सांगली पोलीस भरती २०१९


------------------------------
घटक - सामान्यज्ञान
------------------------------


1. मराठी राज्यभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 
A. 27 फेब्रुवारी
B. 2 मार्च
C. 30 जून
D. 2 मे

2. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे?
A. 200 प्रति चौरस किमी
B. 799 प्रति चौरस किमी
C. 465 प्रति चौरस किमी
D. 365 प्रति चौरस किमी

3. पॅरालिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या?
A. मुंबई    
B. टोकियो    
C. लंडन    
D. बर्लिन

4. 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण ?
A. एन. के. सिंह
B. अरुण कुमार 
C. विमल गुप्ता
D. अभिषेक पांडे

5. महाराष्ट्राचा राज्यपशू कोणता?
A. घोरपड    
B. शेकरू    
C. हरीण    
D. चिता

6. भरतनाट्यम् नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
A. कर्नाटक    
B. तमिळनाडू    
C. ओडिसा    
D. बिहार

7. लवलीना बोरगोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
A. क्रिकेट    
बॉक्सिंग    
C. हॉकी    
D. टेनिस

8. जम्मू व काश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित (in effect) करण्यात आलेले आहे?
A. 5/10/2019    
B. 15/10/2019    
C. 26/10/2019    
D. 31/10/2019

9. राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? 
A. कोल्हापूर 
B. सोलापूर
C. सांगली
D. यापैकी नाही.

10. म्युकरमायकोसिस (mucormycosis) हा आजार कशाने होतो? 
A. जीवाणू
B. विषाणू
C. बुरशी 
D. प्रोटोजोवा

11. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
A. पद्मश्री 
B. पद्मविभूषण 
C. पद्मभूषण
D. भारतरत्न

12. ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्थरावर असतो ?
A. उष्णकटिबंधीय (troposphere) 
B. समतापमंडल (stratosphere) 
C. मेसोस्फीअर (mesosphere) 
D. आयनोस्फीअर (ionosphere)

13. 'ययाति' या कादंबरीचे लेखक कोण ?
A. शिवाजी सावंत
B. पु. ल. देशपांडे
C. साने गुरुजी
D. वि. स. खांडेकर

14. औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? 
A. कोल्हापूर 
B. सोलापूर 
C. सांगली
D. सातारा

15. शिख धर्माची स्थापना कोणी केली? 
A. गुरु गोविंद सिंह 
B. गुरू नानक 
C. गुरू तेज बहादूर 
D. गुरू रामदास

16. भारतीय राज्यघटनेत 'मूलभूत कर्तव्य' कोणत्या कलमामध्ये विस्तृत आहेत?
A. 50
B. 50 अ
C. 51
D. 51 अ

17. कोणत्या दगंड अग्नीज (igneous) आहे? 
A. मार्बल
B. ग्रेनाईट
C. शेल
D. क्ले

18. 'हितवाद' या वृतपत्राचे जनक कोण?
A. बाळ गंगाधर टिळक 
B. महात्मा ज्योतिबा फुले
C. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 
D. गोपाळ कृष्ण गोखले

19. खालीलपैकी राष्ट्र क्वाड (QUAD) समूहाचा सदस्य नाही ?
A. भारत
B. जपान
C. स्पेन
D. अमेरिका

20. लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? 
A. सिक्किम
B. मेघालय
C. मणिपूर
D. त्रिपुरा

21. अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
A. अर्थशास्त्र
B. वैद्यकीय शास्त्र
C. क्रीडा
D. राजकारण

22. 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली ?
A. 5
B. 6
C. 7
D. 8

23. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (National institute virology) कोणत्या शहरात स्थित आहे?
A. पुणे
B. मुंबई
C. नागपूर
D. वाशीम

24. चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे?
A. सांगली
B. सिंधुदुर्ग
C. रत्नागिरी
D. पालघर

25. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण?
A. शरद पवार
B. उद्धव ठाकरे
C. देवेंद्र फडणवीस
D. अशोक चव्हाण


------------------------------
घटक - मराठी
------------------------------


26. 'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार |' या वाक्याचा अलंकार ओळखा.
A. यमक
B. अनुप्रास
C. दृष्टांत
D. रूपक

27. मराठीत किती वचन आहेत ?
A. एक
B. दोन
C. तीन
D. चार

28. 'मी रोज काम करत जाईल' या वाक्याचा काळ ओळखा?
A. साधा भविष्यकाळ
B. पूर्ण भविष्यकाळ 
C. अपूर्ण भविष्यकाळ
D. चालू पूर्ण भविष्यकाळ

29. 'गंभीर' या शब्दाचा विरुद्धार्थी काय?
A. अवखळ
B. साव
C. असूर
D. अजान

30. आधी शिदोरी मग .......
A. जेजुरी
B. मजुरी
C. हजेरी
D. कोरी

31. कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला. सदर वाक्यात अधोरेखित शब्दाचा समास कोणता?
A. द्वंद्व
B. बहुविही
C. अव्ययीभाव 
D. तत्पुरुष

32. यथेष्ट = ?
A. यथ + इष्ट
B. यथा + इष्ट
C. य + थइष्ट
D. यथाई + ट

33. गुरांचा समूह म्हणजे?
A. खिल्लार
B. कळप
C. पुंजी
D. रास

34. खालीलपैकी अवतरणचिन्ह कोणते?
A. ("")
B. (;)
C. (,)
D. (/)

35. 'तो चित्र काढतो.' हे वाक्य कशाचे उदाहरण आहे? 
A. कर्तरी प्रयोग 
B. कर्मणी प्रयोग 
C. भावे प्रयोग 
D. वरीलपैकी नाही

36. 'आई चाकूने भाजी कापते' या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ति दर्शवतो?
A. आई
B. चाकूने
C. भाजी
D. कापते

37. अचल = ?
A. स्थिर
B. चंचल
C. मोठा
D. स्त्री

38. 'वासरू' या शब्दाचे लिंग काय?
A. पुल्लिंग
B. स्त्रीलिंग
C. बाललिंग
D. नपुंसकलिंग


39. 'गाय'चे अनेकवचन ?
A. गाय
B. गाया
C. गायी
D. गायायी

40. 'धावणे आरोग्यासाठी चांगले असते.' या वाक्यात क्रियापद कोणते?
A. धावणे
B. आरोग्यासाठी 
C. चांगले
D. असते

41. 'मी आज स्वतः काम करणार आहे.' या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते?
A. मी
B. काम 
C. स्वत:
D. आहे

42. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ----------- असे म्हणतात.
A. सर्वनाम
B. विशेषण
C. विभक्ती
D. वचन

43. ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो. त्यास ........ असे म्हणतात.
A. अव्ययीभाव समास
B. तत्पुरुष समास 
C. द्विगु समास
D. बहुब्रिही समास

44. सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात ?
A. गर्जना
B. चिवचिव
C. फुसफुस
D. कावकाव

45. अति तेथे......?
A. स्तुति
B. फुर्ती
C. गती
D. माती

46. 'अक्कल खाती जमा' या म्हणीचे अर्थ ?
A. रागवणे 
B. खूप संतापणे 
C. खूप आनंदी होणे 
D. नुकसान होणे

47. साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपित लिहिली जाते?
A. रोमन
B. देवनागरी
C. गुरूमुखी
D. ठान

48. 10 चा 10 वा घात (₁₀¹⁰)?
A. कोटी
B. दशकोटी
C. अब्ज
D. दहा अब्ज

49. अशुद्ध शब्द कोणता?
A. पक्षी
B. नविन
C. ऊस
D. त्याग

50. 'सुंदर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ?
A. आकर्षक
B. कुरूप
C. मोहक
D. प्रसन्न

 

------------------------------
घटक - अंकगणित
------------------------------


51) 10 मीटर = ?
A. 1000 सेंमी 
B. 100 सेंमी
C. 1 सेंमी
D. 10000 सेंमी

52) जर 9261 * A = 441* 21 तर A= ? 
A. 11
B. 10
C. 1 
D. 111

53) अमित, सुमित व रोहित यांच्या वजनाची सरासरी 20 आहे, त्यांच्या वजनाचा अनुमान अनुक्रमे 1:2:3 आहे. तर सुमितच वजन किती ?
A. 10
B. 15
C. 20
D. सांगता येत नाही

54) 1, 4, 27, ?, 3125
A. 64
B. 256
C. 512
D. 1026

55) जर कोणत्या संख्येचा 50%, त्याच संख्येचा 20% पेक्षा 300 ने अधिक आहे. तर ती संख्या कोणती? 
A. 100
B. 300
C. 1000
D. 3000

56. अमित व त्याच्या वडिलांच्या वयाची सरासरी 30 आहे जर अमितचे वडील व आजोबा यांचे वय अमितच्या वयाचा अनुक्रमे दुप्पट व तिप्पट आहे तर आजोबाच वय किती ?
A. 30
B. 45
C. 60
D. 75

57) एका झाडाची उंची 5 फूट आहे जर दरवर्षी ते झाड स्वत:च्या उंची पेक्षा 1/10 ने वाढते, तर 3 वर्षानंतर त्याची उंची किती होणार ?
A.6.005
B.6.05
C. 6.055
D. 6.655

58) जर a + b = 10, a२ - b२= 40, तर a-b= ?
A. 4
B. 3
C. 2
D. 1

59) एका भाषेत DOG म्हणजे CNF, MOUSE म्हणजे LNTRD, तर SPIDER म्हणजे ? 
A. RNHEDQ
B. ROHCDQ 
C. RHOQDE 
D. RKSQDE

60) एका गटात 100 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते. 52 ला कबड्ड़ी आवडते व 20 ला दोन्ही आवडतात, तर किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही? 
A. 1
B. 2
C. 3
D. 4

61) जर दोन दिवसापूर्वी रविवार होता, तर गुरुवार कधी येणार?
A. आज
B. 1 दिवसानंतर
C. 2 दिवसानंतर 
D. 3 दिवसानंतर

62) अजय एक काम 6 तासात पूर्ण करतो व विजय एक काम 10 तासात पूर्ण करतो. तर दोघे सोबत किती तासात काम पूर्ण करतील?
A. 3 तास
B. 3 तास 15 मिनिटे
C. 3 तास 30 मिनिटे
D. 3 तास 45 मिनिटे

63) विजोड पद कोणते.
143, 169, 197, 221, 247
A. 169
B. 197
C. 221
D. 247

64) 1000 चे 20% चे 20% = .......
A. 10
B. 40
C. 80
D. 100

65) एक रकमेच्या चक्रवाढ व्याज व साधे व्याजमधील फरक (5% दराने, 2 वर्षासाठी) 250 रुपये आहे. तर ती रक्कम किती?
A. 100000
B. 80000
C. 40000
D. 120000

66) जर एक क्रमांक 59P8257, 13 ने अगदी विभाज्य आहे. तर P = ?
A. 1
B. 2
C. 3
D. 4

67) जर MQ = PU, SD = VH, तर TI = ? 
A. MU
B. MW
C. WM
D. WU

68) AABABCABCDABCDEABCDEF?
A. A
B. B
C. C
D. D

69) 74088 चे घनमूळ किती?
A.42
B. 52
C. 62
D. 72

70) 1000+ 100+10+1=? 
A. 1001
B. 1010
C. 1111
D. 72


------------------------------
घटक - बुद्धिमत्ता चाचणी
------------------------------


प्रश्न 71 ते 75 
एक विशिष्ट भाषेत 
"work is worship" म्हणजे jk rt pq 
"work hard always" म्हणजे jk mn uv "always do worship" म्हणजे uv st pq 
"hard time passes" म्हणजे  mn ab ef

71) Work = ?
A. rt
B. mn
C. ab
D. jk

72) Worship = ? 
A. rt
B. mn 
C. pq
D. ef

73) Hard = ?
A. It 
B. mn 
C. pq
D. ef

74) Always = ?
A. uv
B. mn
C. pq
D. rt

75) Is = ? 
A. rt 
B. mn 
C. pq 
D. ef

76) 9.8, ? , 8.9, 11.6, 8, 12.5
A. 10.7
B. 11.3
C. 10.2
D. 12.3

77) 400, 274, 209, 181, 172, ? 
A. 151 
B. 180
C. 170
D. 150

78) 34, 18, 10, 6, ?, 3
A. 9
B. 3
C. 4
D. 2

79) चार वर्षापूर्वी A व B चे गुणोत्तर 3 : 4 होत. A, B व वयाची सरासरी 36 वर्ष आहे. C हा B पेक्षा 11 वर्षाने आहे. B चे वय किती? 
A. 33 
B. 32
C. 31
D. 30

80) 4368 ही संख्या 8400 चे किती टक्के आहे? 
A. 41
B. 51
C. 42
D. 52

81) 20 चित्रे बनविणे करिता 30 मिनिटे लागतात, तर 1 चित्र किती मिनिटात बनणार ?
A. 16
B. 20
C. 18
D. 22

82) 25, 30, 35, 40 चे लसावि किती?
A. 3800 
B. 4400
C. 4200
D. 4000

83) 36, 48 व 84 चे मसावि किती ?
A. 12 
B. 14
C. 16
D. 18

84) 11111 X 1111=?
A. 123454321 
B. 123412341
C. 122112211
D. 121345431

85) जर 5x = 6y = 3z = 9m तर सर्वाधिक मूल्य कशाचे ? 
A. x 
B. y 
C. z
D. m

86) जर A=10, B = 15 तर (AXB) + A+B=?
A. 175
B. 185
C.180
D. 190

87) जर a + b = 10, a- b = 2, 
तर a * b = ?
A. 20
B. 24
C. 28
D. 32

88) 60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वेगाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते, तर त्या रेल्वेगाडीची लांबी किती?
A. 100 मीटर 
B. 150 मीटर 
C. 200 मीटर 
D. 250 मीटर 

89) जर स्वातंत्र दिन रविवारी येतो तर महात्मा गांधी जयंती कधी येणार?
A. शनिवार
B. रविवार
C. सोमवार
D. बुधवार

90) 1 मीटर म्हणजे किती इंच?
A. 39.37
B. 40.37
C. 41.37
D. 42.37

91) HAT: 2018, TAP: 16120: ? : 20118
A. BAT
B. CAT
C. RAT
D. FAT

92) अंकांच्या स्थानांची आदलाबदल केल्यास कोणती संख्या सर्वात मोठी होईल?
33, 22, 44, 12, 34
A. 33
B. 12
C. 34
D. 44

93) 1 ते 200 पर्यंतच्या अंकांची बेरिज किती ?
A. 21000
B. 20100
C. 20010
D. 21100

94) विसंगत दिशा कोणती?
A. पूर्व
B. आग्नेय
C. उत्तर
D. दक्षिण

95) घड्याळात 9 वाजता तास व मिनिट काट्यात कोनाचा अंश किती?
A. 45
B. 90
C. 135
D. 180

96) 600 चे 40% - 250 = x - 900 चे 77% तर x = ?
A. 663
B. 673
C. 683
D. 693

97) जर 9x + 3y = 15 आणि 4x + 5y = 14 तर
A. x = y
B. x > y
C. x < y
D. x >= y

98) 115÷5+12* 6 = x + 64÷4 - 35
A. x = 112
B. x = 114
C. x = 116
D. x = 118

99) 110 चे 20% किती?
A. 20
B. 21
C. 22
D. 23

100) 10 ^ x + 10 =110 तर x=?
A. 1
B. 2
C. 3
D. 4

 

वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी झालेल्या पोलीस शिपाई भरतीच्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांसाठी (उत्तरासहित) कमेन्ट बॉक्स मध्ये आपले नाव, मोबाईल नंबर पाठवा.  आपला अभिप्राय नोंदवा किंवा ईमेल द्वारे संपर्क साधा.

Post a Comment

0 Comments