत्रज्ञान_ अर्थात तंत्रज्ञान शब्द _ अंडरस्कोर या चिन्हांच्यामध्ये लिहिला आहे. याच पद्धतीने आपण वाक्य अथवा संपूर्ण संदेश इटालिक म्हणजेच तिरकस लिहू शकतो.
स्ट्राइक थ्रू
एखादे अक्षर, वाक्य किंवा संपूर्ण संदेश आपणास लिहून खोडल्याप्रमाणे दर्शवायचा असल्यास म्हणजेच अक्षराच्या मधोमध आडवी रेषा येईल अशा पद्धतीने लिहायचा असल्यास ~ (टील्ड) या चिन्हाचा वापर करावा लागतो.
उदा.स्ट्राईक केलेले अक्षर हे खोडल्यासारखे दिसते.
वरील उदाहरणात स्ट्राइक या शब्दाच्या मध्ये आडवी रेष म्हणजेच तो शब्द लिहून खोडल्याप्रमाणे दिसत आहे. याच पद्धतीने आपण एखादे वाक्य अथवा संपूर्ण संदेश स्ट्राईक करून लिहू शकतो.
फॉन्ट बदल
एखाद्या अक्षराचा, वाक्याचा किंवा संपूर्ण संदेशचा फॉन्ट आपणास बदलायचा असेल तर त्यासाठी ``` (बॅक कोट) या चिन्हाचा वापर तीन वेळेस करावा म्हणजे ते अक्षर, वाक्य किंवा संदेश मोनोस्पेस या फॉन्ट मध्ये दिसेल. ज्या अक्षराचा, वाक्याचा किंवा संपूर्ण संदेशचा फॉन्ट बदलायचा असेल त्याच्या अगोदर तसेच शेवटी बॅक कोट हे चिन्ह प्रत्येकी तीन वेळा लिहावे.
उदा. मी तंत्रज्ञान हा विषय शिकत आहे.
वरील वाक्यात तंत्रज्ञान हा शब्द तुम्हाला इतर शब्दांपेक्षा वेगळ्या फॉन्ट मध्ये दिसेल. तंत्रज्ञान शब्द आधी तसेच त्यानंतर बॅक कोट हे चिन्ह प्रत्येकी तीन-तीन वेळा वापरलेले आहे म्हणजेच ```तंत्रज्ञान``` या पद्धतीने लिहावे लागेल.
वर आपण चार वेगवेगळ्या प्रकाराने अक्षर, वाक्य किंवा पूर्ण संदेश बदलून बघितला आहे. तसेच वर दिलेली सर्व चिन्ह तुम्ही एकत्रीतरित्या देखील वापरू शकतात व वेगवेगळ्या प्रकारचे अक्षरे, वाक्य बदलून बघू शकतात. समजा तुम्हाला एखादा शब्द किंवा वाक्य तिरकस तसेच ठळक असे दोन्ही स्वरूपात हवे असेल तर त्या अक्षरा पूर्वी व अक्षरा नंतर तुम्ही स्टार * व अंडरस्कोर _ हे दोन्ही चिन्हे वापरावीत.
तसेच तुम्हाला एखादे अक्षर ठळक, तिरकस तसेच खोडल्याप्रमाणे हवे असेल तर स्टार *, अंडर स्कोर _ व टील्ड ~ हे तिन्ही चिन्हे या शब्दाच्या अगोदर व नंतर वापरावीत.
स्टेटस
आता आपण स्टेटस यामध्ये कोणकोणते पर्याय महत्त्वाचे आहेत हे बघणार आहोत. आपण एखादे स्टेटस टाईप म्हणजेच टेक्स्ट फॉर्मटमध्ये लिहून लावलेले असते ते स्टेटस एखाद्या व्यक्तीला पाठवायचे असेल तर त्यासाठी ते आपण दोन पद्धतीने समोरच्या व्यक्तीला पाठवू शकतो.
पहिली पद्धत :- टेक्स्ट स्वरूपातील स्टेटस टेक्स्ट स्वरूपातच पाठवायचे असल्यास आपल्या Whatsapp मध्ये स्टेटस या पर्यायावर जाऊन My Status (माय स्टेटस) या नावाच्या पुढे तीन टिंबे आडव्या रेषेत दिसतील त्यावर क्लिक करावे. आता आपल्याला आपण जेवढे स्टेट्स लावलेले आहेत ते दिसतील. त्यातील जे स्टेटस आपणास समोरच्या व्यक्तीस पाठवायचे आहे त्याच्या समोरील 3 उभ्या रेषेतील टिंबांना क्लिक करून Forward (फॉरवर्ड) हा पर्याय निवडावा व ज्या व्यक्तीस ते पाठवायचे असेल त्या व्यक्तीचे नाव निवडून आपले स्टेटस फॉरवर्ड करावे. हा पर्याय वापरून केवळ Whatsapp वरच आपण आपले स्टेटस Forward (फॉरवर्ड) करू शकतो इतर माध्यम जसे facebook, telegram, instagram यावर ते फॉरवर्ड करू शकत नाही.
दुसरी पद्धत :- टेक्स्ट स्वरूपातील स्टेटस एखाद्या व्यक्तीला इमेज स्वरूपात पाठवायचे असेल तर त्यासाठी स्टेटस या पर्यायावर जाऊन My Status (माय स्टेटस) या नावाच्या पुढे तीन टिंबे आडव्या रेषेत दिसतील त्यावर क्लिक करावे. आता आपल्याला आपण जेवढे स्टेट्स लावलेले आहेत ते दिसतील. त्यातील जे स्टेटस आपणास समोरच्या व्यक्तीस इमेज स्वरुपात पाठवायचे आहे त्याच्या समोरील 3 उभ्या रेषेतील टिंबांना क्लिक करून Share (शेअर) हा पर्याय निवडावा. त्यानंतर ज्या माध्यमातून ते पुढे पाठवायचे आहे ते माध्यम म्हणजेच whatsapp, facebook, telegram इ. निवडावे व ज्या व्यक्तीस पाठवायचे आहे त्या व्यक्तीचे नाव शोधून आपले स्टेटस शेअर करावे. या पद्धतीत शेअर केलेल्या स्टेटसमध्ये लिहिलेले टेक्स्ट हे इमेज स्वरूपात असल्याने त्यात आपण बदल करू शकत नाही याव्यतिरिक्त पहिल्या पद्धतीत टेक्स्ट स्वरूपातील स्टेटस हे टेक्स्ट स्वरूपातच असल्याने त्यात आपण पाहिजे तो बदल करू शकतो. तसेच या पर्यायात म्हणजेच शेअर करताना आपण कोणत्याही माध्यमावर (whatsapp, facebook, telegram इ) ते पाठवू शकतो.
कॉल्स
व्हाट्सअप उघडल्यानंतर आपल्याला चार पर्याय दिसतात. त्यात पहिला पर्याय कॅमेरा चे चित्र असणारा, दुसरा चॅट, तिसरा स्टेटस, आणि चौथा कॉल्स असे चार पर्याय समोरच दिसतात, त्यातील पहिल्या तीन पर्यायांची माहिती आपण बघितली. आता चौथा पर्याय म्हणजे कॉल्स. यामध्ये आपण आपल्या व्हाट्सअप कॉन्टॅक्ट मधील कोणत्याही व्यक्तीस व्हॉइस कॉल्स तसेच व्हिडिओ कॉल्स असे दोन्ही प्रकारचे कॉल्स करू शकतो. व्हाईस कॉल पेक्षा व्हिडिओ कॉलला व्हाट्सअप मध्ये अधिक प्रचलित असल्याचे दिसून येते. व्हिडिओ कॉल मध्ये सध्या एकावेळी आठ व्यक्ती एकमेकांशी संवाद साधू शकतात. याआधी केवळ चारच व्यक्तींना असा संवाद साधता येत होता. व्हिडिओ कॉलमध्ये व्यक्ती जोडण्यासाठी एखाद्याला कॉल सुरू असताना त्याच स्क्रीनवर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात कॉन्टॅक्ट चे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करून आपल्याला पाहिजे त्या व्यक्तीस आपण व्हिडिओ कॉल मध्ये जोडू शकतो. अशा पद्धतीने ८ लोकांना आपण एकाच वेळी त्यामध्ये जोडून संवाद साधू शकतो.
------------------------------------
* वाचा - व्हाट्सअँप ची दुनिया - भाग 1

उदा.

आज आपण व्हाट्सअप मधील अजून काही नविन गोष्टी शिकलो. त्या कशा वाटल्या यासाठी आपण खाली Post a Comment विभागात आपले मत नोंदवू शकता. तसेच व्हाट्सअप बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गिरीजा अकॅडमीच्या संकेतस्थळाला भेट देत रहा. ही पोस्ट आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी तसेच इतर आप्तेष्टांना अधिकाधिक शेअर करा.
* वाचा - व्हाट्सअँप ची दुनिया - भाग 1
------------------------------------

0 Comments