जागेश्वर मोठे महादेव मंदिर हे अडावद गावातील एक स्वयंभू,
जागृत व पुरातन देवस्थान आहे. गावातील शिवभक्त येथे दररोज सकाळ/संध्याकाळ मोठ्या संख्येने हजर
राहून आरती, पूजा अर्चा करतात. महाशिवरात्रीला येथे अनन्यसाधारण महत्व असून प्रचंड संख्येने जनसागर लोटला जातो जणू
यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. या दिवशी भाविक भक्तगण येथे जमून रात्री पासूनच
महादेवाची विधिवत पूजा, महाआरती, जागरण करतात. संपूर्ण परिसर
हजारो पणत्या प्रज्वलित करून उजाळून निघतो. भाविकांची प्रचंड अशी गर्दी होऊन
दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा येथे लागतात. तसेच या दिवशी येथे भंडाऱ्याचे देखील
आयोजन केले जाते. संपूर्ण गावातील भाविक भक्त महाप्रसादाचा
लाभ घेतात व संपूर्ण गांव या महोत्सवात सहभागी होते.
अगदी मनमोहक , प्रसन्न अशा शांततामय ठिकाणी हे मंदिर अडावद गावात स्थित आहे. तसेच
मंदिराच्या परिसरातच श्री दत्त मंदिर, संकटमोचन हनुमान मंदिर, सद्गुरू गुजराथी बाबा समाधी स्थळ देखील आहेत. तसेच गणेशोत्सवात
श्रींची प्रतिष्ठापना करून मोठ्या उत्साहाने येथे गणेशोत्सव साजरा केला जातो
त्यासाठी भिंतींवर कायमस्वरूपी आकर्षक रंगरंगोटी करून निसर्गचित्रे देखील रंगवलेली
आहेत. रोज सकाळ व संध्याकाळी भाविक गण येथे जमतात व पूजा अर्चा तसेच सामूहिकरीत्या
महाआरती करतात. यावेळी संपूर्ण परिसर महादेवाच्या नामघोषाने दुमदुमतो आणि परिसरात
अगदी प्रसन्न वातावरणाची निर्मिती होते. येथे दररोज होणारी महाआरती विशेष प्रसिद्ध
आहे याचे मुख्य कारण म्हणजे याठिकाणी आबालवृद्ध आरतीसाठी आवर्जून हजर असतात.
* मंदिरातील आरती
श्री
जागेश्वर मंदिरात दररोज साधारणत: तीन वेळेस सामुहिक आरतीचे आयोजन केले जाते.
सामुहिक आरतीसाठी परिसरातील तसेच गावातील भाविक भक्तांची गर्दी जमलेली असते.
आरतीची सुरुवात करण्याआधी मंदिराची व परिसराची साफसफाई केली जाते, त्यानंतर गाभाऱ्यातील साफसफाई करून महादेवाच्या पिंडीला पाण्याने
स्वच्छ धुऊन काढले जाते. त्यानंतर पाण्याने महादेवाचा अभिषेक केला जातो तसेच
महाशिवरात्रीच्या दिवशी ऊसाच्या रसाने महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला जातो.
महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करीत असताना जमलेले भाविक श्री गणपती स्तोत्र, काळभैरव अष्टक चा पठण करीत असतात. त्यानंतर महादेवाची पूजा केली जाऊन
108 नामावालीचा जप करत महादेवास बेल वाहिले जाते.
तद्नंतर देवीच्या पाच मंत्रांचा व महादेवाच्या नावाचा पाच वेळा जप केला जातो.
यानंतर पंच आरती होते यात श्री गणपतीची, देवीची तसेच महादेवाची आरती
म्हटली जाते. आरती झाल्यावर मंत्रपुष्पांजली म्हणून महादेवास फुले वाहिले जातात.
आरतीसाठी मोठ्या संख्येने भाविक हजर असतात.
परिसरात श्री दत्त मंदिर व
हनुमान मंदिर असल्याने दर गुरुवारी येथे श्री दत्ताची आरती तर दर शनिवारी संकटमोचन
हनुमानाची आरती देखील केली जाते. असे हे जागेश्वर मंदिर भाविकांच्या भक्तीने अगदी
मन हर्षो उल्हासित करते. आरतीच्या वेळी येथील परिसर महादेवाच्या नामघोषात अगदी
प्रसन्न व शरीरात सकारात्मक उर्जेचा संचार करणारा असतो. त्यामुळे भाविक भक्त
महादेवाच्या दर्शनासाठी अधिक आकर्षिले जातात.
* मंदिरातील सामुहीक आरतीची वेळ:-
सकाळी 07:00 वा, संध्या. 06:00 वा, रात्री 09:00 वा.
-------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------
पुर्वमूखी
हनुमान मंदिर हे एक पुरातन मंदिर असून काही वर्षापूर्वी मंदिराचा जिर्णोद्धार
झालेला आहे. हे मंदिर गावातील नेहरू चौकाच्या परिसरात आहे. मंदिराला भेट
देण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे वडगाव - कमळगांव चौफुली पासून गावात जाणाऱ्या मुख्य
रस्त्याला समोरच मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात दाट लोकवस्ती असून परिसर कायम
गजबजलेला असतो. मंदिरात पूर्वमुखी असणाऱ्या संकटमोचन हनुमानाची मूर्ती असून तेथेच
मागच्या बाजूला शिवलिंग व गणेश मूर्ती आहे. येथे दररोज परिसरातील भाविक दर्शनासाठी
येत असतात. श्रीराम नवमी व हनुमान जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या
दिवशी येथे संपूर्ण मंदिर धुवून काढून रंगरंगोटी केली जाते. जयंतीच्या दिवशी
महाप्रसाद म्हणून दरवर्षी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. भाविक मोठ्या उत्साहाने
येथे आवर्जून येतात.
* आपल्याकडे अडावद परिसरातील
धार्मिक स्थळांची तसेच इतर पर्यटनस्थळांची माहिती अथवा फोटो असतील तर कृपया संपर्क
साधावा.



0 Comments