
महाराष्ट्र पोलीस भरती - Maharashtra Police Bharti
महाराष्ट्र पोलीस भरती - Maharashtra Police Bharti | Maharashtra Police Bharti 2025
महाराष्ट्र राज्य पोलीस कॉन्स्टेबल/शिपाई भरतीकडे राज्यातील शहरी तसेच प्रामुख्याने ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांचे विशेष लक्ष लागून असते. देशसेवेसाठी कार्य करण्याची तसेच खाकी चा रुबाब दाखवण्याची उत्कट इच्छा असणारे भरपूर इच्छुक उमेदवार पोलीस भरतीची विशेष वाट पाहत असतात. भरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच उमेदवार परीक्षेची व मैदानी चाचणीची जोरदार तयारी सुरु करतात. मात्र काही उमेदवारांना परीक्षेची तयारी करीत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे क्षमता असूनही लहानशा चुकीमुळे पदापासून वंचित रहावे लागते.
ग्रामीण भागातील काही उमेदवारांचा पुरेशी माहिती उपलब्ध होत नसल्याने त्यांना संबंधित माहिती मिळविण्यात तसेच भरती प्रक्रिया जाणून घेण्यात बराच वेळ वाया जातो. तसेच काहींना भरती कधी होईल, शारीरिक चाचणी कशी असते?, शारीरिक चाचणीला गुण कसे असतात?, परीक्षेचे hallticket कोठे आणि कधी उपलब्ध होईल?, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल?, कोणती पुस्तके वाचावी लागतील? यासारखे अनेक प्रश्न पडतात.मात्र त्यांना त्या प्रश्नांचे उत्तर एका ठीकानी उपलब्ध होऊ न शकल्याने बराच वेळ उमेदवारांचा वाया जातो. मात्र अशाच काही होतकरू व खाकी वर्दी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना लक्षात घेऊन खास त्यांच्या आग्रहास्तव पोलीस भरती प्रक्रियेविषयी हा लेख प्रसिध्द करीत आहे. या लेखात आपण भरती प्रक्रिया सोबतच त्यासाठी लागणारे अभ्यास साहित्य, अभ्यासाचे नियोजन, सराव इ. सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
सदर लेखामध्ये आपण खालील मुद्दे जाणून घेणार आहोत.
- भरती प्रक्रिया कशी असते ?
- पोलीस भरती २०२५ कधी होणार ? - Police bharti date 2025
- पोलीस भरती प्रक्रियेचे टप्पे - Police Bharti Stages
- पोलीस भरती साठी वयोमर्यादा काय असते ? - Maharashtra police bharti age limit
- शारीरिक चाचणीचे स्वरूप - Police bharti physical test details |
- शारीरिक चाचणीला गुण कसे असतात? - Maharashtra police bharti ground marks
- लेखी परीक्षेचे स्वरूप - Written Exam
- कोणते पुस्तक वाचावीत ? - Police bharti book list
- Hallticket कोठे डाउनलोड करावे ?
- २०२४ ची भरती कशी राबविण्यात आली होती? - Maharashtra police bharti 2024
भरती प्रक्रिया - Maharashtra Police bharti 2025
महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रक्रियेच्या स्वरूपात शासन वेळोवेळी बदल करीत आहे. सध्या शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आधी मैदानी चाचणी म्हणजेच शारीरिक चाचणी - Physical test व त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. मैदानी चाचणी ५० गुणांची होणार असून लेखी परीक्षा १०० गुणांची असेल. शेवटी एकूण १५० गुणांपैकी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. सदर भरती ही चालक पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बल व पोलीस शिपाई अशा पदांसाठी घेण्यात येणार आहे. पोलीस भरती २०२५ साठी सुमारे १५००० जागांसाठी ही जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे पोलीस बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची जाहिरात म्हणता येईल.
पोलीस भरती २०२५ कधी होणार ? - Police bharti date 2025
सन २०२५ ची पोलीस भरती १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरुवात होणार असल्याची माहिती शासनाने जाहीर केलेली आहे. तरी फॉर्म भरल्यानंतर साधारणत: ऑक्टोबर महिन्यात शारीरिक तसेच लेखी परीक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलीस भरतीच्या तयारीसाठी लागलेल्या उमेदवारांना परीक्षा कशी होईल, मैदानी चाचणीचे स्वरूप कसे असेल तसेच अभ्यास कसा करावा, अभ्यासाहित्य कोणते असावे असे विविध प्रश्न नक्कीच पडले असतील. त्यासाठीच आपण पोलीस भरती विशेष या सदराखाली संपूर्ण माहिती व तयारी करून घेणार आहोत.
पोलीस भरती प्रक्रियेचे टप्पे
१) शारिरीक चाचणी
२) कौशल्य चाचणी (फक्त चालक पदासाठी)
३) लेखी परीक्षा
४) कागदपत्रे छाननी
पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा काय असते ?
Police bharti age limit 2025
पोलीस भरतीसाठी साधारणत: १८ ते २८ खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा असते. तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षे वयोमर्यादा शिथिल असते म्हणजेच ३३ वर्षे वयोमर्यादा असते.
शारिरीक चाचणीचे स्वरूप -
Police bharti physical test details |
Maharashtra police bharti ground marks
पोलीस शिपाई पदाकरिता
| पुरुष उमेदवार | महिला उमेदवार | गुण |
| 1600 मीटर धावणे | 800 मीटर धावणे | 20 गुण |
| 100 मीटर धावणे | 100 मीटर धावणे | 15 गुण |
| गोळाफेक | गोळाफेक | 15 गुण |
| एकूण गुण | 50 गुण |
पोलीस शिपाई चालक पदाकरिता
| पुरुष उमेदवार | महिला उमेदवार | गुण |
| 1600 मीटर धावणे | 800 मीटर धावणे | 30 गुण |
| गोळाफेक | गोळाफेक | 20 गुण |
| एकूण गुण | 50 गुण |
सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता
| पुरुष उमेदवार | महिला उमेदवार | गुण |
| 5 किमी धावणे | - | 50 गुण |
| 100 मीटर धावणे | - | 25 गुण |
| गोळाफेक | - | 25 गुण |
| एकूण गुण | 100 गुण |
पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी
शारिरीक चाचणी झाल्यानंतर त्यात किमान 50%टक्के गुण मिळवून लेखी परीक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांना चालक पदाच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र समजले जाईल. त्यानंतर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रितपणे किमान 40% गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच लेखी परीक्षेसाठी विचार करण्यात येईल. मात्र कौशल्य चाचणीचे गुण अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना विचारात घेतले जाणार नाहीत. कौशल्य चाचणी केवळ अर्हता चाचणी असेल.कौशल्य चाचणीचे स्वरूप
१) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी - 25 गुण
२) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी - 25 गुण
लेखी परीक्षा -
Police Bharti Written Exam
- शारिरीक चाचणीत किमान 50% गुण मिळविलेले उमेदवारच 1:10 प्रमाणात लेखी परीक्षेस पात्र ठरतील.
- लेखी परीक्षेत किमान 40% गुण मिळविणे अनिवार्य आहे. किमान 40% पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना अपात्र समजण्यात येईल.
- लेखी परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नाला एक गुण म्हणजेच परीक्षा 100 गुणांची असेल.
- सर्व प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील.
- परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
- लेखी परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल.
- लेखी परीक्षेची भाषा ही मराठी असेल.
- लेखी परीक्षेसाठी मराठी व्याकरण, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे 4 विषय असतील. प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न असतील.
- चालक पदासाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी मराठी व्याकरण, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि मोटार वाहन चालविण्याचे व वाहतुकीचे नियम असे एकूण 5 विषय असतील. प्रत्येक विषयाचे 20 प्रश्न असतील.
लेखी परीक्षा स्वरूप - Police bharti Syllabus
| इतर | विषय | गुण |
परीक्षा कालावधी - ९० मिनिटे परीक्षेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण प्रश्न संख्या - १०० प्रत्येकी १ गुण | मराठी व्याकरण | 25 गुण |
| अंकगणित | 25 गुण | |
| बुद्धीमत्ता चाचणी | 25 गुण | |
| सामान्यज्ञान व चालू घडामोडी | 25 गुण | |
| एकूण गुण | 100 गुण |
चालक पदासाठी परीक्षा स्वरूप - Syllabus
| इतर | विषय | गुण |
परीक्षा कालावधी - ९० मिनिटे परीक्षेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एकूण प्रश्न संख्या - १०० प्रत्येकी १ गुण | मराठी व्याकरण | 20 गुण |
| अंकगणित | 20 गुण | |
| बुद्धीमत्ता चाचणी | 20 गुण | |
| सामान्यज्ञान व चालू घडामोडी | 20 गुण | |
| मोटर वाहन व वाहतुकीचे नियम | 20 गुण | |
| एकूण गुण | 100 गुण |
सर्वप्रथम कोणतीही लेखी परीक्षा देतांना परीक्षेचा अभ्यासक्रम माहीत असणे आवश्यक असते. अभयसक्रमासोबतच मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका देखील आपल्या जवळ असणे गरजेचे असते, त्यामुळे परीक्षेत प्रश्न कशा पध्दतीने विचारले जातात हे आपणास लक्षात येते व अभ्यास करताना आपणास याचा फायदा होतो. प्रश्नपत्रिका जरी आपल्याकडे नसतील तरी कोणत्याही पुस्तकालयावर आपणास मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सेट असलेले पुस्तक मिळते. प्रश्नसंचाचे पुस्तक घेताना जर ते विश्लेषणासाहित असेल तर अधिकच फायद्याचे ठरते. सध्या आलेल्या पोलीस भरतीच्या जाहिरातीत संपूर्ण अभ्यासक्रम तसेच परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे. त्यावरून विषयनिहाय अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे, त्याचा विश्लेषणात्मक अभ्यास करून योग्य ती रणनीती आखणे परीक्षेसाठी करणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रम - Syllabus
पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धीमापन चाचणी तसेच सामान्यज्ञान व चालू घडामोडी हे प्रमुख विषय असून प्रत्येकी 25 प्रश्न या विषयांसाठी असतात. प्रत्येक प्रश्नाला १ गुण याप्रमाणे एकूण १०० गुण असतात.मराठी व्याकरण - Marathi Grammar
- वर्णमाला
- स्वर व व्यंजन
- शब्दांच्या जाती
- लिंग आणि वचन
- विभक्ती व विभक्तीप्रत्यय
- समास व प्रकार
- क्रियापद
- संधी
- शब्दसिद्धी
- काळ व काळाचे प्रकार
- समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
- वाक्य व वाक्यांचे प्रकार
- अलंकार
- वाक्यप्रचार व म्हणी
- विरामचिन्हे
वरिल मुख्य घटकांसहित मराठी व्याकरणातील सर्व मूळ घटकांवर प्रश्न विचारले जातात.
अंकगणित - Mathematics
- संख्या व संख्यांचे प्रकार
- लसावि व मसावि
- अपूर्णांक
- सरासरी
- वर्ग व वर्गमूळ
- शेकडेवारी
- नफा व तोटा
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- काळ, काम, वेग
- गुणोत्तर व प्रमाण
बुद्धिमत्ता चाचणी - Reasoning
- संख्या मालिका
- अक्षर मालिका
- सम संबंध
- श्रेणी
- दिशा
- आकृत्यांवरील प्रश्न
- व्हेन आकृत्या
- घड्याळ
- दिनदर्शिका
सामान्यज्ञान व चालू घडामोडी - Current Affairs|General Studies
- इतिहास
- समाज सुधारक
- भूगोल
- सामान्य विज्ञान
- नागरिकशास्त्र
- पंचायत राज
- चालू घडामोडी
अभ्याससाहित्य - Police Bharti Book List
| विषय | पुस्तकाचे नाव | लेखक / प्रकाशन |
| मराठी | मराठी संपूर्ण व्याकरण सुगम मराठी व्याकरण | बाळासाहेब शिंदे मो. रा. वाळंबे |
| अंकगणित | संपूर्ण गणित Fastrack Maths | पंढरीनाथ राणे सतीश वसे |
| बुद्धीमत्ता | बुद्धीमापन चाचणी | अनिल अंकलगी/ज्ञानदीप प्रकाशन |
| सामान्यज्ञान | पोलीस भरती परिपूर्ण मार्गदर्शक | एकनाथ पाटील |

0 Comments