सराव प्रश्नसंच गणित व मराठी




१) अनिल, बबलू व कबीर या तिघांमध्ये 8800/-रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये अनिल चा हिस्सा हा बबलू व कबीर या दोघांच्या मिळून झालेल्या हिस्याच्या 3/8 प्रमाणात आहे, तर अनिलच्या हिस्यावर किती रुपये येतील? 
1) 1200/- 
2) 2400/- 
3) 2500/- 
4) 1300/-


२) गुरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बैल आहेत. त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर बैल किती?
1) 34
2) 12
3) 20
4) 44


३) 120 चे शेकडा 20 किती ?
1) 20
2) 22 
3) 24
4) 26


४) दोन संख्याची बेरीज 91 असून त्यातील फरक 13 आहे. तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती ? 
1) 2:3 
2) 3:1 
3) 4:3 
4) 3:2


५) पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा. 
1) 72 
2) 69 
3) 70 
4) 74


६) 5 तास 5 मिनिटे 5 सेकंद =?
1) 18035 सेकंद
2) 18005 सेकंद
3) 1835 सेकंद
4) 18305 सेकंद


७) एका नळाने २ तासात पाण्याची टाकी भरते, तर दुसऱ्या नळाने तीच टाकी ६ तासात भरते. दोन्ही नळ एकाच वेळेला सुरु केले असता पाण्याची टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल?
1) 2.5 तास
2) 3 तास
3) 1.5 मिनिटे
4) 1.5 तास


८) भुसावळहून मुंबईला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली गाडी ताशी ५४ किमी वेगाने सकाळी ९:०० वाजता तर दुसरी गाडी ताशी ७२ किमी वेगाने सकाळी १०:४० वाजता सुटली. तर त्या किती वाजता एकमेकांना भेटतील?
1) दुपारी 2.40वा.
2) सायंकाळी 4:40 वा.
3) दुपारी 3:40 वा.
4) दुपारी 4:40 वा.


९)  2.5 x 0.25 x 0.025 = ?
1) 15625
2) 0.015625
3) 0.0015625
4) 1.5625


१०)  2y + (3y+13) = 103 तर y ची किंमत ?
1) 17
2) 18
3) 27
4) 28


११)  विराटने 9400 रुपयांना घेतलेला नवीन मोबाईल रोहितला 35% तोटा सहन करून विकला. तर रोहितला तो मोबाईल किती रुपयात खरेदी केला ?
1) 6220/-
2) 6310/-
3) 6110/-
4) 6210/- 


१२)  35+10x20-30÷10 = ?
1) 87 
2) 232
3) 120
4) 250


१३) सीताराम आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे १५००० आणि २५००० गुंतवतात. त्यांना १६००० रुपये नफा होतो, तर सीतारामचा वाटा किती?
१) ४०००
२) १६०००
३) १००००
४) ६०००


१४) एक काम १० स्त्रिया १० तास करून २४ दिवसात संपवतात. तर तेच काम ८ स्त्रिया ५ तास करून किती दिवसात संपवतील?
१) ५०
२) ३०
३) ६०
४) ४०


१५) ताशी 30 कि.मी. वेगाने जाणारी एक रेल्वे सिग्नलच्या खांबास 42 सेकंदात ओलांडते. तर आगगाडीची लांबी किती?
1) 360 मी
2) 350 मी.
3) 340 मी
4) 320 मी


१६) एक कार 2250 रुपयांस विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला. त्यास 8 टक्के नफा मिळविण्यासाठी ती कार किती किमतीला विकावी लागेल ?
1) 2700
2) 2500
3) 2000
4) यापैकी नाही


१७) एक भिंत बांधण्याचे काम 12 मजूर 8 दिवसात करतात. जर 4 मजूर वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
1) 6 दिवस
2) 5 दिवस
3) 4 दिवस
4) यापैकी नाही


१८) एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. दहा नवीन मुलांनी प्रवेश घेतला आणि सरासरी वय 6 महिन्यांनी वाढले. तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती?
1) 19 वर्ष
2) 12 वर्ष
3) 17 वर्ष
4) 10 वर्ष


१९) 4 + 44 + 444 + ........ अशा साखळीत येणाऱ्या नऊ संख्यांची बेरीज केली असता दशक स्थानी येणारा अंक कोणता ?
1) 6
2) 9
3) 5
4) 4


२०) एका माणसाचे ठरावीक मासीक पगार व निश्चित वार्षिक वाढ असलेली नोकरी सुरु केली. जर त्याचा पगार 2 वर्षांनंतर 11000 रु व 4 वर्षांनंतर 14000 रू. होत असेल तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढ काढा.
1) सुरुवातीला 8000 रु व वाढ 1500 रु.
2) सुरुवातीचा 7000 रु. व वाढ 1200 रु.
3) सुरुवातीचा 9000 रु व वाढ 2500रु.
4) सुरुवातीचा 6000 रु व वाढ 1700 रु.


२१) खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
1) 10/3
2) 17/5
3) 27/8
4) 33/10


२२) ताशी 72 किमी वेगाने धावणारी रेल्वे 80 सेकंदात किती अंतर कापेल ?
1) 1200 मीटर
2) 1400 मीटर 
3) 1000 मीटर 
4) 1600 मीटर 


२३) अक्षयला सहामाही परीक्षेत एकूण सहा विषयात 65, 75, 82, 78, 80, 70 असे गुण मिळालेत. तर त्याला मिळालेले सरासरी गुण किती ?
1) 80
2) 75
3) 65
4) 78


२४) 21 से.मी. त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ? 
1) 1386 चौ.मी.
2) 1286 चौ.से.मी.
3) 1386 चौ.से.मी.
4) 1186 चौ.मी.


२५) द.सा.द.शे. 5 दराने किती वर्षात 1500 रुपयांचे सरळव्याज 225 रुपये होईल ?
1) 4 वर्षात 
2) 3 वर्षात
3) 5 वर्षात
4) 2 वर्षात





मराठी सराव प्रश्नसंच


1) “तो दोनदा नापास झाला.” या वाक्यातील अधोरखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा?
1) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
2) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
3) आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्यय
4) वरीलपैकी नाही


2) ‘पत्रकार’ या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप ओळखा?
1.पत्रकारीण
2. पत्रकर्ती
3.पत्रकारी
4.पत्रकारिनी


3) ‘मुलांनी नियमित व्यायाम करावा.’ अधोरेखीत शब्दाचे विभक्तीरूप ओळखा?

1) पंचमी
2) द्वितीया
3) तृतीया
4) षष्टी


4) ‘आता मी अभ्यास करीत आहे’ वाक्यातील काळ ओळखा?
1) रीति भुतकाळ
2) साधा वर्तमानकाळ
3) अपूर्ण वर्तमानकाळ
4) पूर्ण वर्तमानकाळ


5) ‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले’ प्रयोग ओळखा?
1) कर्तरी प्रयोग
2) शक्य कर्मणी प्रयोग
3) नविन कर्मणी प्रयोग
4) भावे प्रयोग


6) ‘प्रयत्न करा म्हणजे यश मिळेल’ वाक्याचा प्रकार ओळखा?
1) विद्यार्थी
2) आज्ञार्थी
3) संकेतार्थी
4) धातुसाधित


7) ते जहाज खूप मोठे आहे. वाक्य नकारार्थी करा.
1) ते जहाज मोठे आहे का?
2) ते जहाज काही लहान नाही.
3) किती मोठे आहे हे जहाज!
4) जहाज मोठे असावे.


8) विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात?
1) एकवचनी
2) अनेकवचनी
3) बहुवचनी
4) यापैकी नाही


9) खालीलपैकी अनेकवचनी कोणता?
1) नदी
2) वेली
3) रोपटे
4) झाड


10) मीठभाकरी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
1)द्वंद्व समास
2) समाहारद्वंद्व समास
3) वैकल्पिकद्वंद्व समास
4) इतरेतर द्वंद्व समास


11) लंका+ ईश्वर=…
1) लांकोश्वर
2) लंकेश्वर
3) लंकोश्वर
4) लंकेश्वर


12) पुढील शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.
1) काळा
2) सुंदर
3) गोदावरी
4) लबाड


13) “म्यानातून उसळे तलवारीची पात” या वाक्यातील काव्यरस ओळखा.
1) हास्य
2) भयानक
3) शांत
4) वीर


14) नियमित शाळेत जावे या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.
1) कर्ता
2) अधिकरण
3) करण
4) संबोधन


15) वेळ या नामाचे सामान्यरूप करा.
1) वेळा
2) वेळ
3) वेळी
4) वेळे


16) आंबट बोरे यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
1) गुणविशेषण
2) क्रियाविशेषण अव्यय
3) शब्दयोगी अव्यय
4) सर्वनाम


17) “यथाशक्ती” - समास ओळखा?

1) कर्मधारय
2) द्विगु
3) इंद
4) बहुव्रीही


18) तत्सम शब्द ओळखा.
1) वडील
2) भाऊ
3) सासरा
4) भ्राता


19) आमच्या वर्गात तीन सलमान आहेत. अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा.
1) विशेषनाम
2) सामान्यनाम
3) भाववाचक नाम
4) पदार्थवाचक नाम


20) "घरोघरी मातीच्या चुली" म्हणीचा अर्थ ओळखा.
1) प्रत्येक घरात चूल असते.
2) प्रत्येक चूल मातीची असते.
3) सर्वत्र परिस्थिती सारखीच असते.
4) घरात मातीच्या चुली तयार करतात.


21) प, फ, ब, भ, म हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत?
1) कंठ्य
2) दंत्य
3) दंततालव्य
4) ओष्ठ्य


22) दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी झोप -
1) सुस्ती
2) साखरझोप
3) वामकुक्षी
4) निद्रा


23) "लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |
ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |"
वरील वाक्यांतील अलंकार ओळखा.
1) यमक
2) अनुप्रास
3) दृष्टांत
4) चेतनागुणोत्ती


24) हवा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
1) सलिल
2) अनिल
3) अनल
4) निलय


25) “रामने आंबा खाल्ला.” या वाक्यातील प्रयोग ओळखा?
1) सकर्मक कर्तरी प्रयोग
2) अकर्मक कर्तरी प्रयोग
3) कर्मणी प्रयोग
4) भावे प्रयोग



वरील सराव प्रश्नसंच मधील प्रश्नांच्या उत्तरांचे स्पष्टीकरणासाठी तसेच इतर सराव प्रश्नसंचांसाठी कमेंट बॉक्स मध्ये आपले नाव, पत्ता व मोबाईल नंबर पाठवा अथवा आमच्याशी संपर्क साधा. पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. ------ जगदिश सोळंके (गिरीजा अकॅडमी)

Post a Comment

0 Comments