कोंकण किनारपट्टी


 कोंकण किनारपट्टी
सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र या दरम्यानचा चिंचोळा प्रदेश म्हणजेच कोकण किनारपट्टी होय. सह्याद्री पर्वत दक्षिणोत्तर अगदी भिंतीसारखा स्थित असल्याने दख्खनचे पठार व कोंकण किनारपट्टी एकमेकांपासून अलग झालेले आहेत.

◆ महाराष्ट्रातील विस्तार
उत्तरेकडे दमनगंगा नदी तसेच उल्हास नदी खोरे आणि दक्षिणेकडे तेरेखोल नदी खोरे या दरम्यान कोकणचा विस्तार महाराष्ट्रात आढळतो. यामुळेच सुमारे 720 किमी दक्षिणोत्तर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे.

कोकण किनारपट्टीची सर्वाधिक रुंदी उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यात आढळते. उत्तरेकडून दक्षिणेकडे जातांना किनारपट्टीची रुंदी कमी होत जाते तर पावसाचे प्रमाण उत्तरेकडे कमी असून दक्षिणेकडे जात असतांना वाढत जाते. दक्षिण भागात पडणाऱ्या अतिपावसमुळे तेथे 'जांभा खडक' आढळतो. 

कोकणला 'परशुरामाची भूमी' तसेच 'अपरांत' या नावाने ओळखले जाते. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे. म्हणजेच सह्याद्रीतून वाहत येणाऱ्या नद्या अरबी समुद्राला टप्प्याटप्प्याने अगदी समांतर वाहत जाऊन मिळतात. 

◆ कोंकणातील नद्या
कोंकण हा एक चिंचोळा भाग आहे. पश्चिमेला अरबी समुद्र व पूर्वेस सह्याद्री पर्वत, तसेच उत्तरेला दमणगंगा नदी तर दक्षिणेला तेरेखोल नदी या दरम्यानचा भाग म्हणजे कोंकण होय. महाराष्ट्राला 720 किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे. तसेच कोंकणाची रुंदी 30 ते 60 किमी आहे. कोंकणातील नद्या या पश्चिमवाहिनी नद्या असून यांची लांबी कमी आहे. तसेच कमी लांबी व सह्याद्रीच्या उतारामुळे नद्या वेगाने वाहत असल्याने त्यांचे खननकार्य अतिशय तीव्र आहे. पश्चिमेस अरबी समुद्र असल्याने नद्यांच्या मुखाजवळ खाड्यांची निर्मिती झालेली आहे. खाड्या हे कोकणाचे एक वैशिष्ट्य आहे.

* उल्हास व वैतरणा या दोन नद्यांची लांबी इतर नद्यांच्या तुलनेत जास्त आहे.

* कोंकणातील सर्वात लांब नदी - वैतरणा (154 किमी) 
  (काही ठिकाणी उल्हास नदी ही कोकणातील सर्वात लांब नदी असल्याचा उल्लेख आहे.)

* कोकणातील दुसरी लांब नदी - उल्हास (122 किमी) - रायगड जिल्ह्यात राजमाची टेकड्यात उगम पावते.

* कोंकणातील नद्यांचे उत्तर कोंकण, मध्य कोंकण व दक्षिण कोंकण या विभागात वर्गीकरण केले जाते.

उत्तर कोकण : दमणगंगा, वरोळी, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, उल्हास

मध्य कोकण : पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, गंधार, भोगावती, घोड, सावित्री, भारजा, जोग, जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, बाव

दक्षिण कोकण : काजळी, मुचकुंदी, काजवी, शुक, वाघोटन, देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरेखोल 


◆ कोंकणातील खाड्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

कोंकणातील प्रमुख नद्या व खाड्या
खाडी नदी जिल्हा इतर
डहाणूवारणापालघर
दातीवरेवैतरणा,
तानसा
पालघर
वसईउल्हासपालघर
ठाणेउल्हासठाणे
गोराई-मुंबई उप.-
मनोरीदहिसरमुंबई उप.-
मलाड-मुंबई उप.-
माहीममाहीममुंबई उप.-
पनवेल-रायगड
धरमतर
पातळगंगा
रायगड
रोहाकुंडलिकारायगड
राजापूरीकुंडलिकारायगड
बाणकोटसावित्रीरायगडसावित्री नदी - रायगड व रत्नागिरी जिल्ह्याची सीमा
केळशीभारजारत्नागिरी
दाभोळवशिष्ठी,
जगबुडी
रत्नागिरी
जयगडशास्त्रीरत्नागिरी
भाट्येकाजळीरत्नागिरी
पूर्णगडमुचकुंदीरत्नागिरी
जैतापूरकाजवीरत्नागिरी
विजयदुर्गशुकरत्नागिरीशुक  नदी - रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा
देवगडदेवगडसिंधुदुर्ग
आचरा आचरा सिंधुदुर्ग
कालावलीगडसिंधुदुर्ग
कर्लीकर्लीसिंधुदुर्ग
तेरेखोलतेरेखोलसिंधुदुर्ग

वरील तक्त्यात दिलेल्या खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे जातांना दिलेला आहे. परीक्षेत उत्तरेकडून दक्षिणेकडे अथवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमवारीवर आधारित प्रश्न विचारले जातात. तसेच नद्या व खाड्या यांच्या जोड्या जुडवा या पद्धतीने देखील प्रश्न विचारले जातात. क्रमवारी लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत म्हणजे जिल्ह्यानुसार खाड्यांचा क्रम लक्षात ठेवावा. प्रत्येक जिल्ह्यातील खाड्यांचा क्रम माहिती झाल्यास आपोआपच कोंकणातील खाड्यांची क्रमवारी लक्षात राहते. तसेच जिल्ह्यांच्या सीमांवर कोणत्या नद्या आहेत हे देखली लक्षात घ्यावे, यावर देखील प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खालील नकाशा काळजीपूर्वक अभ्यासा. नकाशा शास्त्रशुध्द पद्धतीने बनविलेला असून त्याचा उपयोग केवळ आपल्या अभ्यासासाठी करावा.


◆ गोंधळात टाकणारे काही महत्वाचे मुद्दे
  • काजवी नदी - जैतापूर खाडी 
  • काजळी नदी - भाट्ये खाडी
  • (काजळी व काजवी मधील फरक लक्षात घ्यावा)
  • इंद्रायणी नदी - भिमेची उपनदी
  • इंद्रावती नदी - गोदावरीची उपनदी (इंद्रावती गडचिरोली जिल्ह्याच्या आग्नेय सीमेवरून वाहत येऊन गोदावरी नदीला मिळते)
  • पूर्णा नदी ही तापीची उपनदी असून पश्चिम वाहिनी नदी आहे.
  • दक्षिण पूर्णा ही गोदावरीची उपनदी असून पूर्ववाहिनी नदी आहे. द. पूर्णा अजिंठ्याच्या डोंगरात उगम पावते. दक्षिण पूर्णा नदीच्या उपनद्या - खेळणा, अंजना, गिरजा, कापरा, दुधना
  • पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा नद्या - या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत
  • नळगंगा नदी - तापी नदीची उपनदी आहे.
  • कोंकणातील सर्वात लांब नदी - वैतरणा (154 किमी)  - काही पुस्तकात सर्वात लांब नदी उल्हास दिलेली आहे.
  • कोकणातील दुसरी लांब नदी - उल्हास (122 किमी)


◆  कोकणातील पुळण (Beaches)

उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम : 

उड्डाण, जुहू, दादर, गिरगाव, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, गणपतिपुळे, हर्णे, गुहागर, तारकर्ली, मोचेमाड, उभा दांडा, शिरोडा, दाभोळी

◆  कोकणातील बेटे

उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम : मुंबई, अंजदिव, साष्टि, मढ, घारापुरी, खांदेरी, उंदेरी, कासा, कुलाबा, जंजिरा, कुरटे


Post a Comment

0 Comments