परिचय
ब्रिटीश सत्तेच्या अधिपत्याखाली भारत बुडालेला असतांनाच ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील 'पोंभुर्ले' या लहानशा गावात बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला. त्यांची आई सगुणाबाई आणि वडील गंगाधरशास्त्री यांनी अतिशय हलाखीची परिस्थिती असतांनाही बाळशास्त्रींना शाळेत घातले.
जीवनपट ◆ जन्म - ६ जानेवारी १८१२, पोंभुर्ले(सिंधुदुर्ग) ◆ आईचे नाव - सगुणाबाई ◆ वडिलांचे नाव - गंगाधर शास्त्री ◆ टोपणनाव - बालबृहस्पती, आचार्य ◆ मुंबई एज्युकेशन सोसायटीत गणिताचे शिक्षक ◆ बाँबे नेटिव्ह सोसायटीचे 'डेप्युटी सेक्रेटरी' ◆ दर्पण (पहीले मराठी वृत्तपत्र) - ६ जाने १८३२ |
जन्मजात अफाट बुद्धीमत्ता लाभलेले बाळशास्त्री शालेय जीवनात प्रचंड वेगाने विद्याभ्यास करू लागले. त्यांचे पाठांतर दांडगे असल्यामुळे स्वतःच्या इयत्तेतील पुस्तके समजून घेतल्यानंतर पुढच्या २-३ इयत्तांमधील अभ्यास ते एकत्रितरित्या करू लागले. त्यांची तल्लख बुद्धीमत्ता पाहून सर्वजण त्यांना 'बालबृहस्पती' म्हणू लागले.
१८२६ मध्ये त्यांनी 'मुंबई एज्युकेशन सोसायटी' या इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. त्यांच्या सखोल अभ्यासामुळे वयाच्या १४ व्या वर्षी त्याच शाळेत 'गणिताचे शिक्षक' म्हणून त्यांना पगारी नोकरी मिळाली.
गणित विषयासोबत त्यांनी जिज्ञासेमुळे अल्पावधीतच मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगु, इंग्रजी, पारशी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक, उर्दू या सर्व भारतीय आणि विदेशी भाषांवर प्रभुत्व मिळवले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, पुढे त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास चालू केला आणि त्यातही ते पारंगत झाले. ज्योतिषशास्त्रावरही त्यांनी स्वतःची पकड घट्ट केली.
'बाँबे नेटिव्ह सोसायटी'चे बापू छत्रे हे त्यांचे शिक्षक होते. १८३० मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी बाळशास्त्री 'बाँबे नेटिव्ह सोसायटी'चे 'डेप्युटी सेक्रेटरी' (उपसचिव) झाले.
१८३४ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयाची स्थापना झाली. त्या महाविद्यालयात रुजू होणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पहिले मराठी सहायक प्राध्यापक होते. गणित, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र हे अवघड वाटणारे विषय ते शिकवायचे.
दर्पणकार बाळशास्त्री
बाळशास्त्रींनी वर्तमानपत्रापुरते मर्यादित न रहाता पुस्तके लिहिण्याचा उपक्रमदेखील हाती घेतला. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळासाठी विविध भाषेतील शालेय पाठ्यपुस्तके निर्मिती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. इतिहास, भूगोल, गणित, छंदशास्त्र, नीतीशास्त्र या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. 'बाल व्याकरण' सारखी मराठी पाठयपुस्तके सर्वप्रथम त्यांनी बनवली. फक्त शाळकरी अभ्यासक्रमापुरते न थांबता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही त्यांनी पुस्तके लिहिली. इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना गणितातील अवघड जाणाऱ्या 'डिफरनशियल कॅलक्युलस' या सारख्या विषयावर आधारित 'शून्यलब्धी' हे पहिले पुस्तक त्यांनी लिहिले. प्रतिष्ठित 'रॉयल एशियाटिक सोसायटी'च्या नियतकालिकांमध्ये बाळशास्त्रींचे लेख प्रसारित होत असत. असा मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय होते.
दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड हे आचार्य बाळशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले काही महान विद्यार्थी होत. एल्फिन्स्टन महाविद्यालयात रुजू होण्यापूर्वी आपल्या जन्मदिनी ६ जानेवारी १८३२ या दिवशी त्यांनी 'दर्पण' हे द्विभाषिक वर्तमानपत्र मुंबईत सुरू केले. आणि हेच महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र. म्हणूनच बाळशास्त्रींना मराठी वृत्तपत्राचे जनक / दर्पणकार असे संबोधले जाते.
दर्पणच्या आधी १७७९ पासून 'बाँबे हेरॉल्ड' हे महाराष्ट्रातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र उपलब्ध होते. परंतु मराठी भाषेमध्ये 'दर्पण' हेच पहिले वर्तमानपत्र बनले. वृत्तपत्राच्या प्रत्येक पानावर एका बाजूला इंग्रजी आणि दुसऱ्या बाजूला मराठी लिखाण अशा दोन भाषेत हे वर्तमानपत्र होते. इंग्रजी भागाचे संपादन जांभेकरांचे वर्गमित्र भाऊ महाजन हे करत. प्रारंभी 'दर्पण' हे पाक्षिक होते. ४ महिन्यानंतर ते साप्ताहिक बनले. एकूण ८ पानांच्या या साप्ताहिकाची वार्षिक वर्गणी ६ रुपये इतकी होती. 'दर्पण'चा खप ३०० प्रती इतका अत्यल्प असला तरी त्या काळात इतर प्रख्यात वृत्तपत्रांचा अधिकतम खप ४०० प्रती इतकाच होता. 'दर्पण' मुळे मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रचली गेली. पहिले मराठी पत्रकार होण्याचा मान अर्थातच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या दूरदृष्टीमुळे मिळाला. यामुळेच ते आजही 'दर्पणकार' या नावाने ओळखले जातात आणि त्यांचा जन्मदिवस 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.
दुर्दैवाने अवघ्या ८ वर्षात म्हणजेच १ जुलै १८४० रोजी 'लास्ट फेअरवेल' हा लेख लिहून 'दर्पण'चा प्रसार थांबला. 'लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रोनिकल' या पत्रात अखेरीस 'दर्पण' विलीन करण्यात आले.
'विद्या हे बळ आहे', असे मानणाऱ्या बाळशास्त्रींनी त्यानंतर 'दिग्दर्शन' हे शैक्षणिक मार्गदर्शन करणारे मासिक काढले. हेसुद्धा 'दर्पण' प्रमाणेच इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेत विभागलेले होते. भौतिक आणि रसायन शास्त्र, व्याकरण, गणित, भूगोल, इतिहास या विविध शाखेतील विषयांवर बाळशास्त्री 'दिग्दर्शन'मध्ये मार्गदर्शन करीत असत. त्यांचे वर्गमित्र भाऊ महाजन यांनी त्याच वर्षी 'प्रभाकर' नावाचे मराठी मासिक काढले. लोकहितवादींची गाजलेली १०८ शतपत्रे प्रभाकर या मासिकात छापली गेली. एकंदरीतच बाळशास्त्री यांच्या दूरदृष्टीमुळे मराठी वृत्तपत्र समूहाने आकार घेतला.
बाळशास्त्रींनी वर्तमानपत्रापुरते मर्यादित न रहाता पुस्तके लिहिण्याचा उपक्रमदेखील हाती घेतला. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळासाठी विविध भाषेतील शालेय पाठ्यपुस्तके निर्मिती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. इतिहास, भूगोल, गणित, छंदशास्त्र, नीतीशास्त्र या विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. 'बाल व्याकरण' सारखी मराठी पाठयपुस्तके सर्वप्रथम त्यांनी बनवली. फक्त शाळकरी अभ्यासक्रमापुरते न थांबता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही त्यांनी पुस्तके लिहिली. इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना गणितातील अवघड जाणाऱ्या 'डिफरनशियल कॅलक्युलस' या सारख्या विषयावर आधारित 'शून्यलब्धी' हे पहिले पुस्तक त्यांनी लिहिले. प्रतिष्ठित 'रॉयल एशियाटिक सोसायटी'च्या नियतकालिकांमध्ये बाळशास्त्रींचे लेख प्रसारित होत असत. असा मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय होते.
आध्यात्मिक क्षेत्रात पाऊल
हिंदु धर्माचे कट्टर पुरस्कर्ते असलेले बाळशास्त्री धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात होते. त्यांच्या काळात धर्मांतरावर गाजलेले शेषाद्री प्रकरण आजही चर्चेत आहे. अंबाजोगाई येथील गोविंद शेषाद्री यांना २ मुले होती. त्यापैकी मोठा मुलगा नारायण याला ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्मांतर करून ख्रिस्ती धर्मात सामील केले. त्याचा धाकटा भाऊ श्रीपती पुढे त्याच मार्गावर निघाला होता. बाळशास्त्रींना याची माहिती मिळताच त्यांनी श्रीपतीला गाठले. न्यायाधीश पेरी यांच्याद्वारे त्याचा ताबा घेतला आणि त्याचे मनपरिवर्तन घडवले. त्याची संमती मिळताच काशी येथे नेऊन त्याची शुद्धी करून त्याला पूर्ववत् हिंदु धर्मात प्रवेश करवून घेतला परंतु त्यानंतर त्यांच्यावर या कृत्यावरून कडाडून टीका झाली. ५७ दिवस यवनांकडे राहिलेल्या हिंदु व्यक्तीला पुन्हा धर्मात आणल्या कारणाने अखेरीस पुण्यात त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला.
शैक्षणिक क्षेत्रातून आध्यात्मिक क्षेत्रात पाऊल टाकत १८४५ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी 'ज्ञानेश्वरी' ग्रंथाचे पाठभेदांसहित संपादन करून त्याची पहिली छापील प्रत जगाला उपलब्ध करून दिली. त्यामुळेच त्यांना ' आद्यप्रकाशक' म्हणून ओळखले जाते. कोकणात गावागावांत जाऊन विविध भाषांमधील उपलब्ध ताम्रपटाचे वाचन करून इतिहास लेखनाचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे आद्यइतिहासकार' म्हटले जाते.
हिंदु धर्माचे कट्टर पुरस्कर्ते असलेले बाळशास्त्री धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात होते. त्यांच्या काळात धर्मांतरावर गाजलेले शेषाद्री प्रकरण आजही चर्चेत आहे. अंबाजोगाई येथील गोविंद शेषाद्री यांना २ मुले होती. त्यापैकी मोठा मुलगा नारायण याला ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्मांतर करून ख्रिस्ती धर्मात सामील केले. त्याचा धाकटा भाऊ श्रीपती पुढे त्याच मार्गावर निघाला होता. बाळशास्त्रींना याची माहिती मिळताच त्यांनी श्रीपतीला गाठले. न्यायाधीश पेरी यांच्याद्वारे त्याचा ताबा घेतला आणि त्याचे मनपरिवर्तन घडवले. त्याची संमती मिळताच काशी येथे नेऊन त्याची शुद्धी करून त्याला पूर्ववत् हिंदु धर्मात प्रवेश करवून घेतला परंतु त्यानंतर त्यांच्यावर या कृत्यावरून कडाडून टीका झाली. ५७ दिवस यवनांकडे राहिलेल्या हिंदु व्यक्तीला पुन्हा धर्मात आणल्या कारणाने अखेरीस पुण्यात त्यांच्यावर बहिष्कार घालण्यात आला.
तत्वनिष्ठ बाळशास्त्री
बाळशास्त्री तत्त्वाचे पक्के होते. मुंबई विभागाचे 'शाळा निरीक्षक' म्हणून त्यांची नियुक्ती झाली असतांना एकदा वेतनात १ रुपया अधिक दिला गेला. ही गोष्ट त्यांनी संबंधित ब्रिटीश खात्याकडे कळवली आणि पुढील महिन्यात तो १ रुपया वेतनातून कमी देण्याची विनंती केली. परंतु पुढील ४ महिन्यात तो वाढीव रुपया वळता केला गेला नाही. त्यानंतर बाळशास्त्री यांनी अधिकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहून 'जोपर्यंत तुम्ही मला दिलेला अधिकचा 1 रुपया जमा करत नाही, तोपर्यंत मी वेतन घेणार नाही', अशी चेतावणीच दिली. या त्यांच्या पत्रामुळे अधिकारी जणू दचकलेच.

भूषविलेली पदे आणि मिळालेल्या पदव्या
बाळशास्त्री यांनी अनेक पदे भूषवली. शिक्षक ट्रेनिंग स्कूलचे ते संचालक होते. कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. १८४० मध्ये त्यांना 'जस्टीस ऑफ पीस' बहाल करण्यात आले. याद्वारे तंटे सोडवण्याचे कायदेशीर दायित्व त्यांना मिळाले. 'विद्यामुकुटमणी', पश्चिम भारतातील 'आद्यकृषी' अशा विविध पदव्या लोकांनी त्यांना दिल्या.

लेखनसंपदा
बाळशास्त्री यांनी विविध विषयांवर वैविध्यपूर्ण पुस्तके लिहिली.
बाळशास्त्री यांनी विविध विषयांवर वैविध्यपूर्ण पुस्तके लिहिली.
- इंग्लंड देशाची बखर (वर्ष १८३२),
- ज्योतिषशास्त्र (१८३५),
- बाल व्याकरण (१८३६),
- भूगोल विद्या (१८३६),
- सार संग्रह (१८३७),
- नीती कथा (१८३८),
- हिंदुस्थानचा इतिहास (१८४६),
- हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास (१८४९),
- हिंदुस्थानातील इंग्रज राज्याचा इतिहास,
- शून्यलब्धी
निधन
दुर्दैवाने आचार्य बाळशास्त्री अल्पायुषी ठरले. १८ मे १८४६ या दिवशी वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. कोकणातील बनवेश्वर येथे इतिहासलेखन करीत असताना त्यांना अचानक ताप आला व त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची बातमी येताच मुंबई उच्च न्यायाधिशांनी न्यायालयाचे कामकाज स्थगित करून त्यांना मानवंदना दिल्याची नोंद आहे. 'जिंदगी बड़ी होनी चाहिये लंबी नही', ही म्हण आपल्या अल्पायुषी कारकीर्दीत कामाचा प्रचंड डोंगर उभारून बाळशास्त्री यांनी खरी केली. बाळशास्त्री यांचे कार्य अफाट आहे. परंतु ते पुढे दुर्लक्षितच राहिले. 'दर्पण' मुळे ते थोडेफार चर्चेत आले अन्यथा त्यांच्या विविधांगी कार्याची नोंद भारतीय जनतेने फारशी घेतलेली दिसत नाही.

त्यांच्या जीवनकार्यावर एक प्रकाश व आपल्या ज्ञानात भर व्हावी म्हणून हा लेख.....
लेख आवडल्यास शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा व आपला अभिप्राय नोंदवा. ---- जगदिश सोळंके (गिरीजा अकॅडमी, अडावद)

0 Comments